तमिळ कवी सुब्रमण्यम भारती यांच्या संपूर्ण साहित्याच्या संपादित ग्रंथखंडांच्या प्रकाशन कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
December 11th, 02:00 pm
आज देशाचे महाकवी सुब्रमण्यम भारती जी, यांची जयंती साजरी होत आहे. मी सुब्रमण्यम भारती जी यांना श्रद्धापूर्वक वंदन करतो. त्यांना आपली श्रद्धांजली अर्पण करतो. आज भारताच्या संस्कृती आणि साहित्यासाठी, भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील स्मृतीच्या दृष्टीने आणि तामिळनाडूच्या गौरवासाठी एक खूप मोठा दिवस आहे. महाकवी सुब्रमण्यम भारती यांच्या कार्याचे , त्यांच्या साहित्यकृतींचे प्रकाशन म्हणजे, एक खूप मोठा सेवायज्ञ आहे आणि या खूप मोठ्या साधनेला आज पूर्णाहूती दिली जात आहे. 21 खंडांमध्ये ‘कालवरिसैयिल भारतियार पडैप्पुगळ्‘चे संकलन सहा दशकांच्या अथक परिश्रमाचे हे साहस, असामान्य आणि अभूतपूर्व आहे. सीनी विश्वनाथन यांचा हा जो समर्पणाचा भाव आहे, त्यांची ही साधना आहे, हे त्यांनी केलेले परिश्रम आहेत, मला पूर्ण विश्वास आहे की, आगामी पिढ्यांना, त्यांच्या कार्याचा खूप मोठा लाभ मिळणार आहे. आपण कधी कधी एक शब्द ऐकत होतो. ‘वन लाइफ , वन मिशन’! परंतु वन लाइफ वन मिशन नेमके असते तरी काय, हे सीनी यांनी दाखवून दिले. त्यांनी केलेली ही खूप मोठी साधना आहे. त्यांची तपस्या पाहून आज मला महामहोपाध्याय पांडुरंग वामन काणे यांचे स्मरण झाले. त्यांनीही आपल्या आयुष्यातील 35 वर्षे धर्मशास्त्राचा इतिहासाचे लेखन करण्यामध्ये खर्च केले. मला विश्वास आहे, सीनी विश्वनाथन यांचे हे काम अकादमीच्या जगतामध्ये एक ‘बेंच-मार्क’ निश्चित करणारे ठरेल. मी या कार्यासाठी विश्वनाथन जी आणि त्यांचे सर्व सहकारी आणि तुम्हा सर्वांचे खूप खूप अभिनंदन करतो.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महान तमिळ कवी सुब्रह्मण्य भारती यांच्या रचनांच्या संकलनाचे प्रकाशन
December 11th, 01:30 pm
महान तमिळ कवी सुब्रह्मण्य भारती यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहताना मोदी म्हणाले की, भारताची संस्कृती आणि साहित्य, भारताच्या स्वातंत्र्यलढ्याच्या आठवणी आणि तामिळनाडूच्या गौरवासाठी आजचा दिवस ही एक मोठी संधी आहे. महाकवी सुब्रह्मण्य भारती यांच्या कार्याचे प्रकाशन, एक सेवायज्ञ आज पूर्ण होत आहे असे ते म्हणाले.भारतीय समुदायाने वेगवेगळ्या देशांमध्ये आपला ठसा उमटवला आहे: पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये
November 24th, 11:30 am
मन की बात च्या 116 व्या भागात, पंतप्रधान मोदींनी NCC छात्रांचा विकास आणि आपत्ती निवारणाच्या कार्यातील त्यांची भूमिका यावर प्रकाश टाकत NCC दिनाचे महत्व विशद केले. विकसित भारताचे ध्येय साध्य करण्यासाठी तरुणांचे सक्षमीकरण होण्याची गरज त्यांनी स्पष्ट करण्यासोबतच विकसित भारत यंग लीडर्स डायलॉगची चर्चा केली. ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर करण्यास मदत करणाऱ्या तरुणांच्या प्रेरणादायी कथा आणि एक पेड माँ के नाम मोहिमेचे यशही त्यांनी शेअर केले.आज जगभरातील लोकांना भारताबद्दल अधिक जाणून घेण्याची इच्छा आहे: पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये
October 27th, 11:30 am
माझ्या प्रिय देशवासियांनो, नमस्कार! ‘मन की बात’ मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. माझ्या आयुष्यातील सर्वात अविस्मरणीय क्षण कोणते असे कोणी विचारले तर अनेक प्रसंग डोळ्यासमोर येतात, पण एक क्षण असा आहे जो अत्यंत विशेष आहे, तो क्षण आहे, जेव्हा मी गेल्या वर्षी १५ नोव्हेंबरला भगवान बिरसा मुंडा ह्यांच्या जयंतीदिनी झारखंडमधील त्यांच्या जन्मस्थानी उलिहाटू गावाला भेट दिली होती. या प्रवासाचा माझ्यावर खूप प्रभाव पडला. मी देशाचा पहिला पंतप्रधान आहे, ज्याला या पवित्र भूमीची धूळ (माती) मस्तकावर लावण्याचे भाग्य लाभले. त्या क्षणी मला स्वातंत्र्यलढ्याची ताकद तर जाणवलीच पण या मातीतील शक्तीशी जोडले जाण्याची संधीही मिळाली. मला जाणवले की संकल्प पूर्ण करण्याचे धाडस देशातील कोट्यवधी लोकांचे भविष्य कसे बदलू शकते.अमेरिकेतल्या शिकागो येथे केलेल्या भाषणाला 132 वर्षे झाल्यानिमित्त पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी स्वामी विवेकानंदांचे केले स्मरण
September 11th, 11:06 am
स्वामी विवेकानंदांनी अमेरिकेतल्या शिकागो, येथे 1893 मध्ये दिलेले प्रसिद्ध भाषण पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी आज सामायिक केले.स्वामी विवेकानंद यांच्या पुण्यतिथीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाहिली आदरांजली
July 04th, 09:44 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वामी विवेकानंद यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली.लोकसभेतील राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभारदर्शक प्रस्तावाला पंतप्रधानांनी दिलेल्या उत्तराचा मजकूर
July 02nd, 09:58 pm
माननीय राष्ट्रपतीजींनी आपल्या अभिभाषणात विकसित भारताच्या संकल्पाचा विस्तार केला आहे. माननीय राष्ट्रपती महोदयांनी महत्वाचे मुद्दे मांडले आहेत. राष्ट्रपतीजींनी आपल्या सर्वांना आणि देशाला मार्गदर्शन केले आहे, त्याबद्दल मी राष्ट्रपतीजींचे मनःपूर्वक आभार मानतो.राष्ट्रपतींच्या लोकसभेतील अभिभाषणाविषयीच्या आभारप्रदर्शन प्रस्तावावर पंतप्रधानांचे उत्तर
July 02nd, 04:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभारप्रदर्शन प्रस्तावाला उत्तर दिले. सभागृहाला संबोधित करताना पंतप्रधानांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणाबद्दल त्यांचे आभार मानले आणि या भाषणाचा केंद्रबिंदू असलेल्या विकसित भारत संकल्पनेला अधोरेखित केले. राष्ट्रपतींनी आपल्या भाषणात महत्त्वाचे मुद्दे मांडले असल्याचे त्यांनी अधोरेखित केले आणि त्यांच्या मार्गदर्शनाबद्दल आभार मानले.टीएमसी असो वा काँग्रेस, ते दोघेही एकाच नाण्याच्या दोन बाजू: पंतप्रधान मोदी पश्चिम बंगालमध्ये पुरुलिया येथे
May 19th, 01:00 pm
पुरुलिया, पश्चिम बंगाल येथे आयोजित तुफानी प्रचार सभेत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विशाल श्रोतृवर्गाला संबोधित करताना INDI आघाडीचे अपयश आणि प्रदेशाच्या विकास आणि उन्नतीप्रती असलेली भाजपची वचनबद्धता या मुद्द्यांवर प्रकाश टाकला. पंतप्रधानांनी विशेषत: पाणी टंचाई, आरक्षण आणि भ्रष्टाचार या मुद्द्यांवर भर देत, टीएमसीने दिलेली आश्वासने आणि त्यांच्या कृतींमधील लक्षणीय फरक स्पष्ट केला.पश्चिम बंगालमधील पुरुलिया, बिष्णुपूर आणि मेदिनीपूर येथील जाहीर सभांमध्ये पंतप्रधान मोदींचे भाषण
May 19th, 12:45 pm
पुरुलिया, बिष्णुपूर आणि मेदिनीपूर, पश्चिम बंगाल येथे झालेल्या झंझावाती सभांमध्ये, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विराट जनसमुदायाला संबोधित करताना INDI आघाडीचे अपयश आणि प्रदेशाच्या विकास आणि उन्नतीप्रती भाजप वचनबद्ध असल्याचे अधोरेखित केले. पंतप्रधानांनी विशेषत: पाणी टंचाई, आरक्षण आणि भ्रष्टाचार या मुद्द्यांवर भर देत टीएमसीने दिलेली आश्वासने आणि त्यांच्या कृतींमधील लक्षणीय फरक स्पष्ट केला.Congress divided the land based on religion, yet they oppose granting citizenship to the Matua community through CAA: PM in Arambagh
May 12th, 11:50 am
In his third rally in Arambagh, PM Modi highlighted the crucial 2024 election for Bengal's development and the need to safeguard its culture. Despite TMC's claim of owning Bengali culture, the reality reveals a suppression of religious faith and freedom of expression. He said, “Historical figures like Gurudev Tagore, Kazi Nazrul Islam, Satyajit Ray, Swami Vivekananda and Subhas Chandra Bose are being ignored under TMC's rule, while women's conditions and healthcare services continue to deteriorate. The land that gave us a leader like Syama Prasad Mukherjee is now suffering due to vote bank politics. The essence of Bengal's culture is fading amidst TMC's pursuit of vote bank politics.”PM Modi electrifies crowds with his speeches in Barrackpore, Hooghly, Arambagh & Howrah, West Bengal
May 12th, 11:30 am
Today, in anticipation of the 2024 Lok Sabha elections, Prime Minister Narendra Modi sparked enthusiasm and excitement among the audience with his speeches in Barrackpore, Hooghly, Arambagh and Howrah, West Bengal. Expressing gratitude to the numerous mothers and sisters in attendance, he remarked, This scene indicates a forthcoming change in Bengal. The victory of 2019 is poised to be even greater for the BJP this time around.Bengal's enthusiasm for democracy is commendable: PM in Malda Uttar
April 26th, 11:15 am
Prime Minister Narendra Modi addressed a huge public gathering in Malda Uttar, West Bengal. He urged people to participate in the ongoing elections. PM Modi emphasized the importance of every vote in strengthening democracy and upholding the Constitution.PM Modi addresses a public meeting in Malda Uttar, West Bengal
April 26th, 10:46 am
Prime Minister Narendra Modi addressed a huge public gathering in Malda Uttar, West Bengal. He urged people to participate in the ongoing elections. PM Modi emphasized the importance of every vote in strengthening democracy and upholding the Constitution.17 व्या लोकसभेच्या शेवटच्या बैठकीत पंतप्रधानांनी केलेले संबोधन
February 10th, 04:59 pm
आजचा हा दिवस लोकशाहीच्या महान परंपरेचा महत्वाचा दिवस आहे.सतराव्या लोकसभेने पाच वर्षे देश सेवेत ज्या प्रकारे अनेक विविध महत्वपूर्ण निर्णय घेतले, अनेक आव्हानांना सर्वांनी आपल्या सामर्थ्याने देशाला योग्य दिशा देण्याचा प्रयत्न केला,एका प्रकारे आजचा हा दिवस आपणा सर्वांचा हा पाच वर्षांचा वैचारिक प्रवास, राष्ट्राला समर्पित तो काळ, देशाला पुन्हा एकदा आपले संकल्प राष्ट्र चरणी समर्पित करण्याची ही संधी आहे. ही पाच वर्षे देशात रिफॉर्म, परफॉर्म आणि ट्रान्सफॉर्म,हे फार क्वचितच घडते.सुधारणाही होतात,कामगिरीही होते आणि परिवर्तन होताना आपण स्वतः आपल्या डोळ्यांनी पाहतो,एक नवा विश्वास निर्माण होतो. हे सतराव्या लोकसभेद्वारे देश अनुभवत आहे.मला विश्वास आहे की देश सतराव्या लोकसभेला नक्कीच आशीर्वाद देत राहील. या सर्व प्रक्रियेत सदनाच्या सर्व माननीय सदस्यांची महत्वाची भूमिका राहिली आहे. सर्व माननीय सदस्यांच्या या चमूचा नेता या नात्यानेही आणि आपणा सर्वांचा एक सहकारी या नात्यानेही मी आपणा सर्वांचे अभिनंदन करतो.17 व्या लोकसभेच्या शेवटच्या बैठकीला पंतप्रधानांनी केले संबोधित
February 10th, 04:54 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सभागृहाला संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले की, आजचा हा प्रसंग भारताच्या लोकशाहीसाठी महत्त्वपूर्ण आहे. पंतप्रधान मोदी यांनी 17 व्या लोकसभेच्या सर्व सदस्यांनी महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी आणि देशाला दिशा देण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची त्यांनी प्रशंसा केली. ते म्हणाले की, आजचा दिवस हा वैचारिक प्रवास आणि हा काळ राष्ट्राच्या उन्नतीसाठी समर्पित करण्याचा एक विशेष प्रसंग आहे. गेल्या काही वर्षांपासून देशात ' 'रीफॉर्म, परफॉर्म आणि ट्रान्सफॉर्म' ' हा मंत्र राहिला आहे आणि आज संपूर्ण देश ते अनुभवत असल्याचे ते म्हणाले. 17 व्या लोकसभेत करण्यात आलेल्या प्रयत्नांना भारतातील जनता यापुढेही आशीर्वाद देत राहील असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला. सभागृहातील सर्व सदस्यांचे योगदान अधोरेखित करत मोदी यांनी त्यांच्याप्रती विशेषतः अध्यक्षांप्रति कृतज्ञता व्यक्त केली. पंतप्रधानांनी सभापतींचे आभार मानले आणि सभागृहाचे कामकाज हसतमुखाने , संतुलित आणि निष्पक्ष पद्धतीने हाताळल्याबद्दल त्यांची प्रशंसा केली.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रील प्रभूपाद जी यांच्या 150 व्या जयंतीदिनानिमत्त आयोजित कार्यक्रमामध्ये केलेले भाषण
February 08th, 01:00 pm
हरे कृष्ण! हरे कृष्ण! हरे कृष्ण! आज तुम्ही सर्वजण इथे आला आहात, त्यामुळे भारत मंडपम् ची भव्यता आणखी वाढली आहे. या भवनाची उभारणी करताना, त्याच्या मूळाशी असलेला विचार भगवान बसवेश्वर यांच्या अनुभव मंडपम् बरोबर या भारत मंडपम् ची सांगड घातली आहे. अनुभव मंडपम् प्राचीन भारतामध्ये आध्यात्मिक चर्चा-परिसंवाद यांचे केंद्र होते. अनुभव मंडपम् लोक कल्याणाची भावना आणि संकल्प यांचे ऊर्जा केंद्र होते. आज श्रील भक्तिसिद्धान्त सरस्वती गोस्वामी प्रभुपाद जी यांच्या 150 व्या जयंती निमित्त आयोजित या कार्यक्रमामध्येही अशीच ऊर्जा, असेच चैतन्य दिसून येत आहे. आमचा विचारही असाच होता की, हे भवन, भारताचे आधुनिक सामर्थ्य आणि प्राचीन मूल्ये अशा दोन्ही गोष्टींचे केंद्र बनले पाहिजे.अलिकडेच, काही महिन्यांपूर्वी जी -20 शिखर परिषदेच्या माध्यमातून इथूनच नवीन भारताच्या सामर्थ्याचे दर्शन अवघ्या जगाला झाले होते. आणि आज इथेच, ‘वर्ल्ड वैष्णव कन्व्हेंशन’चे आयोजन करण्याची संधी मोठ्या सद्भाग्याने मिळत आहे. आणि इतकेच नाही तर, भारताची जी प्रतिमा आहे... जिथे विकासही आहे आणि वारसाही आहे, अशा दोन्ही गोष्टींचा संगम घडून आला आहे. जिथे आधुनिकतेचे स्वागतही आहे आणि आपल्या ओळखीविषयी अभिमानही आहे.पंतप्रधानांनी श्रील प्रभुपादजी यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाला केले संबोधित
February 08th, 12:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीत प्रगती मैदान येथील भारत मंडपम येथे श्रील प्रभुपादजी यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाला संबोधित केले. पंतप्रधानांनी यावेळी आचार्य श्रील प्रभुपाद यांच्या पुतळ्याला पुष्पांजली वाहिली आणि त्यांच्या सन्मानार्थ एक स्मरणार्थ टपाल तिकीट तसेच नाणे जारी केले. गौडीया मिशनचे संस्थापक आचार्य श्रील प्रभुपाद यांनी वैष्णव पंथाच्या मुलभूत तत्वांचे जतन करण्यात तसेच त्यांचा प्रसार करण्यात महत्त्वाची भूमिका निभावली.महाराष्ट्रातील नाशिक येथे 27 व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण
January 12th, 01:15 pm
महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी , केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी अनुराग ठाकूर , भारती पवार , निसिथ प्रामाणिक , महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , अजित पवार जी , सरकारचे इतर मंत्री , इतर मान्यवर आणि माझ्या तरुण मित्रांनो , आज भारताच्या युवा शक्तीचा दिवस आहे . हा दिवस त्या महान व्यक्तीला समर्पित आहे ज्याने गुलामगिरीच्या काळात भारताला नवीन उर्जेने भारले होते . हे माझे सौभाग्य आहे की स्वामी विवेकानंदांच्या जयंतीदिनी मी नाशिकमध्ये तुम्हा सर्व तरुणांमध्ये उपस्थित आहे. मी तुम्हा सर्वांना राष्ट्रीय युवा दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. आज भारताच्या नारीशक्तीचे प्रतीक असलेल्या राजमाता जीजाऊ माँ साहेबांचीही जयंती आहे. राजमाता जिजाऊ माँ साहेब यांच्या जयंतीदिनी त्यांना वंदन करण्यासाठी, मला महाराष्ट्राच्या वीर भूमीत येण्याची संधी मिळाली, याचा मला अतिशय आनंद आहे. मी त्यांना कोटी कोटी वंदन करतो!पंतप्रधानांनी नाशिक येथे केले 27 व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन
January 12th, 12:49 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नाशिक येथे 27 व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन केले. राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला पंतप्रधान मोदी यांनी पुष्पांजली अर्पण केली. राज्य पथकांच्या संचालनाचे निरीक्षण त्यांनी केले आणि 'विकसित भारत @ 2047 -युवांसाठी, युवांच्या माध्यमातून' ही संकल्पना असलेल्या ,जिम्नॅस्टिक, मलखांब, योगासने आणि राष्ट्रीय युवा महोत्सव गीताचा समावेश असलेला सांस्कृतिक कार्यक्रम पाहिला.