पंतप्रधानांनी स्वच्छ भारत अभियानाची 10 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त केली प्रशंसा
October 02nd, 09:19 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठ्या लोकसहभागातून भारताला स्वच्छ ठेवणाऱ्या व स्वच्छता सेवांमध्ये सुधारणा घडवणाऱ्या स्वच्छ भारत अभियानाच्या दशकपूर्तीनिमित्त प्रशंसा केली आहे.स्वच्छ भारत मिशनच्या दशकपूर्तीनिमित्त, पंतप्रधान 2 ऑक्टोबर रोजी स्वच्छ भारत दिवस 2024 कार्यक्रमामध्ये होणार सहभागी
September 30th, 08:59 pm
स्वच्छ भारत मिशन - स्वच्छतेसाठी सर्वात महत्त्वपूर्ण जनआंदोलनाला 10 वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्त 2 ऑक्टोबर रोजी, महात्मा गांधी यांच्या 155 व्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या स्वच्छ भारत दिवस 2024 कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी होतील. हा कार्यक्रम नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे सकाळी 10 वाजता होणार आहे.स्वच्छ भारत दिन- 2019 च्या उद्घाटन कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
October 02nd, 08:04 pm
आज आपल्या भाषणाला प्रारंभ करण्याआधी साबरमतीच्या या किना-यावर इथं उपस्थित असलेल्या सर्व सरंपंचांच्या माध्यमातून मी देशातल्या सर्व सरपंचांना, नगर पालिका, महानगर पालिकांच्या सर्व सदस्यांना बंधूगण, भगिनीगण अशा सर्वांना, तुम्ही गेले पाच वर्षे सातत्याने, अविरत जो पुरुषार्थ दाखवला आहे, ज्या समर्पण भावनेने परिश्रम केले आहेत, पूज्य बापूजींचे स्वप्न साकार करण्यासाठी जो त्याग केला आहे, त्याबद्दल सर्वात आधी आदरपूर्वक वंदन करू इच्छितो.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले स्वच्छ भारत दिवस 2019 चे उद्घाटन
October 02nd, 08:03 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अहमदाबाद येथे स्वच्छ भारत दिवस 2019 चा शुभारंभ केला. त्यांनी महात्मा गांधींच्या 150 व्या जयंती निमित्त काढलेले टपाल तिकिट आणि चांदीच्या नाण्याचे विमोचन केले तसेच स्वच्छ भारत पुरस्कारांचे वितरणही केले. साबरमती आश्रमात पंतप्रधानांनी महात्मा गांधींना आदरांजली अर्पण केली. पंतप्रधानांनी मगन निवासला (चरखा दालन) भेट दिली आणि तिथे उपस्थित मुलांशी संवाद साधला.