कनेक्टिव्हिटी प्रदान करण्यासाठी आणि वाहतूक सुविधा सुधारण्यासाठी तरंगा टेकडी -अंबाजी-अबू रोड या नवीन रेल्वे मार्गाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

July 13th, 04:15 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीने ,रेल्वे मंत्रालयाद्वारे बांधण्यात येणाऱ्या अंदाजे 2798.16 कोटी रुपये खर्चाच्या तरंगा टेकडी -अंबाजी-अबू रोड या नवीन रेल्वे मार्गाच्या बांधकामाला मंजुरी दिली आहे.