हिमाचल प्रदेशातील लेपचा इथे सुरक्षा दलांसोबत दिवाळी साजरी करताना पंतप्रधानांनी केलेले भाषण
November 12th, 03:00 pm
भारतमातेचा जयघोष , भारतीय सैन्य आणि सुरक्षा दलांच्या पराक्रमाचा हा जयघोष , ही ऐतिहासिक भूमी आणि दीपावलीचा हा पवित्र सण. हा अद्भुत संयोग आहे. हा अद्भुत मिलाफ आहे. समाधान आणि आनंदाने भारावून टाकणारा हा क्षण माझ्यासाठी, तुमच्यासाठीही आणि देशवासियांसाठीही दिवाळी प्रकाशमय करेल असा मला विश्वास आहे. मी तुम्हा सर्वांना, सर्व देशवासियांना सीमेवरून, शेवटच्या गावातून, ज्याला मी आता पहिले गाव म्हणतो, तिथे तैनात आपल्या सुरक्षा दलाच्या जवानांसोबत मी दिवाळी साजरी करत आहे, त्यामुळे सर्व देशवासियांना दिवाळीच्या या शुभेच्छा देखील खूपच खास आहेत. देशवासियांचे हार्दिक अभिनंदन आणि दिवाळीच्या शुभेच्छा.हिमाचल प्रदेशातील लेपचा इथे पंतप्रधानांनी शूर जवानांसोबत केली दिवाळी साजरी
November 12th, 02:31 pm
जवानांना संबोधित करताना पंतप्रधानांनी सांगितले की, दिवाळीचा सण आणि जवानांच्या शौर्याचे गुणगान यांचा संयोग हा देशातील प्रत्येक नागरिकासाठी अध्यात्मिक अनुभूतीचा क्षण आहे. भारताच्या सीमावर्ती भागातील जवानांसह त्यांनी दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. देशातील शेवटचे गाव म्हणून ओळखले जाणारे हे गांव आता देशातील पहिले गाव ठरले आहे.तुर्कियेच्या राष्ट्र्पतींसमवेत पंतप्रधानांची बैठक
September 10th, 05:23 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 10 सप्टेंबर 2023 रोजी नवी दिल्ली येथे जी 20 शिखर परिषदेच्या निमित्ताने तुर्कियेचे राष्ट्रपती रेसेप तय्यिप एर्दोगान यांच्यासमवेत द्विपक्षीय बैठक घेतली.तुर्कियेचे अध्यक्ष म्हणून फेरनिवड झाल्याबद्दल रस्सेप तय्यिप एर्दोआन यांचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन
May 29th, 09:30 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रस्सेप तय्यिप एर्दोआन यांची तुर्कियेचे अध्यक्ष म्हणून फेरनिवड झाल्याबद्दल अभिनंदन केले आहे.ऑस्ट्रेलियातील सिडनी इथल्या कार्यक्रमात पंतप्रधानांनी केलेले भाषण
May 23rd, 08:54 pm
ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान आणि माझे प्रिय मित्र अँथनी अल्बनीज, ऑस्ट्रेलियाचे माजी पंतप्रधान मान्यवर स्कॉट मॉरिसन, न्यू साउथ वेल्सचे प्रीमियर क्रिस मिन्स, परराष्ट्र मंत्री पेनी वोंग, दूरसंवाद मंत्री मिशेल रोलेन्ड, ऊर्जा मंत्री क्रिस बोवेन, विरोधी पक्षनेते पीटर डटन, परराष्ट्र उपमंत्री टीम वॉट्स, न्यू साउथ वेल्सच्या मंत्रिमंडळाचे उपस्थित आदरणीय सदस्य, पॅरामाटाचे संसद सदस्य डॉ अँड्रू चार्लटन, येथे उपस्थित असलेले ऑस्ट्रेलियाचे सर्व संसद सदस्य, महापौर, उप महापौर, कौन्सिलर्स आणि ऑस्ट्रेलियात राहत असलेले आणि मोठ्या संख्येने उपस्थित अनिवासी भारतीय, आपणा सर्वांना माझा नमस्कार.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑस्ट्रेलियातील सिडनी येथे भारतीय समुदायाबरोबर साधला संवाद
May 23rd, 01:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑस्ट्रेलियातील सिडनी येथे आज (23 मे, 2023) भारतीय समुदायाबरोबर संवाद साधला. सिडनीमधील कुडोस बँक एरिना भागात झालेल्या कार्यक्रमाला ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज उपस्थित होते.दिल्लीत आयोजित जागतिक बौद्ध परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण
April 20th, 10:45 am
कार्यक्रमाला उपस्थित केंद्रीय मंत्रिमंडळातील सदस्य किरेन रिजिजूजी, किशन रेड्डीजी, अर्जुन राम मेघवालजी, मीनाक्षी लेखीजी, आंतरराष्ट्रीय बौद्ध महासंघाचे सरचिटणीस, देश-परदेशातून या ठिकाणी आलेले आणि आपल्यासोबत उपस्थित असलेले सर्व आदरणीय भिक्षू, इतर मान्यवर आणि सभ्य स्त्री-पुरूषहो,नवी दिल्लीत आयोजित जागतिक बौद्ध परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मार्गदर्शन
April 20th, 10:30 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीत हॉटेल अशोका इथे आजपासून सुरु झालेल्या जागतिक बौद्ध शिखर परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी मार्गदर्शन केले. यावेळी, पंतप्रधानांनी इथे आयोजित फोटो प्रदर्शन पहिले आणि बुद्धांच्या मूर्तीला पुष्पांजली अर्पण केली. तसेच यावेळी उपस्थित एकोणीस मान्यवर बौद्ध भिक्खूना त्यांचा पोशाख चीवर भेट दिला.आपत्ती प्रतिरोधक पायाभूत सुविधांवरील आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये पंतप्रधानांनी व्हिडीओ संदेशा द्वारे केलेले संबोधन
April 04th, 09:46 am
आपणा सर्वांना माझ्या शुभेच्छा. भारतामध्ये आपलं स्वागत आहे! सर्वात प्रथम, आपत्ती प्रतिरोधक पायाभूत सुविधांसाठी एकत्र आल्याबद्दल मी आपलं अभिनंदन करतो. पाचवी आपत्ती प्रतिरोधक पायाभूत सुविधा आंतरराष्ट्रीय परिषद, आयसीडीआरआय-2023 नक्कीच विशेष आहे.पंतप्रधानांनी आपत्ती प्रतिरोधक पायाभूत सुविधांवरील 5व्या आंतरराष्ट्रीय परिषदेला केले संबोधित
April 04th, 09:45 am
सारे जग एकमेकांशी जोडलेले असताना आपत्तींचा प्रभाव फक्त स्थानिक राहत नाही त्यामुळे जागतिक दृष्टीकोनातून सीडीआरआयची निर्मिती झाली आहे, असे पंतप्रधान म्हणाले. त्यामुळे, आपला प्रतिसाद एकाकी न ठेवता एकीकृत केला पाहिजे,असे ते म्हणाले. अवघ्या काही वर्षांत, प्रगत आणि विकसनशील देशांतील, लहान-मोठे, जगाच्या दक्षिण किंवा उत्तर भागातले 40 हून अधिक देश सीडीआरआयचा भाग बनले आहेत असे त्यांनी नमूद केले. सरकार व्यतिरिक्त, जागतिक संस्था, खाजगी क्षेत्रे आणि तज्ञ देखील यात सहभागी आहेत हे उत्साहवर्धक असल्याचे त्यांनी सांगितले.आपत्तीचा धोका कमी करण्यासाठीच्या राष्ट्रीय मंचाची तिसरी बैठक आणि सुभाषचंद्र बोस आपदा प्रबंधन पुरस्कार -2023 मध्ये पंतप्रधानांनी केलेले संबोधन
March 10th, 09:43 pm
आपत्तीचा धोका कमी करण्यासाठीच्या राष्ट्रीय मंचाची तिसरी बैठक आणि सुभाषचंद्र बोस आपदा प्रबंधन पुरस्कार -2023 मध्ये पंतप्रधानांनी केलेले संबोधनआपत्तीचा धोका कमी करण्यासाठीच्या राष्ट्रीय मंचाच्या तिसऱ्या सत्राचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन
March 10th, 04:40 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीत आपत्तीचा धोका कमी करण्यासाठीचा राष्ट्रीय मंच (NPDRR)च्या तिसऱ्या सत्राचे उद्घाटन केले. या तिसऱ्या सत्राची मुख्य संकल्पना, “बदलत्या हवामानात, स्थानिक पातळीवरील प्रतिबंधक आणि संरक्षक क्षमता वाढवणे” अशी आहे.पंतप्रधानांनी 'अॉपरेशन दोस्त' या तुर्कीए आणि सिरियातील भूकंपग्रस्त क्षेत्रात काम करून मायदेशी परत आलेल्या राष्ट्रीय आपत्ती निवारण आणि बचाव दलाच्या जवानांशी साधलेल्या संवादाचे मराठी भाषांतर
February 20th, 06:20 pm
तुम्ही सर्व जण मानवतेसाठी एक खूप मोठे कार्य करून परतले आहात. ऑपरेशन दोस्तशी संबंधित संपूर्ण टीम, मग ते एनडीआरएफ असो, लष्कर असो, हवाई दळ असो किंवा आमचे इतर सेवा भागीदार असोत, त्यांनी अप्रतिम काम केले आहे. आणि एवढेच नव्हे तर आमच्या मुक्या मित्रांनी, श्वान पथकातील सदस्यांनीही अद्भुत क्षमता दाखवली आहे. देशाला तुम्हा सर्वांचा अभिमान आहे.भूकंपग्रस्त तुर्किए आणि सीरियामधील ‘ऑपरेशन दोस्त’ मध्ये सहभागी असलेल्या एनडीआरएफच्या जवानांशी पंतप्रधानांनी साधला संवाद
February 20th, 06:00 pm
भूकंपग्रस्त तुर्किए आणि सीरियामधील ‘ऑपरेशन दोस्त’मध्ये सहभागी असलेल्या एनडीआरएफ म्हणजेच राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या जवानांशी पंतप्रधानांनी संवाद साधला.भारत या संकटकाळात तुर्कस्तानच्या लोकांसोबत भक्कमपणे उभा आहे: पंतप्रधान
February 10th, 08:11 pm
भारत, “ऑपरेशन दोस्त’ अंतर्गत जास्तीत जास्त लोकांचे जीव वाचवण्याचा प्रयत्न करत राहील, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.तुर्कस्थान मध्ये आज झालेल्या भूकंपाचा सामना करण्यासाठी सर्वतोपरी सहाय करण्याच्या पंतप्रधानांच्या निर्देशांनुसार, मदत उपाययोजनांवर तातडीने चर्चा करण्यासाठी पंतप्रधान कार्यालयात बैठकीचं आयोजन
February 06th, 02:34 pm
तुर्कस्थान मध्ये आज झालेल्या भूकंपाचा सामना करण्यासाठी सर्वतोपरी सहाय करण्याच्या पंतप्रधानांच्या निर्देशांनुसार तातडीने करायच्या मदत योजनांबद्दल चर्चा करण्यासाठी पंतप्रधानांचे प्रधान सचिव डॉ. पी. के. मिश्रा यांनी साऊथ ब्लॉकमध्ये एक बैठक घेतली. राष्ट्रीय आपत्ती निवारण दल, एन डी आर एफ ची शोध आणि बचाव पथके तसेच मदत सामग्री सह वैद्यकीय पथके तुर्कीला तातडीने रवाना केली जातील असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.तुर्कीमध्ये भूकंपामुळे झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांनी शोक केला व्यक्त
February 06th, 12:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तुर्कीमधील भूकंपामुळे झालेल्या जीवितहानी आणि मालमत्तेच्या नुकसानीबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले आहे.कर्नाटकमध्ये बंगळुरू येथे आयोजित इंडिया एनर्जी वीक 2023 मध्ये पंतप्रधानांचे भाषण
February 06th, 11:50 am
आता या वेळी आपल्या सर्वांच्या नजरा तुर्कस्तानमध्ये झालेल्या विध्वंसक भूकंपाकडे लागल्या आहेत. अनेक लोक मृत्यूमुखी पडले असून मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याच्या बातम्या येत आहेत. तुर्कस्तानच्या आजूबाजूच्या देशांमध्येही नुकसान होईल, अशी शक्यता आहे. भारतातील 140 कोटी जनतेची सहानुभूती या भूकंपग्रस्तांना आहे. या भूकंपग्रस्तांची सर्वतोपरी मदत करायला भारत तत्पर आहे.पंतप्रधानांच्या हस्ते बेंगळूरू येथे भारत उर्जा सप्ताह 2023 चे उद्घाटन
February 06th, 11:46 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बेंगळूरू येथे भारत उर्जा सप्ताह (आयईडब्ल्यू)2023 चे उद्घाटन केले. यावेळी पंतप्रधानांनी भारतीय तेल महामंडळाच्या ‘अनबॉटल्ड’उपक्रमाअंतर्गत तयार करण्यात आलेल्या गणवेशांचे अनावरण केले. हे गणवेश पुनर्प्रक्रिया केलेल्या प्लास्टिकच्या बाटल्यांपासून तयार करण्यात आले आहेत. भारतीय तेल महामंडळाद्वारे निर्मित अंतर्गत सौर कुकिंग प्रणालीच्या ट्वीन कुकटॉप मॉडेलचे देखील पंतप्रधानांनी लोकार्पण केले आणि या मॉडेलच्या व्यावसायिक पातळीवरील विक्रीचा प्रारंभ केला.PM's telephonic conversation with President of Turkey
March 11th, 09:26 pm
H. E. Mr. Recep Tayyip Erdogan, President of the Republic of Turkey, called Prime Minister Narendra Modi over telephone today.