नर्मदेच्या बांधाऱ्याची कोनशिला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ठेवण्यात आली, त्या प्रसंगी सार्वजनिक सभेला पंतप्रधान मोदी यांनी केलेले संबोधन

October 08th, 03:15 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नर्मदा नदीच्या ‘भडभूट’ बांधार्याची कोनशिला ठेऊन उदघाटन केले. सार्वजनिक सभेला संबोधित करताना पंतप्रधानांनी, उदना (सूरत, गुजरात) आणि जयनगर (बिहार) दरम्यान अंत्योदय एक्स्प्रेस ला हिरवी झेंडी दाखवून या एक्सप्रेसची ही सुरवात केली. तसेच गुजरात नर्मदा फर्टिलायझर कार्पोरेशन लि. च्या विविध प्रकल्पांचे उदघाटन हि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले.

पंतप्रधान 7 आणि 8 ऑक्टोबरला गुजरात दौऱ्यावर

October 06th, 05:16 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी दि. 7 आणि 8 ऑक्टोबर 2017 असे दोन दिवस गुजरातच्या दौऱ्यावर जाणार आहेत. दि. 7 ऑक्टोबर रोजी सकाळी पंतप्रधान द्वारकाधीश मंदिराला भेट देणार आहेत. त्यानंतर द्वारका येथे ओखा ते बेट द्वारका या दरम्यान बांधण्यात येणाऱ्या सेतुचा शिलान्यास पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार आहे. ते सार्वजनिक सभेला मार्गदर्शनही करणार आहेत.