गयानामधल्या भारतीय समुदायाला पंतप्रधानांनी केलेले संबोधन
November 22nd, 03:02 am
आपणा सर्वांसमवेत इथे उपस्थित राहताना मला आनंद होत आहे. आपल्यासमवेत इथे उपस्थित राहिल्याबद्दल राष्ट्रपती इरफान अली यांचे मी सर्वप्रथम आभार मानतो. इथे दाखल झाल्यापासून मला दिलेला स्नेह आणि आपुलकी यामुळे मी भारावून गेलो आहे. राष्ट्रपती अली यांनी आपल्या निवासस्थानी केलेल्या माझ्या स्वागताबद्दल मी त्यांचा आभारी आहे. त्यांच्या कुटुंबियांचा स्नेह आणि आपुलकी यासाठीही मी आभारी आहे. आदरातिथ्य हा आपल्या संस्कृतीचा गाभा आहे, गेले दोन दिवस मी याचा अनुभव घेत आहे. राष्ट्रपती अली आणि त्यांच्या आजीसमवेत आम्ही वृक्षारोपणही केले. ‘एक पेड मां के नाम’ म्हणजेच आईसाठी वृक्षारोपण या आमच्या उपक्रमाचा हा भाग आहे. हा भावनिक क्षण माझ्या नेहमीच स्मरणात राहील.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गयाना मधील भारतीय समुदायाला केले संबोधित
November 22nd, 03:00 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गयाना मधील जॉर्जटाऊन येथे आयोजित कार्यक्रमात आज तेथील भारतीय समुदायाशी संवाद साधला. गयानाचे राष्ट्रपती डॉ.इरफान आली. पंतप्रधान मार्क फिलिप्स, उपराष्ट्रपती भारत जगदेव, माजी राष्ट्रपती डोनाल्ड रमोतार यांच्यासह अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते. पंतप्रधान मोदी गयानामध्ये आल्यावर विशेष स्नेहासह त्यांचे भव्य स्वागत केल्याबद्दल मोदी यांनी गयानाच्या राष्ट्रपतींचे आभार मानून आनंद व्यक्त केला. तसेच त्यांनी राष्ट्रपती आणि त्यांचे कुटुंबीय यांनी व्यक्त केलेला स्नेह आणि दयाळूपणा याबद्दल त्यांना धन्यवाद दिले.“आदरातिथ्याचे तत्व आपल्या संस्कृतीच्या हृदयस्थानी आहे,”पंतप्रधान मोदी म्हणाले.भारत सरकारने सुरु केलेल्या ‘एक वृक्ष मातेसाठी’या उपक्रमाअंतर्गत राष्ट्रपती आणि त्यांच्या आजी यांच्यासह एक रोपटे लावल्याची माहिती पंतप्रधान मोदी यांनी दिली. हा एका अत्यंत भावनिक क्षण होता आणि तो आपल्या कायम स्मरणात राहील असे नोदी पुढे म्हणाले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियामध्ये भारतीय समुदायाला केलेले संबोधन
July 09th, 11:35 am
आपले हे प्रेम, आपला हा स्नेह,आपण सर्वांनी इथे येण्यासाठी वेळ काढला, आपणा सर्वांचा मी खूप- खूप आभारी आहे. मी एकटाच आलो नाही.माझ्यासमवेत खूप काही घेऊन आलो आहे. मी माझ्यासमवेत हिंदुस्तानच्या मातीचा गंध घेऊन आलो आहे. मी 140 कोटी देशवासीयांचे प्रेम माझ्यासोबत घेऊन आलो आहे.आपणा सर्वांसाठी त्यांच्या शुभेच्छा घेऊन आलो आहे आणि तिसऱ्यांदा सत्तेवर आल्यानंतर भारतीय समुदायासमवेत माझा पहिला संवाद इथे मॉस्कोमध्ये आपणा समवेत होत आहे ही आनंदाची बाब आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियातील भारतीय समुदायाशी साधला संवाद
July 09th, 11:30 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मॉस्को येथे आयोजित एका कार्यक्रमात रशियातील भारतीय समुदायाशी संवाद साधला. भारतीय समुदायाने त्यांचे जल्लोषात हार्दिक स्वागत केले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टी 20 विश्वचषक विजेत्या भारतीय क्रिकेट संघातील सदस्यांबरोबर साधलेला संवाद
July 05th, 04:00 pm
पंतप्रधान: मित्रांनो, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आणि आमच्यासाठी आनंदाची गोष्ट म्हणजे, तुम्ही विश्वचषक जिंकून आपल्या देशामध्ये उत्साहाचे आणि उत्सवाचे वातावरण तयार केले आहे. आणि देशवासियांच्या सर्व आशा -आकांक्षांना तुम्ही जिंकले आहे. माझ्यावतीने तुम्हा सर्वांचे खूप-खूप अभिनंदन! सर्वसाधारणपणे रात्री खूप उशीरपर्यंत मी कार्यालयामध्ये काम करीत असतो. विशेष म्हणजे यावेळी तर टी.व्हीसुद्धा सुरू होता आणि एकीकडे मी फायलीही पहात होतो. परंतु यावेळी त्या फायलींकडे माझे लक्ष केंद्रीत होत नव्हते. तुम्ही मंडळींनी आपल्यातील अतिशय उत्कृष्ट संघभावनेचे प्रदर्शन केले. आपल्यातील प्रतिभा दाखवली आणि तुमच्यामध्ये असलेले धैर्य स्पष्ट दिसून येत होते. मी सामना पहात होतो, तुमच्यामध्ये ‘पेशन्स’ होता, अजिबात गडबड नव्हती. पूर्ण आत्मविश्वास तुमच्यामध्ये होता. तुम्हा सर्वांचे माझ्यावतीने खूप-खूप अभिनंदन, मित्रांनो!!पंतप्रधानांकडून आय.सी.सी. टी-20 क्रिकेट विश्वचषक 2024 च्या विजेत्यांचे स्वागत
July 04th, 02:40 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आय.सी.सी. टी-20 क्रिकेट विश्वचषक 2024 च्या विजेत्या संघाचे आपल्या निवासस्थानी आज स्वागत केले.रवींद्र जडेजाच्या क्रिकेटमधील योगदानाचे पंतप्रधानांनी केले कौतुक
June 30th, 07:19 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय क्रिकेटपटू रवींद्र जडेजा याने गेल्या काही वर्षांत खेळाच्या विविध विभागांमध्ये केलेल्या कामगिरीबद्दल त्याचे कौतुक केले.टी20 विश्वचषक विजेत्या भारतीय क्रिकेट संघाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरध्वनीद्वारे केले अभिनंदन
June 30th, 02:06 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरध्वनीद्वारे भारतीय पुरुष क्रिकेट संघाचे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या पुरुषांच्या टी20 विश्वचषक विजयाबद्दल अभिनंदन केले. या स्पर्धेत संघातील खेळाडूंनी दाखवलेल्या अनुकरणीय कौशल्याचे आणि संघ भावनेचे त्यांनी कौतुक केले.PM congratulates Indian Cricket Team for winning T20 World Cup
June 29th, 11:56 pm
The Prime Minister, Shri Narendra Modi, congratulated the Indian Cricket Team for winning the T20 World Cup today.क्रिकेट विश्वचषक सामन्यातील विजयाबद्दल पंतप्रधानांनी भारतीय संघाचे केले अभिनंदन.
November 12th, 10:00 am
सध्या सुरू असलेल्या विश्वचषक सामन्यातील नेदरलँड विरुद्धच्या विजयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय क्रिकेट संघाचे अभिनंदन केले.अंधांचा टी - 20 क्रिकेट विश्वचषक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले भारतीय संघाचे अभिनंदन
December 17th, 08:57 pm
अंधांचा टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय संघाचे अभिनंदन केले आहे.आयसीसी टी 20 सामन्यात विजय मिळविल्याबद्दल भारतीय क्रिकेट संघाचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन
October 23rd, 11:00 pm
आयसीसी- टी-ट्वेटी विश्वचषक स्पर्धेत अतिशय उत्तम खेळाचे दर्शन घडवत पाकिस्तानवर विजय मिळविल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय क्रिकेट संघाचे अभिनंदन केले आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आकाशवाणीवरुन “मन की बात”द्वारे साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद
November 26th, 11:30 am
माझ्या प्रिय देशवासियांनो, नमस्कार. काही दिवसांपूर्वी मला कर्नाटकमधील बालमित्रांशी संवाद साधायची संधी लाभली.सोशल मीडिया कॉर्नर ( समाज माध्यमे कट्टा) 26 फेब्रुवारी 2017
February 28th, 08:03 pm
तुमची प्रशासकीय कामगिरीबाबतची माहिती समाजमाध्यमांवरुन पाहता येईल. प्रशासनावरचे तुमचे ट्विट्स दररोज इथे पाहता येतील. वाचा आणि शेअर करा !अंधांसाठीच्या टी-20 क्रिकेट विश्वचषक विजेत्या भारतीय संघाने पंतप्रधानांची भेट घेतली
February 28th, 12:41 pm
PM Narendra Modi today met the members of the T20 Blind Cricket World Cup Winning Team. He complimented them for their achievements and urged them to do even better in future.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आकाशवाणीवरुन "मन की बात"द्वारे साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद (26 फेब्रुवारी 2017)
February 26th, 11:33 am
PM Narendra Modi today addressed the nation through his Mann Ki Baat. PM spoke on a wide range of topics - achievements of ISRO, digitization, cleanliness, pyang and women empowerment. The Prime Minister also said that attraction of Science for our young generation should increase and the country needs more and more scientists.सोशल मीडिया कॉर्नर ( समाज माध्यमे कट्टा) 30 जानेवारी 2017
January 30th, 07:46 pm
तुमची प्रशासकीय कामगिरीबाबतची माहिती समाजमाध्यमांवरुन पाहता येईल. प्रशासनावरचे तुमचे ट्विट्स दररोज इथे पाहता येतील. वाचा आणि शेअर करा !अंधांसाठीच्या 2017 टी-ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेसाठी पंतप्रधानांच्या शुभेच्छा
January 30th, 12:33 pm
PM Narendra Modi conveyed his best wishes all the participants of T20 World Cup for the Blind-2017. The PM said, A warm welcome & best wishes to all the teams & supporting staff who have come to participate in the T20 World Cup for the Blind 2017. The T20 World Cup will showcase quality sporting talent among the players & will popularise cricket among blind persons.