गुजरातमधील मोरबी येथे हनुमानजींच्या 108 फुट उंच पुतळ्याचे अनावरण करताना पंतप्रधानांनी केलेले भाषण
April 16th, 04:57 pm
महामंडलेश्वर कंकेश्वरी देवीजी आणि राम कथेच्या आयोजनाशी संबंधित सर्व माननीय, गुजरातमधील या धार्मिक स्थळी उपस्थित सर्व साधू-संत, महंत, महामंडलेश्वर, एच.सी.नंदा विश्वस्त संस्थेचे सर्व सदस्य, इतर विद्वान आणि श्रद्धाळू भाविक, सज्जन स्त्री-पुरुषांनो, हनुमान जयंतीच्या या पवित्र प्रसंगी तुम्हा सर्वांना, सर्व देशवासियांना अनेकानेक शुभेच्छा. या पावन प्रसंगी, आज मोरबी येथे हनुमानजींच्या या भव्य मूर्तीचे लोकार्पण झाले आहे. हा प्रसंग देशातील आणि संपूर्ण जगातील हनुमान भक्तांसाठी, रामभक्तांसाठी अत्यंत सुखदायक आहे. तुम्हां सर्वांचे खूप खूप अभिनंदन!पंतप्रधानांनी गुजरातमधील मोरबी येथे हनुमानजींच्या 108 फूट पुतळ्याचे केले अनावरण
April 16th, 11:18 am
हनुमान जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे गुजरातमधील मोरबी येथे हनुमानजींच्या 108 फूट उंचीच्या पुतळ्याचे अनावरण केले. यावेळी महामंडलेश्वर माता कनकेश्वरी देवी उपस्थित होत्या.गुजरातमधील जुनागढ येथे उमिया माता मंदिराच्या 14 व्या स्थापना दिन सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेला संदेश
April 10th, 01:01 pm
गुजरातचे लोकप्रिय, मृदू आणि कणखर मुख्यमंत्री भूपेन्द्रभाई पटेल, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी पुरुषोत्तम रूपाला, राज्य सरकारमधील सर्व मंत्री, संसदेतील माझे सहकारी , अन्य सर्व आमदार गण, पंचायती, नगरपालिकांमधील निर्वाचित सर्व लोक प्रतिनिधी , उमा धाम घाटिलाचे अध्यक्ष वालजीभाई फलदु, अन्य पदाधिकारी आणि देशभरातून आलेले सर्व मान्यवर आणि मोठ्या संख्येने उपस्थित माता आणि भगिनी - यांना मी आज माता उमियाच्या 14 व्या पाटोत्सव निमित्त विशेष वंदन करतो. तुम्हा सर्वांना या शुभ प्रसंगी अनेक शुभेच्छा आणि अभिनंदन.रामनवमी निमित्त जुनागढच्या गथिला येथील उमिया माता मंदिराच्या 14 व्या स्थापना दिनाच्या सोहळ्याला पंतप्रधानांनी केले संबोधित
April 10th, 01:00 pm
रामनवमीच्या निमित्ताने, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमधील जुनागढमधील गथिला येथील उमिया माता मंदिराच्या 14 व्या स्थापना दिन सोहळ्याला दूरदृश्य प्रणालीद्वारे संबोधित केले. यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल आणि केंद्रीय मंत्री परशोत्तम रुपाला उपस्थित होते.पंतप्रधानांनी हरिद्वारच्या उमिया धाम आश्रमाच्या उद्घाटन कार्यक्रमात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उपस्थितांना केले मार्गदर्शन
October 05th, 10:01 am
सामाजिक सुधारणांचे प्रसार केंद्र म्हणून भारतात आध्यात्मिक संस्थांनी कार्य केले आहे. भारतात पर्यटनाची खूप प्राचीन संकल्पना आहे, त्याचबरोबर आध्यात्मिक परंपराही आहे. आज उद्घाटन करण्यात आलेल्या आश्रमाचा हरिद्वारला येणाऱ्या भाविकांना, यात्रेकरुनां चांगला लाभ होणार आहे, असे सांगून पंतप्रधान पुढे म्हणाले की, यात्रा हे आपल्या संस्कृतीचे अभिन्न अंग आहे. यात्रेमुळेच देशाच्या विविध भागातील चालीरिती, प्रथांचा परिचय आपल्याला होतो.