
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आसाम, गुवाहाटी मध्ये झुमोईर बिनंदिनी कार्यक्रमात केलेले भाषण
February 24th, 06:40 pm
आसामचे राज्यपाल श्री लक्ष्मण प्रसाद आचार्यजी ऊर्जावान मुख्यमंत्री हेमंत बिस्वा जी, केंद्र सरकारातील माझे साथीदार डॉ. एस जयशंकर, सर्बानंद सोनोवाल, त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक साहा जी, इतर मंत्री, खासदार, आमदार, सर्व कलाकार साथी आणि आसामच्या माझ्या बंधु भगिनींनो ..
पंतप्रधान नरेंद्र मोदी आसाममध्ये गुवाहाटीत झुमर बिनंदिनी कार्यक्रमात झाले सहभागी
February 24th, 06:39 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आसामध्ये गुवाहाटी येथे झुमर बिनंदिनी 2025 या भव्य झुमर कार्यक्रमात सहभागी झाले. या समारंभाला संबोधित करताना ते म्हणाले की या ठिकाणी सर्वत्र ऊर्जा, उत्साह आणि रोमांचाने भरून गेलेले नादमाधुर्याचे वातावरण आहे. झुमरमधील सर्वच कलाकारांनी अतिशय उत्तम तयारी केली आहे ज्यामधून चहाच्या मळ्यांचा सुगंध आणि सौंदर्य प्रतिबिंबित होत आहे,असे त्यांनी नमूद केले. झुमर आणि चहाच्या मळ्यांची संस्कृती यांच्याशी ज्या प्रकारे येथील लोकांचे विशेष नाते आहे, तशाच प्रकारचे आपलेही नाते आहे, असे त्यांनी सांगितले. इतक्या मोठ्या संख्येने आज झुमर नृत्यात सहभागी झालेले कलाकार एक विक्रम प्रस्थापित करतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली 2023 मध्ये आपण आसामला दिलेल्या भेटीच्या वेळी बिहू नृत्यात 11,000 कलाकार सहभागी झाले होते याची आठवण करून देत पंतप्रधानांनी सांगितले की कधीही विसरता येणार नाहीत अशा त्या आठवणी होत्या आणि यावेळी देखील तशाच प्रकारचे मंत्रमुग्ध करणारे सादरीकरण असेल, अशी आपल्याला अपेक्षा आहे. अतिशय मनोहारी सांस्कृतिक सादरीकरणाचे आयोजन केल्याबद्दल त्यांनी आसाम सरकार आणि त्यांच्या मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन केले. या आनंदोत्सवात चहाच्या मळ्यातील कामगार समुदाय आणि आदिवासी जनता सहभागी होत असल्याने आजचा दिवस आसामसाठी अतिशय अभिमानाचा दिवस असेल असे त्यांनी नमूद केले. या विशेष दिनाच्या निमित्ताने त्यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या.
राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभारदर्शक ठरावावरील चर्चेला पंतप्रधानांनी लोकसभेमध्ये दिलेले उत्तर
February 04th, 07:00 pm
आदरणीय राष्ट्रपति जी यांच्या संबोधनाबाबत आभार व्यक्त करण्यासाठी मी उपस्थित आहे. काल आणि आज,काल तर रात्री उशिरापर्यंत सर्व माननीय खासदारांनी आपले विचार मांडून हा आभार प्रस्ताव समृद्ध केला. अनेक माननीय अनुभवी खासदारांनीही आपले विचार व्यक्त केले आणि हे स्वाभाविक आहे, लोकशाहीची परंपराही आहे, जिथे आवश्यक होते तिथे प्रशंसा झाली, जिथे व्यथा जाणवली तिथे काही नकारात्मक गोष्टीही मांडल्या गेल्या आणि हे अतिशय स्वाभाविक आहे ! अध्यक्ष जी माझे मोठे भाग्य आहे की देशातल्या जनतेने मला या स्थानावर बसून राष्ट्रपती जी यांच्या संबोधनाबाबत आभार व्यक्त करण्याची 14 वेळा संधी दिली आणि म्हणूनच आज जनता जनार्दनाचेही अतिशय आदराने मी आभार मानतो आणि सदनातल्या चर्चेत जे-जे सदस्य सहभागी झाले,चर्चा समृद्ध केली, त्या सर्वांचे मी आभार मानतो.राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरच्या आभार प्रस्तावावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लोकसभेत निवेदन
February 04th, 06:55 pm
राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरच्या आभार प्रस्तावाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लोकसभेत निवेदन केले. काल आणि आज झालेल्या चर्चेत सहभागी झालेल्या संसद सदस्यांच्या योगदानाची पंतप्रधानांनी प्रशंसा केली. लोकशाहीच्या परंपरेत जिथे आवश्यकता आहे तिथे कौतुकाची थाप आणि गरज असेल तिथे काही कानपिचक्या देणारी वक्तव्ये चर्चेत येणे साहजिक असल्याचे पंतप्रधान भाषणात म्हणाले. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर आभारप्रदर्शनाची संधी जनतेने चौदाव्यांदा देणे हा मी माझा सन्मान समजतो असे सांगून त्यांनी नागरिकांचेही आभार मानले आणि चर्चेत सहभागी झालेल्यांनी त्यांच्या विचारांनी आभारप्रस्तावाला नवी उंची गाठून दिली अशी टिप्पणी त्यांनी केली.आंतरराष्ट्रीय कृषी अर्थशास्त्रज्ञ परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण
August 03rd, 09:35 am
कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री श्री शिवराज सिंह चौहान, कृषी अर्थशास्त्राच्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे अध्यक्ष डॉ. मतीन कैम, नीतीपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी दिल्ली इथे आयोजित कृषी अर्थतज्ज्ञांच्या 32व्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे (आयसीएई) उद्घाटन
August 03rd, 09:30 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील राष्ट्रीय कृषी विज्ञान केंद्राच्या (एनएएससी) संकुलात आयोजित कृषी अर्थतज्ज्ञांच्या 32 व्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे (आयसीएई) उद्घाटन केले. 'शाश्वत कृषी-अन्न व्यवस्थेच्या दिशेने परिवर्तन' ही यंदाच्या परिषदेची संकल्पना आहे. हवामान बदल, नैसर्गिक साधनसंपत्तीचा ऱ्हास, वाढता उत्पादन खर्च आणि उद्भवणारे विविध संघर्ष यांसारख्या जागतिक आव्हानांचा सामना करत, नितांत गरजेची झालेली शाश्वत कृषी व्यवस्था उभारण्यासाठी प्रयत्न करत राहणे हे या संकल्पनेत अ़तर्गतचे उद्दिष्ट आहे. जगभरातील जवळपास 75 देशांचे सुमारे एक हजार प्रतिनिधी या परिषदेत सहभागी झाले आहेत.आसाममध्ये चहाच्या बागांमध्ये काम करणाऱ्या समुदायाच्या मेहनतीचे पंतप्रधानांनी केले कौतुक
March 09th, 02:15 pm
आसामच्या चहाने जगभर आपले स्थान निर्माण केले आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. चहाच्या बागांमध्ये काम करणाऱ्या समुदायाच्या जिद्द आणि कठोर परिश्रमाचे त्यांनी कौतुक केले आहे.