स्विस महासंघाच्या अध्यक्षांसोबत पंतप्रधानांची बैठक
December 01st, 08:01 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 1 डिसेंबर 2023 रोजी दुबईत कॉप-28 परिषदेच्या निमित्ताने स्विस महासंघाचे अध्यक्ष अलेन बर्सेट यांच्याबरोबर द्विपक्षीय बैठक घेतली.जागतिक आर्थिक व्यासपीठ परिषदेत दावोस येथे “क्रिएटिंग अ शेअर्ड फ्युचर इन अ फ्रॅक्चरड वर्ल्ड” याविषयावर पंतप्रधानांचे वक्तव्य ( 23 जानेवारी 2018)
January 23rd, 05:02 pm
दावोसमध्ये जागतिक आर्थिक व्यासपीठाच्या या 48व्या वार्षिक बैठकीत सहभागी होतांना मला खूप आनंद होत आहे. सर्वात आधी मी क्लॉज श्वाब यांना त्यांच्या या उपक्रमासाठी आणि जागतिक आर्थिक व्यासपीठाला सशक्त आणि व्यापक व्यासपीठ बनवण्यासाठी मनपूर्वक अभिनंदन करतो. त्यांच्या दृष्टीकोनात एक महत्वाकांक्षी विषयसूची आहे ज्याचा मुख्य उद्देश जागतिक परिस्थिती सुधारणे हा आहे. त्यांनी या विषयसूचीला आर्थिक आणि राजकीय विचारांसोबत एकदम मजबूतरित्या जोडलं आहे.तसेच स्वित्झर्लंड सरकार आणि त्याच्या नागरिकांनी केलेल्या आमच्या आदरतिथ्यासाठी मी त्यांचा मनापासून आभारी आहे.पंतप्रधान मोदी यांनी स्वीसचे राष्ट्राध्यक्ष अलेन बरसेट यांची भेट घेतली
January 23rd, 09:08 am
डावोसला पोहोचल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी स्वीसचे राष्ट्राध्यक्ष अलेन बरसेट यांची भेट घेतली. वेगवेगळ्या क्षेत्रात उभय देशातले द्विपक्षीय संबंध आणखी दृढ करण्याबद्दल दोन्ही नेत्यांनी चर्चा केली.दावोसला जाण्यापूर्वी पंतप्रधानांनी दिलेले निवेदन
January 21st, 09:04 pm
भारताचे चांगले मित्र आणि जागतिक आर्थिक मंचाचे संस्थापक प्रा. क्लाउस श्वाब यांच्या निमंत्रणावरुन दावोस येथे होणाऱ्या जागतिक आर्थिक मंचाच्या परिषदेत प्रथमच सहभागी होत असून मी उत्सुक आहे. यावर्षीच्या परिषदेची संकल्पना “दुभंगलेल्या जगात समाईक भवितव्याची निर्मिती” असून ती अगदी समर्पक आणि योग्य आहे.