पंतप्रधानांच्या ‘परीक्षा पे चर्चा पीएम मोदी के साथ’ चा मराठी अनुवाद

April 01st, 01:57 pm

तुम्हा सर्वांना नमस्कार, खरंतर हा माझा अतिशय आवडता कार्यक्रम आहे पण कोरोनामुळे मधल्या काळात मला तुम्हा सहकाऱ्यांना भेटता आलं नव्हतं. माझ्यासाठी आजचा कार्यक्रम विशेष आनंदाचा आहे. कारण एका प्रदीर्घ कालावधीनंतर तुम्हा सर्वांना भेटण्याची संधी मिळाली आहे. तुम्हाला परीक्षेचा ताण आला असेल, असे मला नाही वाटत... मी बोलतोय ते खरं आहे ना? मी बरोबर बोलतोय ना? तुमच्यावर काही ताण आलेला नाही ना? जर ताण आला असेल तर तो तुमच्या आई वडिलांना असेल. की हा काय करेल. खरं सांगा तुमच्यावर ताण आहे की, तुमच्या कुटुंबातल्या सदस्यांवर ताण आला आहे? ज्यांना स्वतःला ताण आला असेल त्यांनी आपला हात वर करा.

पंतप्रधानांनी परीक्षा पे चर्चा 2022 मध्ये विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांशी साधला संवाद

April 01st, 01:56 pm

परीक्षा पे चर्चाच्या (पीपीसीPPC) 5 व्या भागात, पंतप्रधान, नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील तालकटोरा स्टेडियमवर विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांशी संवाद साधला. संवादापूर्वी त्यांनी कार्यक्रमस्थळी विद्यार्थ्यांच्या प्रदर्शनाची पाहणी केली. यावेळी, केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान, अन्नपूर्णा देवी, डॉ. सुभाष सरकार, डॉ. राजकुमार रंजन सिंग आणि राजीव चंद्रशेखर यांच्यासह राज्यपाल आणि मुख्यमंत्री, शिक्षक, विद्यार्थी आणि पालक आभासी माध्यमातून सहभागी झाले. संपूर्ण संवादात पंतप्रधानांनी संवादात्मक, आनंदी आणि संभाषणात्मक वातावरण कायम ठेवले.

पंतप्रधान येत्या 1 एप्रिल 2022 रोजी 'परीक्षा पे चर्चा' या कार्यक्रमाद्वारे विद्यार्थी, त्यांचे पालक आणि शिक्षक यांच्याशी संवाद साधणार आहेत.

March 26th, 11:56 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी,येत्या दिनांक 1 एप्रिल 2022 रोजी तालकटोरा स्टेडियम, दिल्ली येथे आयोजित करण्यात येत असलेल्या 'परीक्षा पे चर्चा' या कार्यक्रमातून विद्यार्थी, त्यांचे पालक आणि शिक्षक यांच्याशी संवाद साधणार आहेत. तणावमुक्त परीक्षा याबद्दल ते बोलणार आहेत.

परीक्षा पे चर्चा 2021: तणाव न घेता प्रसन्न चित्ताने परीक्षा द्या!

February 18th, 02:33 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी परीक्षा पे चर्चा 2021 या कार्यक्रमात विविध स्तरातील विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांशी संवाद साधणार आहेत. यावेळी हा कार्यक्रम पूर्णतः ऑनलाईन होणार असून तो जगभरातील विद्यार्थ्यांसाठी खुला आहे. यामध्ये पंतप्रधान मोदी परीक्षेचा तणाव कशा प्रकारे दूर करता येईल याविषयी विद्यार्थी, पालकांबरोबरच शिक्षकांशीही बातचीत करणार आहेत.

Be confident about your preparation: PM Modi to students appearing for exams

January 20th, 10:36 am

PM Modi interacted with students as part of Pariksha Pe Charcha. He answered several questions from students across the country on how to reduce examination stress. The PM discussed subjects like importance of technology in education, dealing with the expectations of teachers and parents, future career options & more.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘परीक्षा पे चर्चा 3.0’ या कार्यक्रमाद्वारे विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांशी साधला संवाद

January 20th, 10:35 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतल्या तालकटोरा स्टेडियमवर ‘परीक्षा पे चर्चा 3.0’ या कार्यक्रमाद्वारे विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांशी संवाद साधला. 50 दिव्यांग विद्यार्थीही या कार्यक्रमात सहभागी झाले होते. सुमारे दीड तास चाललेल्या या संवादात्मक कार्यक्रमात अनेक महत्वाच्या विषयांवर विद्यार्थ्यांनी पंतप्रधानांकडून मोलाचा सल्ला आणि मार्गदर्शन घेतले. यावर्षीही देशभरातल्या विद्यार्थ्यांबरोबरच परदेशात राहणारे भारतीय विद्यार्थीही कार्यक्रमात सहभागी झाले.

पंतप्रधान विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांशी “परीक्षा पे चर्चा 2020” यात संवाद साधणार

January 19th, 08:08 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी “परीक्षा पे चर्चा 2020” या कार्यक्रमात 20 जानेवारी रोजी विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांशी संवाद साधणार आहेत. परीक्षा पे चर्चा हा पंतप्रधानांचा विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याचा तिसरा कार्यक्रम आहे. सोमवारी नवी दिल्ली येथील तालकटोरा स्टेडिअममध्ये सकाळी 11 वाजता कार्यक्रम सुरु होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तर देणार आहेत तसेच काही निवडक विद्यार्थ्यांसमवेत परीक्षेच्या ताणासंबंधी चर्चा करणार आहेत.

Join Live: Pariksha Pe Charcha with PM Modi!

January 19th, 10:40 am

PM Modi will be interacting with students, parents and teachers from all across the country on Monday, 20th January 2020 and discuss ways to reduce examination stress.

दिल्लीतल्या तालकटोरा स्टेडिअममध्ये इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेच्या उद्‌घाटन सोहळ्यात पंतप्रधानांचे भाषण

September 01st, 10:54 pm

व्यासपीठावर विराजमान मंत्रिमंडळातले माझे सहकारी मनोज सिन्हा, इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेचे सीईओ, सचिव पोस्ट आयपीपीबीचे सर्व सहकारी, इथे उपस्थित मान्यवर. या क्षणी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून देशभरातल्या तीन हजारांहून अधिक केंद्रांवरून सहभागी झालेले हजारो कर्मचारी आणि मनोजजींनी दिलेल्या माहितीनुसार तिथे उपस्थित सुमारे 20 लाख नागरिक. तिथे काही राज्यपाल, मुख्यमंत्री, राज्यांचे मंत्री, आमदार, खासदार हेदेखील उपस्थित आहेत. या सर्वांचे मी या समारंभात स्वागत करतो आणि त्यांचे अभिनंदन करतो.

भारतीय पोस्ट पेमेंट बँकेचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्‌घाटन-आर्थिक समावेशातील नवा टप्पा

September 01st, 04:45 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भारतीय पोस्ट पेमेंट बँकेचे नवी दिल्ली येथील तालकटोरा स्टेडियममध्ये उद्‌घाटन केले. तसेच देशभरात 3000 ठिकाणी बँकेच्या विविध शाखांचे उद्‌घाटन करण्यात आले. यावेळी बोलतांना पंतप्रधान म्हणाले की, भारतीय पोस्ट पेमेंट बँकेद्वारे बँकिंग सेवा देशाच्या कानाकोपऱ्यात पोहचतील.

येत्या शनिवारी इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्‌घाटन

August 31st, 10:39 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी एक सप्टेंबरला आयपीपीबी अर्थात इंडिया पोस्ट पेमेंट्‌स बँकेचे नवी दिल्लीतल्या तालकटोरा स्टेडियमवर उद्‌घाटन करतील.