
पंतप्रधान मोदी आणि ट्रम्प यांनी घडवून आणली MEGA भारत-अमेरिका भागीदारी
February 14th, 06:46 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच अमेरिकेला दिलेली भेट ही दोन्ही राष्ट्रांमधील धोरणात्मक, आर्थिक आणि सांस्कृतिक संबंध दृढ होत असल्याचे प्रतिबिंबित करणारा एक महत्त्वाचा प्रसंग होता. त्यांच्या मुक्कामात, पंतप्रधान मोदींनी संरक्षण, व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञान आणि मुत्सेद्दीगिरी यासारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांसंदर्भात, अमेरिकेतील नेते, व्यापारी आणि भारतीय समुदायातील यांच्याशी हाय-प्रोफाइल गाठीभेटी घेऊन त्यांच्याशी चर्चा केल्या. या भेटीने भारत आणि अमेरिका यांच्यातील मजबूत संबंधांवर शिक्कामोर्तब झाले तसेच नवीन जागतिक व्यवस्थेला आकार देण्यात दोन्ही देशांची जागतिक भागीदार म्हणून प्रतिमा निर्माण झाली .
बिनीचे उद्योजक एलॉन मस्क यांनी घेतली पंतप्रधान मोदी यांची भेट
June 21st, 08:22 am
अमेरिकेतील आघाडीचे उद्योजक, तंत्रज्ञान क्षेत्रातील धुरीण, टेस्ला आयएनसी आणि सस्पेसएक्स चे मुख्य कार्यकारी अधिकारी, सीटीओचे मालक, ट्वीटरचे अध्यक्ष, बोरिंग कंपनी आणि एक्स कॉर्पचे संस्थापक, नौरालिंक आणि ओपन एआय चे सह-संस्थापक एलॉन मस्क यांनी आज न्यूयॉर्क इथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
पंतप्रधानांनी विज्ञान, तंत्रज्ञान आणि उद्योग क्षेत्रात मूल्य निर्मितीचे चक्र अधिक मजबूत करण्यासाठी वैज्ञानिक समुदायाला केले आवाहन
January 04th, 03:15 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मोठ्या प्रमाणात निर्मिती करण्यासाठी विज्ञानाच्या मूल्य-निर्मिती चक्राला प्रोत्साहन देण्यासाठी वैज्ञानिक समुदायाला प्रेरित केले. ते आज राष्ट्रीय मेट्रोलॉजी (मापनशास्त्र) परिषद 2021 मध्ये बोलत होते. यावेळी त्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे राष्ट्रीय अणु टाइमस्केल आणि भारतीय निर्देशक द्रव्य प्रणाली राष्ट्राला समर्पित केली आणि राष्ट्रीय पर्यावरण मानक प्रयोगशाळेची पायाभरणी केली.राष्ट्रीय मापन शास्त्र परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण
January 04th, 11:01 am
राष्ट्रीय भौतिक प्रयोगशाळेच्या हीरक महोत्सवी समारंभाच्या तुम्हा सर्वांना खूप-खूप शुभेच्छा . आज आपले वैज्ञानिक ‘राष्ट्रीय आण्विक कालदर्शिका’ आणि ‘भारतीय निर्देशक द्राव्य प्रणाली' राष्ट्राला समर्पित करत आहेत आणि त्याचबरोबर देशाच्या पहिल्या राष्ट्रीय पर्यावरणीय मानक प्रयोगशाळेची पायाभरणी देखील झाली आहे. नव्या दशकात हे शुभारंभ, देशाचा गौरव वाढवणार आहेत.राष्ट्रीय मापन शास्त्र परिषदेच्या बैठकीत पंतप्रधानांचे उद्घाटनपर भाषण
January 04th, 11:00 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय मापन शास्त्र परिषद 2021 ला उद्घाटनपर भाषणाने संबोधित केले. याप्रसंगी त्यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे राष्ट्रीय अणु कालमापक आणि भारतीय निर्देशक द्रव्य प्रणाली राष्ट्राला अर्पण केली तसेच राष्ट्रीय पर्यावरणीय मानक प्रयोगशाळेची कोनशीला बसविली. ही परिषद नवी दिल्लीच्या सीएसआयआर-एनपीएल अर्थात वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन मंडळ -राष्ट्रीय भौतिक प्रयोगशाळा यांनी त्यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित केली होती. ‘देशाच्या सर्वसमावेशक विकासासाठी मापनशास्त्र’ ही या वर्षीच्या परिषदेची संकल्पना होती. केंद्रीय मंत्री डॉ.हर्ष वर्धन आणि मुख्य शास्त्रीय सल्लागार डॉ.विजय राघवन या प्रसंगी उपस्थित होते.PM’s engagements in NYC and San Jose,California – September 26th, 2015
September 26th, 07:33 pm