सोशल मीडिया कॉर्नर ( समाज माध्यमे कट्टा) 10 एप्रिल 2017
April 10th, 08:29 pm
तुमची प्रशासकीय कामगिरीबाबतची माहिती समाजमाध्यमांवरुन पाहता येईल. प्रशासनावरचे तुमचे ट्विट्स दररोज इथे पाहता येतील. वाचा आणि शेअर करा !चंपारण्य सत्याग्रहाच्या शतकपूर्ती निमित्त संवादात्मक डिजीटल प्रदर्शनाच्या उद्घाटनाप्रसंगी पंतप्रधानांचे भाषण
April 10th, 06:21 pm
आज आपण २०व्या शतकातील एका महान घटनेच्या समारंभाचा शुभारंभ करण्यासाठी एकत्रित जमलो आहोत. १०० वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी गांधीजींनी पाटणा येथून आपल्या चंपारण्याच्या प्रवासाला सुरवात केली होती. चंपारण्याच्या ज्या भूमीला भगवान बुद्धांच्या प्रवचनाचा आशिर्वाद मिळाला होता, जी भूमी सीता मातेचे पिता जनक यांच्या राज्याचा भाग होती; तिथले शेतकरी कठोर परिस्थितीचा सामना करत होते. गांधीजींनी केवळ चंपारण्यातील शेतकऱ्यांना, शोषितांना, पीडितांनाच मार्ग दाखविला नाही तर संपूर्ण देशाला हे दाखवून दिले की शांतीपूर्ण सत्याग्रामध्ये किती ताकत आहे.चंपारण्य सत्याग्रहाची 100 वर्षे, पंतप्रधानांच्या हस्ते उद्या स्वच्छताग्रह प्रदर्शनाचे उद्घाटन
April 09th, 08:07 pm
चंपारण्य येथे सत्याग्रहाचा पहिला प्रयोग महात्मा गांधीजींनी केला, त्याला उद्या 100 वर्षे पूर्ण होत आहे, त्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी दिल्लीत “स्वच्छाग्रह – बापू को कार्यांजली – एक अभियान, एक प्रदर्शनी” या नावाच्या प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. राष्ट्रीय संग्रहालयातर्फे आयोजित “ऑनलाईन इंटरॲक्टिव्ह क्वीझ” या प्रश्नमंजुषा उपक्रमाचेही पंतप्रधान उद्या उद्घाटन करतील.