भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाच्या रौप्यमहोत्सवी सोहळ्यात पंतप्रधानांनी केलेले भाषण

May 17th, 01:54 pm

भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाशी संबंधित सर्व सहकाऱ्यांना रौप्यमहोत्सवी वर्षात पदार्पणाच्या खुप खुप शुभेच्छा. आज आपल्या संस्थेने 25 वर्ष पूर्ण केलेली आहेत त्याच वेळेला देश स्वातंत्र्याच्या अमृत काळात पुढील पंचवीस वर्षाच्या नियोजनावर काम करत आहे, नवनवीन लक्ष्य ठरवत आहे हा एक सुखद योगायोग आहे. थोड्या वेळापूर्वी मला देशातील स्वनिर्मित 5G टेस्टबेड देशाला समर्पित करण्याची संधी लाभली. हे दूरसंचार क्षेत्रातील महत्त्वाचे आणि आधुनिक तंत्रज्ञानातील आत्मनिर्भरतेच्या दिशेने टाकलेले महत्त्वाचे पाऊल आहे. मी या प्रकल्पाशी संबंधित सर्व सहकाऱ्यांना , आमच्या भारतीय तंत्रशिक्षण संस्थांना खूप खूप शुभेच्छा देतो त्याचबरोबर देशातील तरुण साथीदार संशोधक आणि कंपन्या यांना आमंत्रण देतो की ते या टेस्टिंग सुविधेचा उपयोग तंत्रज्ञानाच्या निर्मितीसाठी त्यांनी करावा. खासकरून आमच्या स्टार्ट अप्सना आपले उत्पादन परीक्षण करून घेण्यासाठीची महत्त्वाची संधी आहे . केवळ एवढेच नाही तर भारताचे स्वतःचे 5G मानक तयार केले आहे ती आपल्या देशासाठी मोठ्या अभिमानाची गोष्ट आहे. देशातील गावागावांमध्ये 5G तंत्रज्ञान पोचवण्यात आणि त्या कामात हे मोठी भूमिका निभावेल.

भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाच्या (ट्राय) रौप्य महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमाला पंतप्रधानांनी केले संबोधित

May 17th, 10:07 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाच्या (TRAI) रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमाला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित केले. यानिमित्त एका टपाल तिकीटाचे देखील त्यांनी अनावरण केले. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव, देवुसिंह चौहान आणि एल मुरुगन आणि दूरसंचार आणि प्रसारण क्षेत्रातील उद्योजक यावेळी उपस्थित होते.

भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाच्या 17मे रोजी होणाऱ्या रौप्यमहोत्सवी कार्यक्रमाला पंतप्रधान करणार संबोधित

May 16th, 04:15 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी 17 मे 2022 रोजी सकाळी 11 वाजता दृकश्राव्य माध्यमाद्वारे भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाच्या (TRAI) रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमाला संबोधित करणार आहेत. या सोहळ्यानिमित्ताने एका विशेष टपाल तिकीटाचेही प्रकाशन पंतप्रधान करणार आहेत