पंतप्रधानांनी घेतली फॉक्सकॉनच्या अध्यक्षांची भेट

March 01st, 01:43 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्ली येथे होन हाय टेक्नॉलॉजी समूहाचे (फॉक्सकॉन) अध्यक्ष यंग लिऊ यांची भेट घेतली. त्यांनी भारतातील तंत्रज्ञान आणि नवनिर्मिती परिसंस्था वाढवण्याच्या उद्देशाने विविध विषयांवर चर्चा केली.