राजस्थानमधील चित्तौडगढ येथे विविध प्रकल्पांच्या पायाभरणी समारंभात पंतप्रधानांनी केलेले भाषण
October 02nd, 11:58 am
आज आपले सर्वांचे प्रेरणास्रोत पूज्य बापू आणि लाल बहादूर शास्त्री जी यांची जन्मजयंती आहे. काल 1 ऑक्टोबर रोजी राजस्थानसह संपूर्ण देशाने स्वच्छतेबाबत एक खूप मोठा कार्यक्रम हाती घेतला. स्वच्छता अभियानाला लोकचळवळ बनवल्याबद्दल मी सर्व देशवासियांचे आभार मानतो.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानमधील चित्तोडगड येथे सुमारे 7,000 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी केली आणि अनेक प्रकल्प राष्ट्राला समर्पित केले
October 02nd, 11:41 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानमधील चित्तोडगड येथे सुमारे 7,000 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी केली आणि अनेक विकास प्रकल्प राष्ट्राला समर्पित केले. या प्रकल्पांमध्ये मेहसाणा-भटिंडा-गुरदासपूर गॅस पाइपलाइन, अबू रोड येथील एचपीसीएल कंपनीचा एलपीजी प्लांट, अजमेर बॉटलिंग प्लांटमधील अतिरिक्त साठवणूक प्रकल्प, आयओसीएल, रेल्वे आणि रस्ते प्रकल्प, नाथद्वार येथील पर्यटन सुविधा आणि कोटा येथील भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्थेच्या कायमस्वरूपी परिसराचा विकास इत्यादी कामांचा समावेश आहे.पंतप्रधान 2 ऑक्टोबर रोजी चित्तौडगड आणि ग्वाल्हेरला देणार भेट
October 01st, 11:39 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी 2 ऑक्टोबर, 2023 रोजी राजस्थान आणि मध्य प्रदेशला भेट देणार आहेत. सकाळी सुमारे 10:45 वाजता, पंतप्रधान राजस्थानच्या चित्तोडगडमध्ये सुमारे 7,000 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण करतील.