पंतप्रधान येत्या 20-21 जानेवारीला, तामिळनाडू इथल्या विविध मंदिरांत जाऊन घेणार देवदर्शन

January 18th, 06:59 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी, येत्या 20 -21 जानेवारी 2024 रोजी, तामिळनाडूतील काही महत्वाच्या मंदिरात दर्शन देणार आहेत.

तमिळनाडूमध्ये तरुणाईसाठी उपक्रम आयोजित करून 2024 या वर्षाचा आरंभ केल्याबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला अभिमान

January 02nd, 05:27 pm

तामिळनाडूमध्ये आणि तरुणाईसाठी आयोजित केलेल्या सार्वजनिक कार्यक्रमाने नवीन वर्षाची सुरुवात केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद आणि अभिमान व्यक्त केला आहे.

तामिळनाडूतील तिरुचिरापल्ली येथे पायाभरणी आणि विकास कामांचे उद्घाटन करतानाचे पंतप्रधानांचे भाषण

January 02nd, 12:30 pm

तामीळनाडूचे राज्यपाल श्री. आर. एन. रवीजी, मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिनजी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी, ज्योतिरादित्य सिंधिया जी आणि या मातीतील माझे सहकारी, एल. मुरुगन जी, तामीळनाडू सरकारमधील मंत्री, खासदार आणि आमदार, आणि तामीळनाडूतील माझ्या कुटुंबियांनो!

पंतप्रधानांच्या हस्ते तामिळनाडूतील तिरुचिरापल्ली येथे 20,000 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन, लोकार्पण आणि पायाभरणी

January 02nd, 12:15 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तामिळनाडूतील तिरुचिरापल्ली येथे 20,000 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन, लोकार्पण आणि पायाभरणी केली. विकास प्रकल्पांमध्ये तामिळनाडूमधील रेल्वे, रस्ते, तेल आणि वायू आणि जहाजबांधणी क्षेत्रांचा समावेश आहे.

भारतीदासन विद्यापीठ, तिरुचिरापल्लीच्या 38 व्या दीक्षांत समारंभात पंतप्रधानांनी केलेले मार्गदर्शन

January 02nd, 11:30 am

एनदु माणव कुडुम्बमे, भारतीदासन विद्यापीठाच्या 38व्या दीक्षांत समारंभाला उपस्थित राहणे माझ्यासाठी खास आहे. 2024 मधील हा माझा पहिला सार्वजनिक संवाद आहे.तामिळनाडू या सुंदर राज्यात आणि तरुणांमध्ये आल्याबद्दल मला आनंद आहे. येथे दीक्षांत समारंभाला येण्याचा बहुमान मिळालेला मी पहिला पंतप्रधान आहे हे जाणूनही मला आनंद झाला. या महत्त्वाच्या प्रसंगी मी पदवीधर विद्यार्थी, त्यांचे पालक आणि प्राध्यापक यांचे अभिनंदन करतो.

पंतप्रधानांनी तामिळनाडूमधील तिरुचिरापल्ली येथील भारतीदासन विद्यापीठाच्या 38 व्या पदवीदान समारंभाला केले संबोधित

January 02nd, 10:59 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तामिळनाडूमधील तिरुचिरापल्ली येथील भारतीदासन विद्यापीठाच्या 38 व्या पदवीदान समारंभाला संबोधित केले. याप्रसंगी त्यांनी विद्यापीठातील गुणवंत विद्यार्थ्यांना पुरस्कार देखील प्रदान केले.

पंतप्रधान 2 आणि 3 जानेवारी 2024 रोजी तामिळनाडू, लक्षद्वीप आणि केरळला भेट देणार

December 31st, 12:56 pm

2 जानेवारी 2024 रोजी, सकाळी 10:30 वाजता, पंतप्रधान तिरुचिरापल्ली, तामिळनाडू येथे पोहोचतील. तिरुचिरापल्ली येथील भारतीदासन विद्यापीठाच्या 38 व्या दीक्षांत समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी होणार आहेत. पंतप्रधान दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास तिरुचिरापल्ली येथे एका सार्वजनिक कार्यक्रमात विमान वाहतूक, रेल्वे, रस्ते, तेल आणि वायू, नौवहन तसेच उच्च शिक्षण क्षेत्राशी संबंधित 19,850 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या अनेक विकास प्रकल्पांची पायाभरणी, उद्घाटन तसेच लोकार्पण करतील. दुपारी 3.15 च्या सुमारास पंतप्रधान लक्षद्वीप मधील अगत्ती येथे पोहोचतील. तिथे ते एका सार्वजनिक कार्यक्रमाला संबोधित करतील. 3 जानेवारी, 2024 रोजी, दुपारी 12 वाजता, पंतप्रधान लक्षद्वीपमधील कवरत्ती येथे पोहोचतील. लक्षद्वीपशी येथील कार्यक्रमात ते दूरसंचार, पेयजल, सौर ऊर्जा आणि आरोग्य यासारख्या इतर क्षेत्रांशी संबंधित अनेक विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण करतील.