तंजावर खरंच विलोभनीय आहे: पंतप्रधान
December 08th, 09:40 pm
हॉलिवूड अभिनेता मायकेल डग्लस यांच्या तंजावर भेटीवरील सोशल मीडिया पोस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर दिले आहे.चेन्नईच्या विविध प्रकल्पांचे उद्घाटन / हस्तांतरण / पायाभरणी कार्यक्रमात पंतप्रधानांनी केलेले भाषण
February 14th, 11:31 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते चेन्नई येथे आज मुख्य प्रकल्पांचा पायाभरणी आणि उद्घाटन समारंभ पार पडला आणि त्यांच्या हस्ते लष्कराला अर्जुन मेन बॅटल टँक (एम के – 1 ए) सुपूर्त करण्यात आला.पंतप्रधानांच्या हस्ते तामिळनाडूमध्ये महत्त्वाच्या प्रकल्पांचा पायाभरणी आणि उद्घाटन समारंभ संपन्न
February 14th, 11:30 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते चेन्नई येथे आज मुख्य प्रकल्पांचा पायाभरणी आणि उद्घाटन समारंभ पार पडला आणि त्यांच्या हस्ते लष्कराला अर्जुन मेन बॅटल टँक (एम के – 1 ए) सुपूर्त करण्यात आला.पंतप्रधान येत्या 14 फेब्रुवारीला तामिळनाडू आणि केरळच्या दौऱ्यावर जाणार
February 12th, 06:10 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 14 फेब्रुवारीला तामिळनाडू आणि केरळचा दौरा करणार आहेत. यावेळी 14 तारखेला सकाळी 11 च्या सुमाराला चेन्नईत पंतप्रधानांच्या हस्ते महत्वाच्या प्रकल्पांचे लोकार्पण होईल आणि अनेक प्रकल्पांचा कोनशिला समारंभही होईल. तसेच अर्जुन मेन बॅटल टँक लष्कराला सुपूर्द करण्याचा समारंभही त्यांच्या हस्ते होईल. त्यानंतर दुपारी साडेतीन वाजताच्या सुमाराला पंतप्रधान कोच्ची येथे विविध प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमिपूजन करतील. या प्रकल्पांमुळे दोन्ही राज्यांच्या विकासाला महत्वाची गती मिळेल आणि या राज्यांची विकासक्षमता पूर्णपणे वापरण्याचा वेग वाढेल.स्थानिक खेळण्यांना वाव देण्यासाठी त्यांचा प्रसार करण्याची (व्होकल फॉर लोकल होण्याची) वेळ आली आहे – पंतप्रधानांनी ‘मन की बात’ मध्ये व्यक्त केले मत
August 30th, 03:43 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ‘मन की बात’ या आकाशवाणी कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवासियांशी संवाद साधला. विविध विषयांबरोबरच त्यांनी या ताज्या कार्यक्रमामध्ये मुलांच्या खेळण्यांविषयी मनोगत व्यक्त केले. गांधीनगरची ‘चिल्ड्रेन युनिव्हर्सिटी, महिला आणि बाल विकास मंत्रालय, शिक्षण मंत्रालय आणि सूक्ष्म-लघू आणि मध्यम उद्योग मंत्रालयाने मुलांसाठी चांगल्या दर्जाची खेळणी कशी बनविणे आवश्यक आहे, याविषयी काम केल्याचे सांगितले. खेळणी निर्मिती, उत्पादनामध्ये भारत एक मोठे केंद्र कसे बनू शकते, याच्याविषयी काम करीत असल्याचे सांगितले. मुलांच्या दृष्टीने खेळणी म्हणजे केवळ वेगवेगळ्या क्रियाकलापांचे साधन नाही, तर बालकांच्या आकांक्षांना पंख लावण्याचे काम खेळणी करतात. खेळण्यांमुळे मुलांचे केवळ मन रमते, मुलांचे मनोरंजन होते, असे नाही, तर खेळणी मुलांच्या मनाची निर्मिती करतात, त्यांना काही करण्याचा हेतू निर्माण करतात, असे पंतप्रधान यावेळी म्हणाले.