बर्मिंगहॅम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये सहभागी झालेल्या भारतीय खेळाडूंशी पंतप्रधानांनी साधलेला संवाद

August 13th, 11:31 am

सर्वांशी बोलणं माझ्यासाठी अत्यंत प्रेरणादायक असतं, मात्र सर्वांशी बोलणं शक्य नसतं. तरी वेगवेगळ्या वेळी आपल्यापैकी अनेक जणांशी कोणत्या ना कोणत्या स्वरुपात संपर्कात राहण्याची मला संधी मिळाली आहे, बोलण्याची संधी मिळाली आहे, पण माझ्यासाठी ही आनंदाची गोष्ट आहे, की वेळात वेळ काढून तुम्ही माझ्या निवासस्थानी आलात आणि परिवाराच्या सदस्याच्या रुपात आले आहात. तर, तुमच्या यशाचा जसा प्रत्येक हिंदुस्तानी नागरिकाला अभिमान आहे, तसाच मला देखील तुमच्याशी जोडले जाण्याचा अभिमान आहे. तुम्हां सर्वांचं माझ्याकडे खूप-खूप स्वागत आहे.

राष्ट्रकुल स्पर्धा 2022 च्या भारतीय पथकाचा पंतप्रधानांनी केला सत्कार

August 13th, 11:30 am

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा(CWG) 2022 मध्ये सहभागी झालेल्या भारतीय पथकाचा आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या सत्कार सोहळ्यामध्ये क्रीडापटू आणि त्यांचे प्रशिक्षक सहभागी झाले होते. केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा आणि माहिती आणि प्रसारणमंत्री अनुरागसिंह ठाकूर आणि युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री निशिथ प्रामाणिक या सोहळ्याला उपस्थित होते.

गुजरातमध्ये 11व्या क्रीडा महाकुंभच्या उद्‌घाटनप्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण

March 12th, 06:40 pm

गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत जी, इथले लोकप्रिय मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल जी, माझे संसदेतील सहकारी आणि भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सी आर पाटील जी, गुजरात सरकारमधील क्रीडा राज्यमंत्री हर्ष संघवी जी, संसदेतील माझे सहकारी हसमुख भाई पटेल जी. , नरहरी अमीन आणि अहमदाबादचे महापौर किरीट कुमार परमार जी, इतर मान्यवर आणि गुजरातच्या कानाकोपऱ्यातून आलेले माझे तरुण मित्र!

11 व्या खेळ महाकुंभाचे उद्घाटन झाल्याची पंतप्रधानांनी केली घोषणा

March 12th, 06:30 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अहमदाबाद येथे 11 व्या खेळ महाकुंभाची सुरुवात करून दिली. याप्रसंगी गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत आणि गुजरात राज्याचे मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

उत्तर प्रदेशातील मेरठ येथे मेजर ध्यानचंद क्रीडा विद्यापीठाच्या पायाभरणी प्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण

January 02nd, 01:01 pm

उत्तर प्रदेशच्या राज्यपाल श्रीमती आनंदीबेन पटेल जी, येथील लोकप्रिय आणि उत्साही मुख्यमंत्री श्री योगी आदित्यनाथ जी, उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य जी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी श्री संजीव बाल्यान जी, व्ही के सिंहजी, मंत्री श्री दिनेश खटीकजी , श्री उपेंद्र तिवारीजी, श्री कपिल देव अग्रवालजी , संसदेतील माझे सहकारी श्री सत्यपाल सिंहजी , राजेंद्र अग्रवालजी , विजयपाल सिंह तोमरजी , श्रीमती कांता कर्दमजी , आमदार भाई सोमेंद्र तोमरजी , संगीत सोमजी , जितेंद्र सतवालजी, सत्य प्रकाश अग्रवालजी, मेरठ जिल्हा परिषद अध्यक्ष गौरव चौधरीजी, मुझफ्फरनगर जिल्हा परिषद अध्यक्ष वीरपालजी, इतर सर्व लोकप्रतिनिधी आणि मेरठ-मुझफ्फरनगर, दूरदूरवरून आलेल्या माझ्या प्रिय बंधू-भगिनींनो, तुम्हा सर्वांना 2022 च्या खूप खूप शुभेच्छा.

उत्तर प्रदेशात मेरठ येथे मेजर ध्यानचंद क्रीडा विद्यापीठाची पंतप्रधानांच्या हस्ते पायाभरणी

January 02nd, 01:00 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशात मेरठ येथे मेजर ध्यानचंद क्रीडा विद्यापीठाची पायाभरणी केली.अंदाजे 700 कोटी रुपये खर्चून या क्रीडा विद्यापीठाची स्थापना करण्यात येईल आणि सिंथेटिक हॉकी मैदान, फुटबॉल मैदान, बास्केटबॉल/व्हॉलीबॉल/हँडबॉल/कबड्डी मैदान, लॉन टेनिस कोर्ट, जिम्नॅशियम हॉल, सिंथेटिक रनिंग स्टेडियम, जलतरण तलाव, बहुउद्देशीय सभागृह आणि सायकल शर्यतीसाठी असणारे रिंगण यासह आधुनिक आणि अत्याधुनिक क्रीडा पायाभूत सुविधांनी हे विद्यापीठ सुसज्ज असेल. विद्यापीठात नेमबाजी, स्क्वॉश, जिम्नॅस्टिक्स, भारोत्तोलन, तिरंदाजी, कॅनोईंग आणि कयाकिंग इत्यादी सुविधाही उपलब्ध असतील.या विद्यापीठात 540 महिला आणि 540 पुरुष खेळाडूंसह 1080 खेळाडूंना प्रशिक्षण देण्याची क्षमता असेल.

पंतप्रधानांनी नागरिकांना स्मृतिचिन्हांच्या लिलावात सहभागी होण्याचे केले आवाहन

September 19th, 11:13 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेटवस्तू आणि स्मृतिचिन्हांच्या लिलावात नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. ते म्हणाले की, ही रक्कम नमामि गंगे उपक्रमाला दिली जाणार आहे.

शिक्षक पर्व परिषदेच्या उद्‌घाटन सोहळ्यात पंतप्रधानांनी केलेले भाषण

September 07th, 10:31 am

शिक्षक पर्व या महत्त्वाच्या कार्यक्रमात माझ्यासोबत सहभागी झालेले केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारीश्री धर्मेंद्र प्रधान,श्रीमती अन्नपूर्णा देवी ,डॉ. सुभास सरकार, डॉ. राजकुमार रंजन सिंह, देशाच्या विविध राज्यातील माननीय शिक्षकवर्ग, राष्ट्रीय शिक्षण धोरणाचा आराखडा तयार करणाऱ्या समितीचे अध्यक्ष डॉ. कस्तुरीरंगन, त्यांच्या टीममधील सर्व मान्यवर सन्माननीय सदस्य, संपूर्ण देशभरातून आपल्यासोबत उपस्थित असलेले सर्व विद्वान प्राचार्यवर्ग, शिक्षकवर्ग आणि प्रिय विद्यार्थ्यांनो,

पंतप्रधानांनी शिक्षक पर्व परिषदेच्या उद्‌घाटन समारंभास केले संबोधित

September 07th, 10:30 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिक्षक पर्व परिषदेच्या उद्‌घाटन समारंभास आभासी माध्यमातून (व्हिडिओ कॉन्फरन्सिंग) संबोधित केले. भारतीय सांकेतिक भाषा शब्दकोष (श्रवण दोष असलेल्यांसाठी ऑडिओ आणि मजकूर अंतर्भूत असलेली सांकेतिक भाषा व्हिडिओ, वैश्विक शिक्षण रचनेला अनुरूप), बोलणारी पुस्तके (दृष्टिहीनांसाठी ऑडिओ बुक्स), सीबीएसईच्या शालेय गुणपत्ता हमी आणि मूल्यांकन आराखडा, NISHTHA - निपुण भारत (NIPUN Bharat) आणि विद्यांजली पोर्टल साठी शिक्षकांचा प्रशिक्षण कार्यक्रम (शालेय विकासासाठी शिक्षण स्वयंसेवक / देणगीदार/व्यावसायिक सामाजिक जबाबदारीतून योगदान देणाऱ्यांच्या सोयीसाठी) आदी उपक्रमांचेही पंतप्रधानांनी उद्‌घाटन केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिनांक 29 ऑगस्ट 2021 रोजी आकाशवाणीवरून देशाच्या नागरिकांना “मन की बात” द्वारे केलेले संबोधन

August 29th, 11:30 am

आज मेजर ध्यानचंद जी यांची जयंती आहे, हे आपल्या सर्वांना माहिती आहे, आणि आपला देश त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा करीत आहे. माझ्या मनात विचार आला की, सध्या जिथं कुठं मेजर ध्यानचंद जी यांचा आत्मा असेल, तिथं त्यांना खूप प्रसन्न वाटत असणार. कारण संपूर्ण दुनियेमध्ये भारताच्या हॉकीचा डंका बजावण्याचं काम ध्यानचंद जी यांच्या हॉकीनं केलं होतं. आणि आज चार दशकांनंतर, जवळ-जवळ 41 वर्षांनी भारताच्या नवयुवकांनी, पुत्रांनी आणि कन्यांनी हॉकी खेळामध्ये पुन्हा एकदा प्राण फुंकले आहेत. देशानं कितीही पदकांची कमाई केली तरी जोपर्यंत हॉकीमध्ये देशाला पदक मिळत नाही, तोपर्यंत कोणाही भारतीयांना विजयाचा आनंद घेता येत नाही. आणि यावेळच्या ऑलिंपिकमध्ये भारताला चार दशकांनंतर हॉकीचं पदक मिळालं. भारताच्या या विजयामुळं मेजर ध्यानचंद जी यांच्या हृदयाला, आत्म्याला, ते जिथं कुठं असतील, तिथं त्यांना किती आनंद वाटला असेल, त्यांचा आत्मा किती प्रसन्न झाला असेल, याची कल्पना तुम्ही मंडळी करू शकता. ध्यानचंद जीं नी आपलं संपूर्ण जीवन खेळाला समर्पित केलं होतं. आणि म्हणूनच, आज ज्यावेळी देशाचे नवयुवक, आपली मुलं-मुली, यांच्यामध्ये खेळाविषयी जे आकर्षण दिसून येतं, त्याचबरोबर मुलं जर खेळामध्ये चांगलं प्रदर्शन करून पुढं जात असताना मुलांचे आई-वडीलही आनंद व्यक्त करीत असतील, तर मला वाटतं की, आज मुलांमध्ये खेळाविषयी जो उत्साह दिसून येतोय, तो पाहिल्यावर मला वाटतं की, हीच मेजर ध्यानचंद जी यांना खूप मोठी श्रद्धांजली आहे.

पॅरालिम्पिकमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या भाविना पटेलचे पंतप्रधानांकडून अभिनंदन

August 28th, 01:18 pm

पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी पॅरालिम्पिकमधील महिलांच्या टेबल टेनिस स्पर्धेत अंतिम फेरीत धडक मारल्याबद्दल भाविना पटेलचे अभिनंदन केले आहे.आणि उद्या होणाऱ्या अंतिम फेरीच्या सामन्यात यशस्वी होण्यासाठी भाविनाच्या पाठीशी संपूर्ण देशाच्या शुभेच्छा असल्याचे म्हटले आहे.

पंतप्रधानांनी पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धेच्या सुरवातीला भारतीय चमूला दिल्या शुभेच्छा

August 24th, 04:15 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टोकियो येथे पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धेत सहभागी झालेल्या भारतीय चमूला शुभेच्छा दिल्या आहेत.

टोक्यो 2020 पॅरालिम्पिक स्पर्धेत सहभागी होणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या चमूशी संवाद साधताना पंतप्रधानांनी केलेले भाषण

August 17th, 11:01 am

कार्यक्रमात माझ्याबरोबर सहभागी झालेले भारत सरकार मधील आपले क्रीडा मंत्री अनुराग ठाकुर, सर्व खेळाडू, सर्व प्रशिक्षक आणि विशेषत: तुमचे पालक, तुमचे आई वडील. तुम्हा सर्वांशी बोलल्यामुळे माझा विश्वास वाढला आहे, यावेळी पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धैतही भारत नवा इतिहास रचणार आहे. मी आपल्या सर्व खेळाडूंना आणि सर्व प्रशिक्षकांना तुमच्या यशासाठी, देश विजयी होण्यासाठी अनेक शुभेच्छा देतो.

टोक्यो 2020 पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धेत सहभागी होणाऱ्या भारतीय दिव्यांग खेळाडूंशी पंतप्रधानांनी साधला संवाद

August 17th, 11:00 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज टोक्यो 2020 पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धेत सहभागी होणाऱ्या भारतीय दिव्यांग खेळाडूंचे पथक,त्यांचे कुटुंबीय, पालक आणि प्रशिक्षक यांच्याशी दूर दृश्य प्रणाली द्वारे संवाद साधला. केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा तसेच माहिती प्रसारण मंत्री अनुराग सिंह ठाकूर यावेळी उपस्थित होते.

Exclusive Pictures! PM Modi meets Olympians who made India proud!

August 16th, 10:56 am

A day after praising them from the ramparts of the Red Fort and getting the whole nation to applaud them, Prime Minister Narendra Modi met the Indian athletes who participated in the Olympics and made India proud.Here are some exclusive pictures from the event!

पंतप्रधानांकडून टोक्यो 2020 मधील सर्वोत्तम प्रदर्शनासाठी भारतीय क्रीडापटूंचे अभिनंदन

August 08th, 06:24 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑलिम्पिक स्पर्धेत अप्रतिम कामगिरी केल्याबद्दल भारतीय क्रीडापटूंचे अभिनंदन केले आहे. टोक्यो 2020 च्या समारोनिमित्त पंतप्रधान म्हणाले, भारताचे प्रतिनिधीत्व केलेला प्रत्येक क्रीडापटू चॅम्पियन आहे.

टोकियो ऑलिम्पिक 2020 स्पर्धेत भालाफेकमध्ये सुवर्णपदक जिंकल्याबद्दल नीरज चोप्राचे पंतप्रधानांकडून अभिनंदन

August 07th, 06:12 pm

टोकियो ऑलिम्पिक 2020 स्पर्धेत भालाफेकमध्ये सुवर्णपदक जिंकल्याबद्दल नीरज चोप्राचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे. नीरजने अतिशय उत्कटतेने खेळ करत अतुलनीय धैर्य दाखवले असे पंतप्रधानांनी म्हटले आहे. .

टोकियो ऑलिम्पिक 2020 स्पर्धेत कुस्तीमध्ये कांस्यपदक जिंकल्याबद्दल बजरंग पुनियाचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन

August 07th, 05:49 pm

टोकियो ऑलिम्पिक 2020 मध्ये कुस्तीमध्ये कांस्य पदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बजरंग पुनियाचे अभिनंदन केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोल्फर आदिती अशोकचे केले कौतुक

August 07th, 11:22 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोल्फर आदिती अशोकचे, टोक्यो ऑलिंपिक स्पर्धेतील तिच्या क्रीडाकौशल्याचे आणि निश्चयाचे कौतुक केले आहे.

खेल रत्न पुरस्काराचे आता मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कार म्हणून नामकरण – पंतप्रधान

August 06th, 02:15 pm

खेल रत्न पुरस्कारांना मेजर ध्यानचंद यांचे नाव देण्याची विनंती नागरिकांकडून केली जात होती. लोक भावनांचा आदर करत खेल रत्न पुरस्काराला आता मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कार म्हणून संबोधले जाईल असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.