थुथुकुडी (तुतीकोरीन) येथे विविध प्रकल्पांच्या पायाभरणी/उद्घाटन/राष्ट्रार्पणप्रसंगी पंतप्रधानांच्या भाषणाचा मजकूर

February 28th, 10:00 am

मंचावर उपस्थित, तामिळनाडूचे राज्यपाल श्री आर एन रवी जी, माझे सहकारी सर्बानंद सोनोवाल जी, श्रीपाद नाईक जी, शांतनू ठाकूर जी, एल मुरुगन जी, राज्य सरकारचे मंत्री, इथले खासदार, इतर मान्यवर आणि सभ्य स्त्री-पुरूषहो, वणक्कम!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तमिळनाडूमधील थुथुकुडी येथे 17,300 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या विविध विकास प्रकल्पांची केली पायाभरणी आणि राष्ट्र समर्पण.

February 28th, 09:54 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तामिळनाडूमधील थुथुकुडी येथे 17,300 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या अनेक विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि राष्ट्राला अर्पण केले. पंतप्रधानांनी व्ही.ओ.चिदंबरनार बंदर येथे आऊटर हार्बर कंटेनर टर्मिनलची पायाभरणी केली. हरित नौका उपक्रमांतर्गत पंतप्रधानांनी देशांतर्गत जलमार्गाने चालणाऱ्या भारतातील पहिल्या स्वदेशी हरित हायड्रोजन इंधनावरील जहाजाचा प्रारंभ केला. 10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 75 दीपगृहांमधील पर्यटन सुविधांचे राष्ट्रार्पण पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आले. पंतप्रधानांनी वंची मनियाच्ची - तिरुनेलवेली विभाग आणि मेलाप्पलयम - अरल्वायमोली विभागातील रेल्वे प्रकल्पासह वांची मनियाच्ची - नागरकोइल रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाचे देखील राष्ट्राला समर्पित केले. पंतप्रधानांनी तामिळनाडूमध्ये सुमारे 4,586 कोटी रुपये खर्चून विकसित केलेले चार रस्ते प्रकल्पांचे लोकार्पणही केले.