“तौ ते” चक्रीवादळाला तोंड देण्यासाठीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधानांनी घेतली उच्च स्तरीय आढावा बैठक
May 15th, 06:54 pm
ज्या राज्यांमध्ये “तौ ते” चक्रीवादळामुळे विपरीत परिस्थिती निर्माण होऊ शकते अशा राज्यांच्या सरकारांनी आणि त्यासंदर्भात केंद्रीय मंत्रालयांनी/संस्थांनी चक्रीवादळाला तोंड देण्यासाठी केलेल्या तयारीचा आढावा घेण्यासाठी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्ली येथे उच्च स्तरीय बैठक घेतली.