पर्यटनाचा मिशन मोडवर विकास साधणे या विषयावर आयोजित केलेल्या अर्थसंकल्पोत्तर वेबिनारमध्ये पंतप्रधानांनी केलेलं संबोधन
March 03rd, 10:21 am
या वेबिनार मध्ये उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे स्वागत आहे. आजचा नवा भारत नव्या कार्यसंस्कृतीसह पुढे वाटचाल करत आहे. यावेळच्या अर्थसंकल्पाचीही खूप प्रशंसा झाली आहे, देशातील लोकांनी या अर्थसंकल्पाला खूप सकारात्मकपणे घेतलं आहे. देशात जुनी कार्य संस्कृती असती तर अर्थसंकल्पाबाबत अशा प्रकारचे वेबिनार आयोजित करण्याचा कुणी विचारही केला नसता. मात्र आज आमचं सरकार अर्थसंकल्पाच्या आधी आणि अर्थसंकल्पानंतरही अर्थसंकल्पाशी संबंधित प्रत्येक भागधारकाशी विस्तृत चर्चा करत असते, या सर्वांना सोबत घेऊन जायचा प्रयत्न करत असते. अर्थसंकल्पातून जास्तीत जास्त फलनिष्पत्ती कशी करता येईल, अर्थसंकल्पाची अंमलबजावणी निर्धारित कालमर्यादेच्या आत कशी पूर्ण होईल याबाबत, तसच अर्थसंकल्पातून मांडण्यात आलेली उद्दिष्ट साध्य करण्यासाठी, अशा प्रकारचे वेबिनार उत्प्रेरकाप्रमाणे काम करतात. आपण हे जाणताच की सरकारचा प्रमुख म्हणून(गुजरातचे मुख्यमंत्री आणि भारताचे पंतप्रधान म्हणून) काम करण्याचा मला वीस वर्षाहून जास्त अनुभव आहे. या अनुभवाचं सार हे आहे की जेव्हा कुठल्याही धोरणात्मक निर्णयाशी त्या निर्णयाशी संबंधित भागधारक सुद्धा जोडले जातात, सहभागी होतात तेव्हा त्या धोरणाचे परिणाम सुद्धा मनासारखे आणि वेळेत मिळतात. आपण पाहत आहात की गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या वेबिनार मध्ये आमच्या सोबत हजारो लोक सहभागी झाले, संपूर्ण दिवसभरात सर्वांनी मिळून खूप विचार मंथन केलं आणि मी हे सांगू शकतो की खूपच महत्त्वपूर्ण सूचना या वेबिनार मधून मांडल्या गेल्या आणि विशेष करुन आगामी काळाच्या अनुषंगाने पुढे आल्या. या वेबिनार मधून, जो अर्थसंकल्प आहे त्यावरच फक्त लक्ष केंद्रित केलं गेलं आणि त्यातूनच प्राप्त परिस्थितीत कसं पुढे जाता येईल याबद्दल खूप उत्तम सूचना आल्या. आज आता आपण देशाच्या पर्यटन क्षेत्राचा कायापालट करण्याबाबत विचार मंथन करण्यासाठी हा वेबिनार करत आहोत.‘मिशन मोडमध्ये पर्यटन विकास’ या विषयावरील अर्थसंकल्पोत्तर वेबिनारला पंतप्रधानांनी केले संबोधित
March 03rd, 10:00 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मिशन मोडमध्ये पर्यटनाचा विकास’ या विषयावरील अर्थसंकल्पोत्तर वेबिनारला आज संबोधित केले. केंद्रीय अर्थसंकल्प 2023 मध्ये घोषित करण्यात आलेल्या उपक्रमांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी कल्पना आणि सूचना प्राप्त करण्यासाठी केंद्र सरकारद्वारे आयोजित 12 अर्थसंकल्पोत्तर वेबिनार्सच्या मालिकेतील हे सातवे वेबिनार आहे.पंतप्रधान येत्या 13 डिसेंबर रोजी वाराणसी इथे श्री काशी विश्वनाथ धाम चे उदघाटन करणार
December 12th, 03:49 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्यापासून म्हणजेच येत्या 13- 14 डिसेंबर रोजी वाराणसीला भेट देणार आहेत. 13 डिसेंबर रोजी दुपारी एक वाजताच्या सुमाराला, पंतप्रधान श्री काशी विश्वनाथाच्या मंदिरात जाऊन पूजा-अर्चना करतील आणि त्यानंतर ते काशी विश्वनाथ धाम च्या पहिल्या टप्प्यातील इमारतींचे उद्घाटन करतील. सुमारे 339 कोटी रुपये खर्चून हा प्रकल्प उभारण्यात आला आहे.गुजरातमधल्या सोमनाथ इथे विविध प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करताना पंतप्रधानांनी केलेले संबोधन
August 20th, 11:01 am
जय सोमनाथ ! या कार्यक्रमात सहभागी झालेले आदरणीय लालकृष्ण आडवाणी, देशाचे गृहमंत्री अमित शहा, श्रीपाद नाईक, अजय भट्ट, गुजरातचे मुख्यमंत्री विजय जी, गुजरातचे उपमुख्यमंत्री नितिन भाई, गुजरात सरकारचे पर्यटन मंत्री जवाहर जी, वासन भाई, लोकसभेतले माझे सहकारी राजेशभाई, सोमनाथ मंदिर ट्रस्टचे ट्रस्टी प्रवीण लाहिरी, भाविकजन, बंधू-भगिनींनो,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सोमनाथ इथे विविध प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी
August 20th, 11:00 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमधल्या सोमनाथ इथे विविध प्रकल्पांचे दूरदृश्य प्रणालीद्वारे उद्घाटन आणि पायाभरणी केली. सोमनाथ प्रोमनेड, सोमनाथ प्रदर्शन केंद्र आणि पुनर्बांधणी केलेल्या जुन्या सोमनाथ मंदिर परिसराचा उद्घाटन करण्यात आलेल्या प्रकल्पांमध्ये समावेश आहे. पंतप्रधानांनी यावेळी श्री पार्वती मंदिराची पायाभरणीही केली. लाल कृष्ण अडवाणी, केंद्रीय गृह मंत्री, केंद्रीय पर्यटन मंत्री यांच्यासह गुजरातचे मुख्यमंत्री आणि उपमुख्य मंत्रीही या कार्यक्रमाला उपस्थित होते.पंतप्रधान 20 ऑगस्ट रोजी सोमनाथ येथे विविध प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करणार
August 18th, 05:57 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी 20 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे गुजरातमधील सोमनाथ येथे विविध प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करणार आहेत. सोमनाथ प्रोमनेड, सोमनाथ प्रदर्शन केंद्र आणि पुनर्बांधणी केलेल्या जुन्या सोमनाथच्या मंदिर परिसराचा उद्घाटन केले जाणाऱ्या प्रकल्पांमध्ये समावेश आहे. या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान श्रीपार्वती मंदिराची पायाभरणीही करणार आहेत.