Fact Sheet: 2024 Quad Leaders’ Summit

September 22nd, 12:06 pm

President Biden hosted the fourth Quad Leaders’ Summit with leaders from Australia, Japan, and India in Wilmington, Delaware. The Quad continues to be a global force for good, delivering projects across the Indo-Pacific to address pandemics, natural disasters, maritime security, infrastructure, technology, and climate change. The leaders announced new initiatives to deepen cooperation and ensure long-term impact, with commitments to secure robust funding and promote interparliamentary exchanges. Quad Commerce and Industry ministers are set to meet for the first time in the coming months.

दीपाली झवेरी आणि ओटा यांना जपानच्या जोटो फायर स्टेशनचा पुरस्कार मिळाल्याबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला आनंद

April 06th, 09:47 am

टोकियोत गेल्या ऑक्टोबरमधे दांडिया मस्ती 2022 वेळी, सीपीआर आणि एईडी देऊन एका व्यक्तीचा जीव वाचवल्याबद्दल भारतीय नागरिक दिपाली झवेरी आणि ओटा यांना जपानच्या जोटो फायर स्टेशनचा पुरस्कार मिळाला आहे. याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला.

जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्या शासकीय इतमामातील अंत्यसंस्कारांना पंतप्रधान उपस्थित

September 27th, 04:34 pm

टोक्यो येथील निप्पॉन बुडोकान येथे जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्या शासकीय इतमामातील अंत्यसंस्कारांना पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते. शिंजो आबे यांच्या शासकीय इतमामातील अंत्यसंस्कारांना 20 हून अधिक देश /सरकारांच्या प्रमुखांसह 100 हून अधिक देशांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जापानच्या पंतप्रधानांसोबत भेट

September 27th, 09:54 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जपानचे पंतप्रधान माननीय फुमियो किशिदा यांची आज त्यांच्या जपान दौऱ्यादरम्यान भेट घेतली. माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले. भारत आणि जापान यांच्यातील भागीदारी बळकट करण्यासाठी तसेच मुक्त आणि सर्वसमावेशक हिंद-प्रशांत क्षेत्राच्या संकल्पनेत दिवंगत पंतप्रधान आबे यांच्या योगदानाचा पंतप्रधानांनी यावेळी आवर्जून उल्लेख केला.

PM Modi arrives in Tokyo, Japan

September 27th, 03:49 am

Prime Minister Narendra Modi arrived in Tokyo, Japan. He will attend the State Funeral ceremony of former Japanese PM Shinzo Abe.

जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्या शासकीय इतमामात होणाऱ्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहण्यासाठी पंतप्रधान आज रात्री टोकियोला रवाना होणार

September 26th, 06:04 pm

जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्या शासकीय इतमामात होणाऱ्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री जपानमधील टोकियो इथे रवाना होतील.

राष्ट्रकूल क्रीडा स्पर्धा-2022 मध्ये सहभागी होणार्‍या भारतीय पथकाबरोबर 20 जुलै रोजी पंतप्रधान साधणार संवाद

July 18th, 05:06 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी 20 जुलै 2022 रोजी सकाळी 10 वाजता राष्ट्रकूल क्रीडा स्पर्धा- 2022 मध्ये सहभागी होणाऱ्या भारतीय पथकाशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधतील. या संवादाला सर्व खेळाडू तसेच त्यांचे प्रशिक्षक उपस्थित राहणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे 44 व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडच्या मशाल रिले उद्‌घाटन प्रसंगी भाषण

June 19th, 05:01 pm

बुद्धिबळ ऑलिंपियाड या आंतरराष्ट्रीय कार्यक्रमात उपस्थित केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी, आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाचे अध्यक्ष आर्केडी द्वोरकोविच, अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाचे अध्यक्ष, विविध देशांचे राजदूत, उच्चायुक्त, बुद्धीबळ आणि इतर खेळांशी संबंधित संस्थांचे प्रतिनिदही, राज्य सरकारमधील प्रतिनिधी, इतर सर्व मान्यवर, बुद्धिबळ ऑलिम्पियाड संघाचे सदस्य आणि बुद्धीबळाचे इतर खेळाडू, बंधू आणि भगिनींनो !

PM launches historic torch relay for 44th Chess Olympiad

June 19th, 05:00 pm

Prime Minister Modi launched the historic torch relay for the 44th Chess Olympiad at Indira Gandhi Stadium, New Delhi. PM Modi remarked, We are proud that a sport, starting from its birthplace and leaving its mark all over the world, has become a passion for many countries.”

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्यासोबत बैठक

May 24th, 11:00 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जोसेफ आर. बायडन यांच्यात आज, 24 मे 2022 रोजी टोक्यो इथे, अत्यंत सौहार्दपूर्ण आणि फलदायी बैठक झाली. या बैठकीतून जे भक्कम फलित आलेले आहे, त्यामुळे दोन्ही देशांमधील द्वीपक्षीय भागीदारी अधिक घट्ट आणि गतिमान होण्यास मदत होईल.

अमेरिका सरकार आणि भारत सरकार यांच्यात गुंतवणूक प्रोत्साहन करार (IIA)

May 23rd, 06:25 pm

भारत सरकार आणि अमेरिका सरकारने आज, जपानमधील टोक्यो येथे गुंतवणूक प्रोत्साहन करारावर(IIA)स्वाक्षरी केली आहे. या गुंतवणूक प्रोत्साहन करारावर (IIA) भारत सरकारचे परराष्ट्र सचिव श्री. विनय क्वात्रा आणि यू.एस. इंटरनॅशनल डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन (DFC) चे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. स्कॉट नाथन यांनी स्वाक्षरी केली.

हिंद-प्रशांत आर्थिक चौकटीच्या घोषणेच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलेले मनोगत

May 23rd, 05:25 pm

आज या महत्त्वपूर्ण कार्यक्रमात आपणां सर्वांबरोबर सहभागी होताना मला अतिशय आनंद होत आहे. IPEF ची उद्घोषणा म्हणजे हिंद प्रशांत क्षेत्रास जागतिक आर्थिक वृद्धीचे इंजिन म्हणून पुढे आणण्याच्या सामूहिक इच्छेचे प्रतिबिंब होय. या महत्त्वाच्या उपक्रमासाठी मी राष्ट्राध्यक्ष बायडन यांचा अतिशय आभारी आहे. हिंद-प्रशांत क्षेत्र हे कारखानदारी, आर्थिक व्यवसाय, जागतिक व्यापार आणि गुंतवणूक यांचे केंद्र आहे. अनेक शतकांपासून व्यापाराच्या ओघाचे भारत हे महत्त्वाचे केंद्र आहे, इतिहास याचा साक्षीदार आहे. भारतात माझ्या मूळ राज्यात- म्हणजे गुजरातमध्ये असलेले लोथल, हे जगातील सर्वात प्राचीन व्यापारी बंदर आहे, याचा उल्लेख येथे केलाच पाहिजे. म्हणूनच या प्रदेशाच्या आर्थिक आव्हानांवर आपण सामायिक आणि सर्जनात्मक क्लृप्त्या लढवणे आवश्यक ठरते.

पंतप्रधानांनी भूषविले टोकियोमध्ये व्यापार गोलमेज परिषदेचे अध्यक्षस्थान

May 23rd, 04:12 pm

जपानच्या 34 कंपन्यांचे उच्चपदस्थ अधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी या परिषदेत सहभागी झाले होते. यापैकी बहुतांश कंपन्यांनी भारतात गुंतवणूक केली असून, त्यांचा कारभारही भारतात चालतो. वाहन उद्योग, इलेक्ट्रॉनिक्स, अर्धवाहक, पोलाद, तंत्रज्ञान, व्यापार, बँकिंग आणि वित्तपुरवठा अशा विविध क्षेत्रांमध्ये या कंपन्या काम करतात. भारतातील आणि जपानमधील व्यापारविषयक महत्त्वाच्या संस्था- जसे- केडॅन्रन, जेट्रो म्हणजेच जपानी परकीय व्यापार संघटना, जपान आंतरराष्ट्रीय सहकार्य संस्था, जपान आंतरराष्ट्रीय सहकार्य बँक, जपान-भारत व्यापार सल्ला समिती आणि इन्व्हेस्ट इंडिया- या संस्थाही यात सहभागी झाल्या होत्या.

हिंद प्रशांत क्षेत्राच्या समृद्धीसाठीची आर्थिक रचना (IPEF)

May 23rd, 02:19 pm

हिंद प्रशांत क्षेत्राच्या समृद्धीसाठी आर्थिक रचना (IPEF) याविषयी चर्चेचा प्रारंभ करण्यासाठी जपानमध्ये टोकियो येथे आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सहभागी झाले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जोसेफ बायडन आणि जपानचे पंतप्रधान किशिदा फुमिओ हेही यावेळी उपस्थित होते. तसेच, ऑस्ट्रेलिया, ब्रुनेई, इंडोनेशिया, कोरियन प्रजासत्ताक, मलेशिया, न्यूझीलंड, फिलिपिन्स, सिंगापूर, थायलंड, आणि व्हिएतनाम हे अन्य भागीदार देशही यावेळी आभासी माध्यमातून सहभागी झाले होते.

एनईसी कॉर्पोरेशनचे अध्यक्ष डॉ. नोबुहिरो यांची पंतप्रधानांनी घेतली भेट

May 23rd, 12:23 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एनईसी कॉर्पोरेशनचे अध्यक्ष डॉ. नोबुहिरो एन्डो यांची 23 मे 2022 रोजी टोकियोमध्ये भेट घेतली. भारतीय दूरसंचार क्षेत्रातील, विशेषतः चेन्नई-अंदमान आणि निकोबार द्वीप समूह (CANI) आणि कोची-लक्षद्वीप बेटे (KLI) येथे सुरु केलेल्या ऑप्टीकल फायबर केबल प्रकल्पांमधील एनईसी च्या भूमिकेची पंतप्रधानांनी प्रशंसा केली. उत्पादनाशी निगडीत प्रोत्साहन (PLI) योजनेतील गुंतवणुकीच्या संधींचा देखील प्रधानमंत्र्यांनी विशेष उल्लेख केला.

जपान दौऱ्यावर जाण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रसिद्ध केलेले निवेदन

May 22nd, 12:16 pm

जपानचे पंतप्रधान, माननीय फुमिओ कीशिदा यांच्या आमंत्रणावरुन, मी येत्या 23-24 मे 2022 रोजी जपानची राजधानी तोक्यो इथे जाणार आहे.

छोट्या रकमेच्या ऑनलाईन व्यवहारांमुळे मोठ्या डिजिटल अर्थव्यवस्थेची उभारणीः पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये

April 24th, 11:30 am

मित्रहो, देशाच्या पंतप्रधानांच्या योगदानाचे स्मरण करण्यासाठी स्वातंत्र्यप्राप्तीचा अमृत महोत्सव हाच सर्वात उचित काळ आहे, असे मला वाटते.स्वातंत्र्यप्राप्तीच्या अमृत महोत्सवाला लोक चळवळीचे स्वरूप येते आहे, ही देशासाठी अभिमानाची बाब आहे. इतिहासाबद्दल लोकांची उत्सुकता बरीच वाढते आहे आणि अशा परिस्थितीत देशाच्या अनमोल वारशाशी जोडणारे हे प्रधानमंत्री संग्रहालय युवा वर्गासाठीही आकर्षणाचे केंद्र ठरत आहे.

14 वी भारत- जपान वार्षिक शिखर परिषद (19 मार्च 2022; नवी दिल्ली)

March 17th, 08:29 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निमंत्रणावरून जपानचे पंतप्रधान महामहीम एच.ई. किशिदा फुमियो यांनी 14 व्या भारत-जपान वार्षिक शिखर परिषदेसाठी 19-20 मार्च 2022 दरम्यान नवी दिल्लीला अधिकृत भेट दिली. ही शिखर परिषद दोन्ही नेत्यांची पहिली भेट होती. यापूर्वीची भारत-जपान वार्षिक शिखर परिषद ऑक्टोबर 2018 मध्ये टोकियो येथे झाली होती.

भारतीय पॅरालिम्पिक दलाला केले आमंत्रित

September 09th, 02:41 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टोक्यो पॅरालिम्पिक 2020 खेळातील भारतीय चमूला आज सकाळी त्यांच्या निवासस्थानी आमंत्रित केले होते. या चमूमध्ये पॅरा-क्रीडापटू तसेच प्रशिक्षकांचा देखील समावेश होता.

एक्सक्लुझिव्ह छायाचित्रेः पॅरालिम्पिक्स विजेत्यांबरोबरची अविस्मरणीय बातचीत!

September 09th, 10:00 am

2020 च्या टोक्यो पॅरालिम्पिक्समध्ये सहभागी होऊन जागतिक पटलावर देशासाठी अभिमानास्पद कामगिरी केलेल्या भारतीय पॅरालिम्पिक्स विजेत्यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी भेट झाली.