संविधान आणि लोकशाही व्यवस्थेवर पुनश्च आपला अढळ विश्वास दाखवल्याबद्दल देशवासीयांचे आभार: पंतप्रधान मोदी मन की बात मध्ये

June 30th, 11:00 am

मित्रांनो, फेब्रुवारीपासून आतापर्यंत जेव्हा महिन्याचा शेवटचा रविवार यायचा, तेव्हा मला तुमच्या सोबतच्या या संवादाची उणीव जाणवायची. पण या कालावधीमध्ये देखील तुम्ही मला लाखो पत्र पाठवलीत हे पाहून मला खूप छान वाटले. 'मन की बात' हा रेडिओ कार्यक्रम जरी काही महिने प्रसारित झाला नसला तरीदेखील, 'मन की बात' ची भावना ही इतकी सखोल आहे की देशात, समाजात, दररोज होणाऱ्या कामांमध्ये, निस्वार्थ भावनेने केलेली कामे, समाजावर सकारात्मक परिणाम घडवणाऱ्या कामांमध्ये ती निरंतर दिसून आली. निवडणुकीच्या बातम्यांदरम्यान, अशा हृदयस्पर्शी बातम्यांनी नक्कीच तुमचे लक्ष वेधून घेतले असले.

आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या टेबल टेनिस दुहेरी गटात कांस्य पदक पटकावणाऱ्या ऐहिका मुखर्जी आणि सुतिर्था मुखर्जी यांचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन

October 02nd, 10:01 pm

आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या टेबल टेनिस दुहेरी गटात कांस्य पदक जिंकणाऱ्या ऐहिका मुखर्जी आणि सुतिर्था मुखर्जी यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने महिला दुहेरीत मिळवलेले हे पहिले पदक आहे.

आशियाई चषक स्पर्धेत कांस्य पदक जिंकल्याबद्दल पंतप्रधानांनी टेबल टेनिसपटू मनिका बत्रा हिचे अभिनंदन केले

November 20th, 10:05 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आशियाई चषक स्पर्धेत कांस्यपदक पटकवणारी टेबल टेनिसपटू मनिका बत्रा हिचे अभिनंदन केले आहे.

टेबल टेनिसमध्ये पुरुष एकेरीत सुवर्णपदक जिंकल्याबद्दल शरथ कमलचे पंतप्रधानांनी अभिनंदन केले

August 08th, 08:16 pm

बर्मिंघम येथे राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये टेबल टेनिसमध्ये पुरुष एकेरीत सुवर्णपदक जिंकल्याबद्दल शरथ कमलचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.

भारतीय पॅरालिम्पिक दलाला केले आमंत्रित

September 09th, 02:41 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टोक्यो पॅरालिम्पिक 2020 खेळातील भारतीय चमूला आज सकाळी त्यांच्या निवासस्थानी आमंत्रित केले होते. या चमूमध्ये पॅरा-क्रीडापटू तसेच प्रशिक्षकांचा देखील समावेश होता.

एक्सक्लुझिव्ह छायाचित्रेः पॅरालिम्पिक्स विजेत्यांबरोबरची अविस्मरणीय बातचीत!

September 09th, 10:00 am

2020 च्या टोक्यो पॅरालिम्पिक्समध्ये सहभागी होऊन जागतिक पटलावर देशासाठी अभिमानास्पद कामगिरी केलेल्या भारतीय पॅरालिम्पिक्स विजेत्यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी भेट झाली.