पंतप्रधानांनी घेतली स्वीडनच्या पंतप्रधानांची भेट
December 01st, 08:32 pm
उल्फ क्रिस्टरसन यांच्या सोबत 1 डिसेंबर 2023 रोजी दुबई येथील कॉप-28 येथे द्विपक्षीय बैठक घेतली.भारत आणि स्वीडन यांनी कॉप -28 मध्ये उद्योग संक्रमणासाठी नेतृत्व गटाच्या दुसऱ्या टप्प्याचे भूषवले सह-यजमानपद
December 01st, 08:29 pm
दुबई येथे कॉप-28 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि स्वीडनचे पंतप्रधान उल्फ क्रिस्टरसन यांनी संयुक्तपणे 2024-26 या कालावधीसाठी उद्योग संक्रमणासाठी नेतृत्व गटाच्या दुसऱ्या टप्प्याचे (LeadIT 2.0) उदघाटन केले. भारत आणि स्वीडन यांनी इंडस्ट्री ट्रांझिशन प्लॅटफॉर्मचे देखील उदघाटन केले . हा प्लॅटफॉर्म दोन्ही देशांची सरकारे, उद्योग, तंत्रज्ञान पुरवठादार, संशोधक आणि विचारवंत यांना एकमेकांशी जोडेल.कॉप-28 मध्ये भारताने यूएई बरोबर ग्लोबल ग्रीन क्रेडिट इनिशिएटिव्ह कार्यक्रमाचे सह-आयोजन केले
December 01st, 08:28 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त अरब अमिरातीचे राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान यांच्यासमवेत 1 डिसेंबर 2023 रोजी दुबई येथे कॉप-28 मध्ये 'ग्रीन क्रेडिट प्रोग्राम' (हरित कर्ज कार्यक्रम) या उच्चस्तरीय कार्यक्रमाचे सह-आयोजन केले. या कार्यक्रमात स्वीडनचे पंतप्रधान उल्फ क्रिस्टरसन, मोझांबिकचे अध्यक्ष फिलिप न्युसी आणि युरोपियन परिषदेचे अध्यक्ष चार्ल्स मिशेल सहभागी झाले.महामहीम उल्फ क्रीस्टरसन यांची स्वीडनचे आगामी पंतप्रधान म्हणून निवड झाल्याबद्दल पंतप्रधानांनी त्यांचे केले अभिनंदन
October 19th, 09:46 am
स्वीडनचे आगामी पंतप्रधान म्हणून महामहीम उल्फ क्रीस्टरसन यांची निवड झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.