आपत्ती प्रतिरोधक पायाभूत सुविधांवरील आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये पंतप्रधानांनी व्हिडीओ संदेशा द्वारे केलेले संबोधन

April 04th, 09:46 am

आपणा सर्वांना माझ्या शुभेच्छा. भारतामध्ये आपलं स्वागत आहे! सर्वात प्रथम, आपत्ती प्रतिरोधक पायाभूत सुविधांसाठी एकत्र आल्याबद्दल मी आपलं अभिनंदन करतो. पाचवी आपत्ती प्रतिरोधक पायाभूत सुविधा आंतरराष्ट्रीय परिषद, आयसीडीआरआय-2023 नक्कीच विशेष आहे.

पंतप्रधानांनी आपत्ती प्रतिरोधक पायाभूत सुविधांवरील 5व्या आंतरराष्ट्रीय परिषदेला केले संबोधित

April 04th, 09:45 am

सारे जग एकमेकांशी जोडलेले असताना आपत्तींचा प्रभाव फक्त स्थानिक राहत नाही त्यामुळे जागतिक दृष्टीकोनातून सीडीआरआयची निर्मिती झाली आहे, असे पंतप्रधान म्हणाले. त्यामुळे, आपला प्रतिसाद एकाकी न ठेवता एकीकृत केला पाहिजे,असे ते म्हणाले. अवघ्या काही वर्षांत, प्रगत आणि विकसनशील देशांतील, लहान-मोठे, जगाच्या दक्षिण किंवा उत्तर भागातले 40 हून अधिक देश सीडीआरआयचा भाग बनले आहेत असे त्यांनी नमूद केले. सरकार व्यतिरिक्त, जागतिक संस्था, खाजगी क्षेत्रे आणि तज्ञ देखील यात सहभागी आहेत हे उत्साहवर्धक असल्याचे त्यांनी सांगितले.

आपत्तीचा धोका कमी करण्यासाठीच्या राष्ट्रीय मंचाची तिसरी बैठक आणि सुभाषचंद्र बोस आपदा प्रबंधन पुरस्कार -2023 मध्ये पंतप्रधानांनी केलेले संबोधन

March 10th, 09:43 pm

आपत्तीचा धोका कमी करण्यासाठीच्या राष्ट्रीय मंचाची तिसरी बैठक आणि सुभाषचंद्र बोस आपदा प्रबंधन पुरस्कार -2023 मध्ये पंतप्रधानांनी केलेले संबोधन

आपत्तीचा धोका कमी करण्यासाठीच्या राष्ट्रीय मंचाच्या तिसऱ्या सत्राचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

March 10th, 04:40 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीत आपत्तीचा धोका कमी करण्यासाठीचा राष्ट्रीय मंच (NPDRR)च्या तिसऱ्या सत्राचे उद्घाटन केले. या तिसऱ्या सत्राची मुख्य संकल्पना, “बदलत्या हवामानात, स्थानिक पातळीवरील प्रतिबंधक आणि संरक्षक क्षमता वाढवणे” अशी आहे.

पंतप्रधानांनी 'अॉपरेशन दोस्त' या तुर्कीए आणि सिरियातील भूकंपग्रस्त क्षेत्रात काम करून मायदेशी परत आलेल्या राष्ट्रीय आपत्ती निवारण आणि बचाव दलाच्या जवानांशी साधलेल्या संवादाचे मराठी भाषांतर

February 20th, 06:20 pm

तुम्ही सर्व जण मानवतेसाठी एक खूप मोठे कार्य करून परतले आहात. ऑपरेशन दोस्तशी संबंधित संपूर्ण टीम, मग ते एनडीआरएफ असो, लष्कर असो, हवाई दळ असो किंवा आमचे इतर सेवा भागीदार असोत, त्यांनी अप्रतिम काम केले आहे. आणि एवढेच नव्हे तर आमच्या मुक्या मित्रांनी, श्वान पथकातील सदस्यांनीही अद्भुत क्षमता दाखवली आहे. देशाला तुम्हा सर्वांचा अभिमान आहे.

भूकंपग्रस्त तुर्किए आणि सीरियामधील ‘ऑपरेशन दोस्त’ मध्ये सहभागी असलेल्या एनडीआरएफच्या जवानांशी पंतप्रधानांनी साधला संवाद

February 20th, 06:00 pm

भूकंपग्रस्त तुर्किए आणि सीरियामधील ‘ऑपरेशन दोस्त’मध्ये सहभागी असलेल्या एनडीआरएफ म्हणजेच राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या जवानांशी पंतप्रधानांनी संवाद साधला.

सीरियामध्ये भूकंपामुळे झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक

February 06th, 03:30 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सीरिया मध्ये भूकंपामुळे झालेल्या जीवितहानीबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. आम्ही सीरियाच्या नागरिकांच्या दुःखात सहभागी आहोत आणि या कठीण परिस्थितीत सर्वतोपरी साहाय्य आणि पाठिंबा देण्यासाठी वचनबद्ध आहोत, असे पंतप्रधानांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.