तमिळ कवी सुब्रमण्यम भारती यांच्या संपूर्ण साहित्याच्या संपादित ग्रंथखंडांच्या प्रकाशन कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
December 11th, 02:00 pm
आज देशाचे महाकवी सुब्रमण्यम भारती जी, यांची जयंती साजरी होत आहे. मी सुब्रमण्यम भारती जी यांना श्रद्धापूर्वक वंदन करतो. त्यांना आपली श्रद्धांजली अर्पण करतो. आज भारताच्या संस्कृती आणि साहित्यासाठी, भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील स्मृतीच्या दृष्टीने आणि तामिळनाडूच्या गौरवासाठी एक खूप मोठा दिवस आहे. महाकवी सुब्रमण्यम भारती यांच्या कार्याचे , त्यांच्या साहित्यकृतींचे प्रकाशन म्हणजे, एक खूप मोठा सेवायज्ञ आहे आणि या खूप मोठ्या साधनेला आज पूर्णाहूती दिली जात आहे. 21 खंडांमध्ये ‘कालवरिसैयिल भारतियार पडैप्पुगळ्‘चे संकलन सहा दशकांच्या अथक परिश्रमाचे हे साहस, असामान्य आणि अभूतपूर्व आहे. सीनी विश्वनाथन यांचा हा जो समर्पणाचा भाव आहे, त्यांची ही साधना आहे, हे त्यांनी केलेले परिश्रम आहेत, मला पूर्ण विश्वास आहे की, आगामी पिढ्यांना, त्यांच्या कार्याचा खूप मोठा लाभ मिळणार आहे. आपण कधी कधी एक शब्द ऐकत होतो. ‘वन लाइफ , वन मिशन’! परंतु वन लाइफ वन मिशन नेमके असते तरी काय, हे सीनी यांनी दाखवून दिले. त्यांनी केलेली ही खूप मोठी साधना आहे. त्यांची तपस्या पाहून आज मला महामहोपाध्याय पांडुरंग वामन काणे यांचे स्मरण झाले. त्यांनीही आपल्या आयुष्यातील 35 वर्षे धर्मशास्त्राचा इतिहासाचे लेखन करण्यामध्ये खर्च केले. मला विश्वास आहे, सीनी विश्वनाथन यांचे हे काम अकादमीच्या जगतामध्ये एक ‘बेंच-मार्क’ निश्चित करणारे ठरेल. मी या कार्यासाठी विश्वनाथन जी आणि त्यांचे सर्व सहकारी आणि तुम्हा सर्वांचे खूप खूप अभिनंदन करतो.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महान तमिळ कवी सुब्रह्मण्य भारती यांच्या रचनांच्या संकलनाचे प्रकाशन
December 11th, 01:30 pm
महान तमिळ कवी सुब्रह्मण्य भारती यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहताना मोदी म्हणाले की, भारताची संस्कृती आणि साहित्य, भारताच्या स्वातंत्र्यलढ्याच्या आठवणी आणि तामिळनाडूच्या गौरवासाठी आजचा दिवस ही एक मोठी संधी आहे. महाकवी सुब्रह्मण्य भारती यांच्या कार्याचे प्रकाशन, एक सेवायज्ञ आज पूर्ण होत आहे असे ते म्हणाले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुब्रमण्यम भारती यांना वाहिली आदरांजली
December 11th, 10:27 am
कवी आणि लेखक सुब्रमण्यम भारती यांच्या जयंतीनिमित्तपंतप्रधानांच्या हस्ते 11 डिसेंबरला महान तमिळ कवी आणि स्वातंत्र्यसैनिक सुब्रमण्यम भारती यांच्या संपूर्ण कार्याच्या संग्रहाचे प्रकाशन
December 10th, 05:12 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 11 डिसेंबर रोजी, नवी दिल्लीतील 7 लोक कल्याण मार्ग, येथे दुपारी 1 वाजता महान तमिळ कवी आणि स्वातंत्र्यसैनिक सुब्रमण्य भारती यांच्या संपूर्ण कार्यावरील संग्रहाचे प्रकाशन करण्यात येणार आहे.A part of our vision of Vasudhaiva Kutumbakam is putting our Neighborhood First: PM Modi
October 14th, 08:15 am
Addressing the launch of ferry services between Nagapattinam, India and Kankesanthurai, Sri Lanka PM Modi said that India and Sri Lanka share a deep history of culture, commerce and civilization. Nagapattinam and towns near-by have long been known for sea trade with many countries, including Sri Lanka.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतातील नागापट्टिनम आणि श्रीलंकेतील कानकेसंथुराई, दरम्यानच्या फेरी सेवेच्या उदघाटन समारंभाला केले संबोधित.
October 14th, 08:05 am
भारत आणि श्रीलंका, राजनैतिक आणि आर्थिक संबंध अधिक दृढ करण्याच्या दिशेने एका नवीन अध्यायाला सुरुवात करत असून नागापट्टिनम आणि श्रीलंकेतील कानकेसंथुराई, दरम्यानच्या फेरी सेवेच्या आरंभामुळे दोन्ही देशातील संबंध दृढ करण्याच्या दिशेने एक निर्णायक टप्पा गाठला गेला आहे, असे पंतप्रधान यावेळी आयोजित कार्यक्रमाला संबोधित करताना म्हणाले.श्रीलंकेच्या राष्ट्रपतींच्या भारत भेटीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माध्यमांना दिलेले निवेदन
July 21st, 12:13 pm
राष्ट्रपती विक्रमसिंघे आणि त्यांच्यासोबत आलेल्या प्रतिनिधीमंडळातील सदस्यांचे मी भारतात हार्दिक स्वागत करतो. राष्ट्रपती विक्रमसिंघे त्यांचा एक वर्षांचा कार्यकाळ आज पूर्ण करत आहेत. यानिमित्ताने मी त्यांना आपणा सर्वांकडून हार्दिक शुभेच्छा देतो. मागील वर्ष, श्रीलंकेतील लोकांसाठी अत्यंत आव्हानात्मक होते.एक जवळचा मित्र या नात्याने, नेहमीप्रमाणेच, आम्ही या संकटकाळात सुद्धा श्रीलंकेतील लोकांच्या खांद्याला खांदा भिडवून उभे राहिलो. आणि श्रीलंकेच्या जनतेने ज्या साहसाने या आव्हानात्मक परिस्थितीचा सामना केला त्यासाठी मी त्यांचे मनापासून अभिनंदन करतो.PM Modi interacts with the Indian community in Paris
July 13th, 11:05 pm
PM Modi interacted with the Indian diaspora in France. He highlighted the multi-faceted linkages between India and France. He appreciated the role of Indian community in bolstering the ties between both the countries.The PM also mentioned the strides being made by India in different domains and invited the diaspora members to explore opportunities of investing in India.एसटी संगमम हा गुजरात आणि तामिळनाडू यांच्यातील प्राचीन बंध साजरा करणारा उत्सव: पंतप्रधान
March 19th, 08:49 pm
एसटी म्हणजेच सौराष्ट्र तामिळ संगमम अंतर्गत गुजरात आणि तामिळनाडू या दोन राज्यातील प्राचीन बंध साजरे केले जात आहेत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधोरेखित केले आहे. हा एसटी संगमम, “एक भारत, श्रेष्ठ भारत’ ही भावना साजरा करत आहे, असे ते पुढे म्हणाले.प्राचीन तमिळ संस्कृती जगभरात लोकप्रिय : पंतप्रधान
February 13th, 09:21 am
सिंगापूरचे पंतप्रधान महामहीम ली सिएन लूंग यांच्या ट्विटवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ली सिएन लूंग यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, आपण एएमके, केबुन बारू आणि वायसीके येथील रहिवाशांसह उशीरा पोंगल साजरा केला.गुरुपूजेच्या निमित्ताने स्वातंत्र्यसैनिक,पसुम्पोन मुथुरामलिंगा थेवर यांना पंतप्रधानांनी केले वंदन
October 30th, 12:07 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुपूजेच्या निमित्ताने स्वातंत्र्यसैनिक, पसुम्पोन मुथुरामलिंगा थेवर यांना आदरांजली वाहिली आहे.पंतप्रधानांनी आदी कृतीगाई निमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या
July 23rd, 01:13 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वांना आदी कृतीगाईच्या विशेष दिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.पुथांडूच्या पावन प्रसंगी पंतप्रधानांच्या जनतेला, विशेषतः तमिळ बांधवांना शुभेच्छा
April 14th, 09:35 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुथांडू निमित्त जनतेला विशेषतः तमिळ बंधू -भगिनींना शुभेच्छा दिल्या आहेत.पंतप्रधान 12 जानेवारीला तामिळनाडूमधल्या 11 नवीन वैद्यकीय महाविद्यालयांचे आणि केंद्रीय प्राचीन तमिळ संस्थेच्या नवीन वास्तू-परिसराचे उद्घाटन करणार
January 10th, 12:38 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी, दि. 12 जानेवारी, 2022 रोजी सायंकाळी 4.00 वाजता दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून तामिळनाडूमधल्या 11 नवीन सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांचे आणि चेन्नईच्या केंद्रीय प्राचीन तमिळ संस्थेच्या नवीन वास्तूचे उद्घाटन करणार आहेत.राणी वेलू नचियार यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी त्यांचे पुण्यस्मरण केले
January 03rd, 11:49 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राणी वेलू नचियार यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली अर्पण केली आहे.चेन्नईच्या विविध प्रकल्पांचे उद्घाटन / हस्तांतरण / पायाभरणी कार्यक्रमात पंतप्रधानांनी केलेले भाषण
February 14th, 11:31 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते चेन्नई येथे आज मुख्य प्रकल्पांचा पायाभरणी आणि उद्घाटन समारंभ पार पडला आणि त्यांच्या हस्ते लष्कराला अर्जुन मेन बॅटल टँक (एम के – 1 ए) सुपूर्त करण्यात आला.पंतप्रधानांच्या हस्ते तामिळनाडूमध्ये महत्त्वाच्या प्रकल्पांचा पायाभरणी आणि उद्घाटन समारंभ संपन्न
February 14th, 11:30 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते चेन्नई येथे आज मुख्य प्रकल्पांचा पायाभरणी आणि उद्घाटन समारंभ पार पडला आणि त्यांच्या हस्ते लष्कराला अर्जुन मेन बॅटल टँक (एम के – 1 ए) सुपूर्त करण्यात आला.PM Modi's remarks at joint press meet with PM Rajapaksa of Sri Lanka
February 08th, 02:23 pm
Addressing the joint press meet with PM Rajapaksa of Sri Lanka, PM Modi said that the stability, security and prosperity in Sri Lanka is in India's as well as interest of entire Indian ocean region. PM Modi said India will continue to assist Sri Lanka in its journey for peace and development.PM Modi’s remarks at joint press meet with Sri Lankan President
November 29th, 12:50 pm
Prime Minister Modi addressed joint press meet with the President Gotabaya Rajapaksa of Sri Lanka. In his remarks, PM Modi said that it was an honour that President Rajapaksa chose India for his first overseas trip soon after assuming office. The Prime Minister said, “In line with our Government's Neighborhood First policy and SAGAR doctrine, we prioritize our relations with Sri Lanka.”शिकागो येथील स्वामी विवेकानंदांच्या भाषणाच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षाच्या (125 वे वर्ष) कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे केलेले भाषण. या कार्यक्रमाचे आयोजन कोइंबतूरच्या श्री रामकृष्ण मठाने केले होते
September 11th, 03:30 pm
स्वामी विवेकानंद यांनी शिकागो येथे केलेल्या भाषणाच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षाच्या (125 वे वर्ष) समारोपाचा कार्यक्रम कोइंबतूरच्या श्री रामकृष्ण मठाच्यावतीने आज आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात पंतप्रधान व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून सहभागी झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी केलेले भाषण.