Today India is working in every sector, in every area with unprecedented speed: PM at NDTV World Summit
October 21st, 10:25 am
Prime Minister Narendra Modi addressed the NDTV World Summit 2024. “Today, India is working in every sector and area with unprecedented speed”, the Prime Minister said. Noting the completion of 125 days of the third term of the government, PM Modi threw light on the work done in the country.Prime Minister Shri Narendra Modi addresses NDTV World Summit 2024 in New Delhi
October 21st, 10:16 am
Prime Minister Narendra Modi addressed the NDTV World Summit 2024. “Today, India is working in every sector and area with unprecedented speed”, the Prime Minister said. Noting the completion of 125 days of the third term of the government, PM Modi threw light on the work done in the country.The goal should be to ensure that no country, region, or community is left behind in the digital age: PM Modi
October 15th, 10:05 am
Prime Minister Modi inaugurated the International Telecommunication Union-World Telecommunication Standardization Assembly and India Mobile Congress in New Delhi. In his address, he highlighted India's transformative achievements in connectivity and telecom reforms. The Prime Minister stated that the government has made telecom a means of equality and opportunity beyond just connectivity in the country.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्ली येथे आयटीयू जागतिक दूरसंचार मानकीकरण सभा 2024चे केले उद्घाटन
October 15th, 10:00 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघ- जागतिक दूरसंचार मानकीकरण सभा (WTSA) 2024चे उद्घाटन केले. कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान मोदी यांनी 8व्या इंडिया मोबाइल काँग्रेसचे उद्घाटनही केले. यावेळी प्रदर्शनाची पाहणी त्यांनी केली.पंतप्रधान 15 ऑक्टोबर रोजी नवी दिल्ली येथे आंतरराष्ट्रीय दूरसंचार महासंघ जागतिक दूरसंचार मानकीकरण परिषद 2024 चे करणार उद्घाटन
October 14th, 05:31 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी 15 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे आंतरराष्ट्रीय दूरसंचार महासंघ जागतिक दूरसंचार मानकीकरण परिषद (डब्ल्यूटीएसए) 2024 चे उद्घाटन करतील.इंडिया सेमीकंडक्टर मिशन अंतर्गत आणखी एका सेमीकंडक्टर युनिटला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
September 02nd, 03:32 pm
एक भक्क्कम सेमीकंडक्टर परिसंस्था विकसित करण्याच्या उद्देशाने, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने गुजरातमधील साणंद येथे सेमीकंडक्टर युनिट स्थापन करण्यासाठी केन्स सेमिकॉन प्रायव्हेट लिमिटेडच्या प्रस्तावाला मंजुरी दिली.भारत आणि सौदी अरेबिया यांच्यात गुंतवणूकविषयक उच्च स्तरीय कृती दलाच्या पहिल्या बैठकीचे आयोजन
July 28th, 11:37 pm
भारत-सौदी अरेबियाच्या गुंतवणूकविषयक उच्चस्तरीय कृती दलाची पहिली बैठक, पंतप्रधानांचे प्रधान सचिव डॉ.पी.के. मिश्रा आणि सौदी अरेबियाचे ऊर्जा मंत्री प्रिन्स अब्दुल अजीझ बिन सलमान बिन अब्दुल अजीझ अल सौद यांच्या सहअध्यक्षतेखाली आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून झाली.अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारानी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घेतली भेट
June 17th, 07:44 pm
अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिवन यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.'भारताचे तंत्रज्ञान युग: चिप्स फॉर डेव्हलप्ड इंडिया' कार्यक्रमाला पंतप्रधानांनी दूरदृश्य प्रणाली द्वारे केलेले संबोधन
March 13th, 11:30 am
आजचा दिवस ऐतिहासिक आहे. आज आपण इतिहास घडवला आहे, आणि उज्ज्वल भविष्याच्या दिशेने एक खूप मोठे, ठोस पाउलही उचलले आहे. आज सेमी कंडक्टर उत्पादनाशी संबंधित जवळजवळ सव्वा लाख कोटी रुपयांच्या तीन मोठ्या प्रकल्पांची पायाभरणी झाली. गुजरातमधील धोलेरा आणि साणंद येथील सेमी-कंडक्टर सुविधा असो, की आसाममधील मोरीगाव येथील सेमी-कंडक्टर सुविधा, यामुळे भारताला सेमी-कंडक्टर उत्पादनाचे मोठे जागतिक केंद्र बनविण्यामध्ये मदत होईल. या महत्वाच्या उपक्रमासाठी, एका महत्वाच्या सुरुवातीसाठी, एक मजबूत पाउल उचलल्याबद्दल, हा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल, मी सर्व देशवासीयांचे अभिनंदन करतो. आजच्या कार्यक्रमात तैवानचे आमचे एक मित्र देखील दूरस्थ पद्धतीने सहभागी झाले आहेत. भारताच्या या प्रयत्नांमुळे मलाही उत्साह वाटत आहे.भारताचे तंत्रज्ञान युग: चिप्स फॉर विकसित भारत’ या कार्यक्रमात पंतप्रधान सहभागी
March 13th, 11:12 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून ‘भारताचे तंत्रज्ञान युग: चिप्स फॉर विकसित भारत’ या कार्यक्रमाला संबोधित केले आणि सुमारे 1.25 लाख कोटी रुपये मुल्यांच्या तीन सेमीकंडक्टर प्रकल्पांची पायाभरणी केली.यात गुजरात येथील धोलेरा विशेष गुंतवणूक क्षेत्र (डीएसआयआर ) येथे सेमीकंडक्टर उत्पादन सुविधा, आसाममधील मोरीगाव येथे बाह्यस्त्रोत सेमीकंडक्टर जोडणी आणि चाचणी (ओएसएटी) सुविधा आणि गुजरातमधील साणंद आउटसोर्स्ड सेमीकंडक्टर असेंब्ली आणि टेस्ट (ओएसएटी)) सुविधा या सुविधांचा समावेश आहे.भारताच्या सेमीकंडक्टर मिशनसाठी गरुड झेप : मंत्रिमंडळाने आणखी तीन सेमीकंडक्टर युनिटना दिली मंजुरी
February 29th, 03:57 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने ‘भारतात सेमीकंडक्टर्स आणि डिस्प्ले उत्पादक परिसंस्थेचा विकास’ उपक्रमा अंतर्गत तीन सेमीकंडक्टर युनिट्सच्या स्थापनेला मंजुरी दिली. येत्या 100 दिवसांत या तीनही युनिटच्या उभारणीला सुरूवात केली जाणार आहे.सातव्या इंडिया मोबाईल काँग्रेसच्या उद्घाटन प्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण
October 27th, 10:56 am
सातव्या इंडिया मोबाईल काँग्रेसच्या या उद्घाटन प्रसंगी आपल्या सर्वांची भेट होणे हा माझ्यासाठी एक सुखद अनुभव आहे. 21 व्या शतकात वेगाने बदलणाऱ्या जगात या कार्यक्रमात कोट्यवधी लोकांचे भाग्य बदलण्याची क्षमता आहे. एक काळ होता जेव्हा आपण भविष्याच्या गोष्टी करत असू, तर त्याचा अर्थ पुढचे दशक, किंवा 20-30 वर्षांनंतरचा काळ, किंवा मग पुढचे शतक असा असायचा. मात्र, आज प्रत्येक दिवशी तंत्रज्ञानात वेगाने होत जाणाऱ्या परिवर्तनामुळे आपण म्हणतो, ‘भविष्य आता इथेच अवतरले आहे.’पंतप्रधानांच्या हस्ते सातव्या भारत मोबाईल काँग्रेस(आयएमसी) चे उद्घाटन
October 27th, 10:35 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीत भारत मंडपम येथे सातव्या भारत मोबाईल काँग्रेस 2023 संमेलनाचे उद्घाटन केले. भारत मोबाईल काँग्रेस (आयएमसी) या आशियातील सर्वात मोठ्या दूरसंचार, माध्यमे आणि तंत्रज्ञानविषयक मंचाचे ‘जागतिक डिजिटल नवोन्मेष’ या संकल्पनेवर आधारित संमेलन 27 ते 29 ऑक्टोबर 2023 या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे. महत्त्वाच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील विकासक, उत्पादक आणि निर्यातक म्हणून भारताचे स्थान बळकट करणे हे या आयएमसी2023 च्या आयोजनाचे उद्दिष्ट आहे. या कार्यक्रमात पंतप्रधानांनी देशभरातील शैक्षणिक संस्थांना शंभर ‘5जी युज केस प्रयोगशाळां’ची देणगी दिली.ब्रिक्स बिझनेस फोरम लीडर्स डायलॉग या ब्रिक्स समुहातील आघाडीच्या व्यावसायिकांसोबत झालेल्या संवादसत्रात पंतप्रधानांचे निवेदन
August 22nd, 10:42 pm
दक्षिण आफ्रिकेच्या भूमीवर पाऊल ठेवताच आमचा कार्यक्रम ब्रिक्स व्यवसाय मंचाने सुरू होत आहे याचा मला आनंद आहे.ब्रिक्स व्यापार मंच नेत्यांच्या संवादात पंतप्रधान सहभागी
August 22nd, 07:40 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 22 ऑगस्ट 2023 रोजी जोहान्सबर्ग इथे ब्रिक्स व्यापार मंच नेत्यांच्या संवादात सहभागी झाले.आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघाचे क्षेत्रीय कार्यालय आणि नवोन्मेष केंद्र यांच्या उद्घाटन सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं भाषण
March 22nd, 03:34 pm
आजचा दिवस खूप विशेष आहे, खूप पवित्र आहे. आज पासून हिंदू कालगणनेच्या नव्या वर्षाची सुरुवात होत आहे. मी आपणा सर्वांना आणि सर्व देशवासियांना विक्रम संवत्सर 2080 या वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. आपल्या एवढ्या विशाल देशामध्ये, विविधतेनं नटलेल्या देशामध्ये, युगानुयुगे वेगवेगळ्या प्रकारच्या कालगणना प्रचलित आहेत. कोल्लम कालगणनेची मल्याळम दिनदर्शिका आहे, तामिळ कालगणना आहे. या सर्व कालगणना, शेकडो वर्षांपासून भारताला तिथीं बद्दलची माहिती आणि ज्ञान पुरवत आल्या आहेत. विक्रम संवत्सर सुद्धा 2080 वर्ष आधीपासून चालत आलं आहे. ग्रेगरियन कालगणनेनुसार सध्या 2023 हे वर्ष सुरू आहे, मात्र विक्रम संवत्सर, 2023 च्या 57 वर्ष आधीपासून आहे. मला या गोष्टीचा खूप आनंद होतोय की नववर्षाच्या पहिल्याच दिवशी, दूरसंचार, माहिती संवाद तंत्रज्ञान आणि या गोष्टींशी संलग्न नवोन्मेष यांच्या बाबतीत खूपच मोठी सुरुवात भारतात होत आहे. आज इथे, आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघ- आय टी यू चं क्षेत्रीय कार्यालय आणि फक्त क्षेत्रीय कार्यालयच नाही, तर क्षेत्रीय कार्यालया सोबत नवोन्मेष केंद्राची स्थापना झाली आहे. याबरोबरच आज 6-जी चाचणी उपकरणाचही (टेस्ट बेड) उद्घाटन झालं आहे. या तंत्रज्ञानाचा उपयोग करु पाहणाऱ्या आपल्या व्हिजन डॉक्युमेंट म्हणजेच उद्दिष्टनाम्याचं अनावरण सुद्धा करण्यात आलं आहे. यामुळे डिजिटल भारताला नवी ऊर्जा मिळण्यासोबतच, दक्षिण आशियासाठी, दक्षिण जगतासाठी, नवे उपाय, नवे नवोन्मेष उपलब्ध होणार आहेत. विशेष करून आपलं शैक्षणिक क्षेत्र, आपले नवंउद्योजक(स्टार्ट अप्स), नवोन्मेषक, आपलं उद्योगजगत यांच्यासाठी नवनव्या संधी निर्माण होणार आहेत.आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघ (ITU)चं नवे क्षेत्रीय कार्यालय आणि नवोन्मेष केंद्र यांचं पंतप्रधानांनी केलं उद्घाटन
March 22nd, 12:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीत विज्ञान भवनात झालेल्या एका कार्यक्रमात, आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघ ( इंटरनॅशनल टेलीकम्युनिकेशन युनियन-ITU ) चे नवे क्षेत्रीय कार्यालय आणि नवोन्मेष केंद्र यांचं उद्घाटन केलं.पंतप्रधानांनी भारत 6G व्हिजन डॉक्युमेंट या भविष्यकालीन आराखड्याच्या उद्दिष्टनाम्याचही अनावरण केलं आणि 6G च्या संशोधन आणि विकास चाचणी उपकरणाचं (टेस्ट बेड) उद्घाटन केलं. खोदकामांच्या अनुषंगानं सार्वजनिक सुरक्षिततेच्या दृष्टीनं संपर्क व्यवस्था उपलब्ध करून देणाऱ्या ‘कॉल बिफोर यू डिग’ या अॅपचही उद्घाटन, त्यांनी केलं. ITU, ही माहिती आणि संवाद तंत्रज्ञान (इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी-ICT) साठी, संयुक्त राष्ट्रांनी स्थापन केलेली विशेष संस्था आहे. क्षेत्रीय कार्यालयाच्या स्थापनेसाठी, भारतानं ITU सोबत मार्च 2022 मध्ये, यजमान देश करारावर स्वाक्षरी केली. यामुळे, भारत, नेपाळ, भूतान, बांगलादेश, श्रीलंका, मालदीव, अफगाणिस्तान आणि इराण या देशांना सेवा मिळून, या राष्ट्रांमधील आपापसातील समन्वय आणि या प्रदेशांना परस्पर लाभदायक ठरणारं आर्थिक सहकार्य वाढेल.पंतप्रधान नरेंद्र मोदी 22 मार्च रोजी आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघटना आय टी यू च्या क्षेत्रीय कार्यालयाचे आणि नवोन्मेष केंद्राचे उद्घाटन करणार
March 21st, 04:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी 22 मार्च रोजी दुपारी साडे बारा वाजता नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे आयोजित कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघटना आय टी यू च्या भारतातील क्षेत्रीय कार्यालयाचे आणि नवोन्मेष केंद्राचे उद्घाटन करणार आहेत. पंतप्रधान, भारत 6G पथदर्शी दस्तावेज आणि 6G संशोधन आणि विकास टेस्ट बेड ह्या सुविधेचे अनावरण करतील. पंतप्रधानांच्या हस्ते ‘कॉल बिफोर यू डिग’ ॲप चे अनावरण देखील होणार आहे. यावेळी पंतप्रधान उपस्थितांना संबोधित करणार आहेत.The strong ties which India and Germany share are based on shared democratic values: PM Modi
February 25th, 01:49 pm
Prime Minister Narendra Modi held fruitful talks with German Chancellor Olaf Scholz in New Delhi. The talks between the two leaders covered the entire gamut of bilateral ties as well as key regional and global issues. He said there has been active cooperation between India and Germany in the fight against terrorism and separatism, and that both countries agreed that concrete action is necessary to end cross-border terrorism.Double engine government is committed to the development of Arunachal Pradesh: PM Modi in Itanagar
November 19th, 09:40 am
PM Modi inaugurated Donyi Polo Airport, Itanagar and dedicated 600 MW Kameng Hydro Power Station to the nation. “Our government worked by considering the villages in the border areas as the first village of the country. This has resulted in making the development of the Northeast a priority for the government,” the PM remarked addressing a gathering at the inaugural event.