टॉयकेथॉन -2021 मध्ये पंतप्रधानांनी केलेले भाषण
June 24th, 11:21 am
आपल्याकडे म्हटले जाते -'साहसे खलु श्री: वसति' म्हणजे साहसातच समृद्धी वास करते. आव्हानाच्या या काळात देशाच्या पहिल्या टॉयकेथॉनचे आयोजन हीच भावना दृढ करत आहे. या टॉयकेथॉन मध्ये आपले बाल मित्र, युवा मित्र, शिक्षक, स्टार्ट अप्स आणि उद्योजकही उत्साहाने सहभागी झाले. पहिल्या वेळेलाच दीड हजारहून अधिक संघ अंतिम फेरीत सहभागी होणे म्हणजे उज्वल भविष्याचे संकेत होय. खेळणी आणि गेम्स, आत्मनिर्भर भारत अभियानालाही बळकटी देतात. यामध्ये काही मित्रांच्या उत्तम कल्पना सामोऱ्या आल्या आहेत. काही जणांशी संवाद साधण्याची संधी मला मिळाली. मी आपणा सर्वांचे पुन्हा एकदा अभिनंदन करतो.टॉयकेथॉन -2021 मध्ये सहभागी झालेल्यांशी पंतप्रधानांनी साधला संवाद
June 24th, 11:16 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज टॉयकेथॉन -2021 मध्ये सहभागी झालेल्यांशी दुरदृष्य प्रणालीद्वारे संवाद साधला. केंद्रीय मंत्री पियुष गोयल आणि संजय धोत्रे यावेळी उपस्थित होते.पंतप्रधान 24 जून रोजी टॉयकेथॉन -2021 च्या सहभागींशी साधणार संवाद
June 22nd, 12:25 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी 24 जून रोजी सकाळी 11 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे टॉयकेथॉन -2021 मधील सहभागींशी संवाद साधणार आहेत.