टीव्ही 9 कॉन्क्लेव्हमधील पंतप्रधानांच्या भाषणाचा मजकूर
February 26th, 08:55 pm
मी अनेकदा भारताच्या विविधतेबद्दल बोलत असतो. टीव्ही नाईनच्या न्यूजरूममध्ये आणि तुमच्या वार्ताहरांच्या चमूमध्ये ही विविधता स्पष्टपणे दिसून येते. टीव्ही नाईनचे अनेक भारतीय भाषांमध्ये माध्यम व्यासपीठ उपलब्ध आहेत. तुम्ही भारताच्या चैतन्यशील लोकशाहीचे प्रतिनिधीही आहात. विविध राज्यांतील, विविध भाषांतील टीव्ही नाइनमध्ये काम करणाऱ्या सर्व पत्रकार सहकाऱ्यांचे आणि तुमच्या तांत्रिक टीमचे मी अभिनंदन करतो.पंतप्रधानांनी न्यूज 9 जागतिक शिखर परिषदेला केले संबोधित
February 26th, 07:50 pm
उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले की टीव्ही 9 ची रिपोर्टिंग टीम भारतातील विविधतेचे प्रतिनिधित्व करते. त्यांच्या बहुभाषिक वृत्त वाहिन्यांनी टीव्ही 9 ला भारताच्या चैतन्यशील लोकशाहीचा प्रतिनिधी बनवले आहे असे पंतप्रधान म्हणाले.