सरदार वल्लभ भाई पटेल यांच्या पुण्यतिथीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाहिली आदरांजली
December 15th, 09:32 am
सरदार वल्लभ भाई पटेल यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. पटेल यांचे व्यक्तिमत्व आणि कार्य देशाचे ऐक्य, अखंडता आणि विकसित भारताच्या निर्मितीचा संकल्प प्रत्यक्षात आणण्याची प्रेरणा देशाच्या नागरिकांना कायम देत राहील असे उद्गार त्यांनी काढलेपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महान चित्रकर्मी राज कपूर यांना त्यांच्या जन्मशताब्दी निमित्त वाहिली आदरांजली
December 14th, 11:17 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महान चित्रकर्मी राज कपूर यांना आज त्यांच्या जन्मशताब्दी निमित्त आदरांजली वाहिली. राज कपूर हे दूरदृष्टी लाभलेले चित्रपट निर्माते, अभिनेते आणि महान शोमॅन होते, असे त्यांनी म्हटले आहे. राज कपूर हे केवळ चित्रपटनिर्माते नव्हते तर भारतीय चित्रपटांना जागतिक स्तरावर ओळख मिळवून देणारे एक सांस्कृतिक राजदूत होते, चित्रपटनिर्मिती आणि अभिनय क्षेत्रातील पुढील अनेक पिढ्या त्यांच्याकडून अनेक गोष्टी शिकू शकतात, असे पंतप्रधान म्हणाले.2001 मध्ये संसदेवर झालेल्या हल्ल्यातील हुतात्म्यांना पंतप्रधानांनी वाहिली श्रद्धांजली
December 13th, 10:21 am
2001 च्या संसदेवर झालेल्या हल्ल्यातील हुतात्म्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज श्रद्धांजली वाहिली.श्री गुरू तेग बहादूरजी हौतात्म्य दिनानिमित्त पंतप्रधानांकडून आदरांजली
December 06th, 08:07 pm
श्री गुरू तेग बहादूर जी हुतात्मा दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. न्याय, समानता आणि मानवतेच्या रक्षणासाठी श्री गुरू तेग बहादूर जी यांनी दाखवलेल्या अतुलनीय धैर्याचे आणि त्यांनी दिलेल्या बलिदानाचे पंतप्रधानांनी स्मरण केले.पंतप्रधानांनी देशाचे पहिले राष्ट्रपती भारतरत्न डॉ राजेंद्र प्रसाद यांना त्यांच्या जयंतीनिमित्त वाहिली आदरांजली
December 03rd, 08:59 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशाचे पहिले राष्ट्रपती भारतरत्न डॉ राजेंद्र प्रसादजी यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली. डॉ प्रसाद यांनी भारतीय लोकशाहीचा भक्कम पाया रचण्यासाठी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.पंतप्रधानांनी वाहिली आर्य समाजाच्या स्मारकाला आदरांजली
November 22nd, 03:09 am
पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी आज गयाना येथील जॉर्जटाऊन मधील,आर्य समाज स्मारकाला भेट देऊन आदरांजली वाहिली.गयानामधील भारतीय संस्कृतीचे जतन करण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांची आणि भूमिकेची श्री मोदींनी प्रशंसा केली. स्वामी दयानंद सरस्वती यांची या वर्षी 200 वी जयंती आम्ही साजरी करत असल्याने हे वर्ष देखील खूप खास आहे,असे त्यांनी यावेळी नमूद केली.पंतप्रधानांनी गयाना मधील भारतीय आगमन स्मारकाला दिली भेट
November 21st, 10:00 pm
स्मारकाच्या ठिकाणी आदरांजली वाहताना, पंतप्रधानांनी गयानामधील भारतीय समुदायाचा संघर्ष आणि बलिदानाचे तसेच भारतीय संस्कृती आणि परंपरेचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी त्यांनी दिलेल्या महत्वाच्या योगदानाचे स्मरण केले. स्मारकाजवळ त्यांनी बेल पत्राचे रोप लावले.हे स्मारक 1838 मध्ये गयाना येथे करारबद्ध भारतीय स्थलांतरितांना घेऊन आलेल्या पहिल्या जहाजाची प्रतिकृती आहे. भारताने 1991 मध्ये गयानाच्या नागरिकांना दिलेली ही भेट आहे.पंतप्रधानांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना वाहिली आदरांजली
November 17th, 01:22 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांना त्यांच्या पुण्यतिथी निमित्त आदरांजली वाहीली. महाराष्ट्राचा विकास आणि मराठी जनतेच्या सक्षमीकरणाचा दृष्टिकोण ठेवणाऱ्या बाळासाहेब ठाकरे यांची मोदी यांनी स्तुती केली आहे.आदिवासी गौरव दिनानिमित्त, भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी त्यांना वाहिली आदरांजली
November 15th, 08:41 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आदिवासी गौरव दिनी भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. याप्रसंगी ते म्हणाले की बिरसा मुंडा यांनी मातृभूमीच्या अभिमानासाठी आणि सन्मानासाठी सर्वस्वाचा त्याग केला.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांना त्यांच्या जयंतीनिमित्त वाहिली आदरांजली
October 31st, 07:33 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली अर्पण केली आणि भारताची एकता आणि सार्वभौमत्वाचे संरक्षण करण्यासाठी त्यांच्या समर्पणाची प्रशंसा केली.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पासुम्पोन मुथुरामलिंगा थेवर यांना वाहिली आदरांजली
October 30th, 03:38 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज, पासुम्पोन मुथुरामलिंग थेवर यांना त्यांच्या गुरू पूजेनिमित्तानेआदरांजली वाहिली.आदिवासी नेता श्री कार्तिक उराव यांना त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त पंतप्रधानांनी वाहिली आदरांजली
October 29th, 09:16 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आदिवासी नेता श्री कार्तिक उराव यांना त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आदरांजली वाहिली आहे.”श्री कार्तिक उराव हे एक महान नेते आहेत ज्यांनी आदिवासी समाजाचे हक्क आणि स्वाभिमानासाठी यांनी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले; तसेच आदिवासी संस्कृती आणि अस्मितेचे रक्षण करण्यासाठी आदिवासी समाजाचे मुखपत्र म्हणून भूमिका बजावली,” अशा शब्दांत पंतप्रधानांनी त्यांना अभिवादन केले आहेपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पोलीस स्मृती दिनानिमित्त पोलीस दलातील वीरांना वाहिली आदरांजली
October 21st, 12:58 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पोलीस स्मृती दिनानिमित्त पोलीस दलातील वीरांना आदरांजली वाहिली.भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाहिली आदरांजली
October 15th, 10:21 am
प्रख्यात शास्त्रज्ञ आणि भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे.पंतप्रधानांनी राजमाता विजयाराजे सिंधिया यांच्या जयंतीनिमित्त वाहिली आदरांजली
October 12th, 08:45 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राजमाता विजयाराजे सिंधिया यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली अर्पण केली. मोदी यांनी राजमाता विजयाराजे सिंधिया यांनी भारताच्या सेवेसाठी आयुष्यभर केलेल्या समर्पणाचे कौतुक केले.लोकनायक जयप्रकाश नारायण यांना त्यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी वाहिली आदरांजली
October 11th, 08:50 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लोकनायक जयप्रकाश नारायण यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली आहे. ’श्री जे.पी. नारायण यांचे व्यक्तिमत्त्व आणि आदर्श, प्रत्येक पिढीसाठी प्रेरणास्थान राहतील,’असे देश आणि समाजासाठी दिलेल्या त्यांच्या योगदानाची प्रशंसा करताना मोदी म्हणालेपंतप्रधानांनी भारतरत्न नानाजी देशमुख यांच्या जयंतीनिमित्त त्यांना वाहिली आदरांजली
October 11th, 08:47 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भारतरत्न नानाजी देशमुख यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली. भारतातील ग्रामीण लोकांच्या सक्षमीकरणाप्रति देशमुख यांच्या समर्पण आणि सेवेचे मोदी यांनी स्मरण केले आणि त्यांची प्रशंसा केली.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संत श्री रामराव बापू महाराज यांना वाहिली आदरांजली
October 05th, 02:51 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज संत श्री रामराव बापू महाराज यांच्या समाधी स्थळी जाऊन त्यांना आदरांजली वाहिली. संत रामराव बापूंनी नेहमीच मानवी दु:ख दूर करून करुणामयी समाज घडवण्याचं काम केलं, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संत श्री सेवालाल जी महाराज यांना अर्पण केली आदरांजली
October 05th, 02:41 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज संत श्री सेवालाल जी महाराज यांच्या समाधी स्थळी त्यांना अभिवादन केले. श्री सेवालाल जी महाराज हे समाजसुधारणेचे आणि आध्यात्मिक मार्गदर्शनाचे दीपस्तंभ आहेत, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या कार्याचा गौरव केला.वाशिम, महाराष्ट्र येथे कृषी आणि पशुसंवर्धन क्षेत्रातील उपक्रमांच्या आरंभप्रसंगी पंतप्रधानांचे भाषण
October 05th, 12:05 pm
आजच्या भव्य सभेत उपस्थित असणाऱ्या संपूर्ण देशभरातील आमच्या आदरणीय बंधू आणि भगिनींना मी अभिवादन करतो - जय सेवालाल! जय सेवालाल!