राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना तिमोर लेस्तेच्या सर्वोच्च ‘कॉलर ऑफ दि ऑर्डर’ पुरस्काराने गौरवण्यात आल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला अभिमान

August 11th, 11:07 am

तिमोर लेस्ते या राष्ट्राचा सर्वोच्च नागरी पुरस्कार समजल्या जाणाऱ्या ‘कॉलर ऑफ दि ऑर्डर’ पुरस्काराने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना गौरवण्यात आल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका ट्विटच्या माध्यमातून अभिमान व्यक्त केला आहे. या प्रतिष्ठेच्या सन्मानाने भारत आणि तिमोर लेस्ते या देशांमधील खोलवर रुजलेले बंध आणि परस्परांप्रती असलेला आदर अधोरेखित होत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

तिमोर-लेस्टेच्या राष्ट्राध्यक्षांसोबत पंतप्रधानांची बैठक

January 09th, 11:16 am

गांधीनगर येथे होणाऱ्या दहाव्या व्हायब्रंट गुजरात जागतिक शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी तिमोर-लेस्टेचे राष्ट्राध्यक्ष डॉ. जोस रामोस होर्टा हे 8-10 जानेवारी 2024 या कालावधीत भारत दौऱ्यावर आले आहेत.