वाळवंटीकरण, जमिनीची निकसता व दुष्काळ यावरील संयुक्त राष्ट्रसंघाच्या उच्चस्तरीय चर्चासत्रातील पंतप्रधानांचे बीजभाषण

June 14th, 07:36 pm

जीवन आणि रोजगार यांचा मुलभूत आधार म्हणजे जमीन. या परस्परावलंबी व्यवस्थेत जीवन-जाळे कसे काम करते त्याची कल्पना आपणा सर्वांनाच आहे. जमिनीच्या निकृष्टीकरणाने एक तृतियांश जगावर परिणाम केला आहे. याकडे दुर्लक्ष केले तर आपला समाज, अर्थव्यवस्था, अन्नसुरक्षा, आरोग्य, जीवनातील सुरक्षितता आणि दर्जा या सगळ्याचा पायाच उखडला जाईल. आपल्यापुढील हे मोठे काम आहे. पण आपण ते पार पाडूच. आपण सर्व मिळून ते पार पाडू.

पंतप्रधानांचे आज संयुक्त राष्ट्र संघात 'वाळवंटीकरण व जमिनीचे निकृष्टीकरण आणि दुष्काळ' या विषयावर उच्च स्तरीय बैठकीत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बीजभाषण

June 14th, 07:32 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज संयुक्त राष्ट्र संघात 'वाळवंटीकरण व जमिनीचे निकृष्टीकरण आणि दुष्काळ' या विषयावर उच्च स्तरीय बैठकीत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून मुख्य भाषण केले. संयुक्त राष्ट्र संघात वाळवंटीकरणाशी लढा यासंदर्भातील कॉन्फरन्स ऑफ पार्टीजच्या (UNCCD) चौदाव्या सत्रात या परिषदेचे अध्यक्ष या नात्याने पंतप्रधानांनी उद्घाटन सत्रात भाषण केले.

सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडाइन्सचे पंतप्रधान डॉ. माननीय राल्फ इव्हार्डार्ड गोन्साल्विस यांनी आज पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

September 10th, 01:36 pm

सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडाइन्सचे पंतप्रधान डॉ. माननीय राल्फ इव्हार्डार्ड गोन्साल्विस यांनी आज पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. पंतप्रधान व्हिन्सेंट पहिल्यांदाच भारत दौर्‍यावर आले आहेत, नवी दिल्ली येथे युएनसीसीडी च्या अधिवेशनात ते भाग घेत आहेत.

जमिनीचे वाळवंटीकरण रोखण्यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या कॉप 14 परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संबोधन

September 09th, 10:35 am

जमिनीचे वाळवंटीकरण रोखण्यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या कॉप 14 परिषदेत आपण सर्वांचे मी भारतात स्वागत करतो. जमिनीचे वाळवंटीकरण रोखण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यासाठी भारतात हे संमेलन आयोजित केल्याबद्दल कार्यकारी सचिव इब्राहिम जियाओ यांना धन्यवाद देतो. जमिनीची धूप थांबवून त्या जमीनीला पुन्हा सुपीक करण्यासाठी हे संमेलन कटीबद्धता दर्शवते.

जमीन नापिकीकरणाच्या मुद्यांची दखल घेण्यासाठी भारत सर्वोत्कृष्टता केंद्र उभारणार- पंतप्रधान

September 09th, 10:30 am

जमिनीचे वाळवंटीकरण आणि नापिकी रोखण्यासंदर्भातल्या संयुक्त राष्ट्रांच्या उत्तर प्रदेशातल्या ग्रेटर नोएडा येथे सुरु असलेल्या कॉप-14 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज संबोधित केले. या संदर्भात प्रभावी योगदान देण्यासाठी भारत प्रयत्नशील असल्याचे पंतप्रधान म्हणाले. भारतात पूर्वीपासूनच जमिनीला महत्व देण्यात आले आहे. भारतीय संस्कृतीत जमिनीला पवित्र मानून तिला भू-माता असे संबोधले जाते.