Today the youth of India is full of new confidence, succeeding in every sector: PM Modi
December 23rd, 11:00 am
PM Modi addressed the Rozgar Mela and distributed more than 71,000 appointment letters to newly appointed youth in Government departments and organisations. PM Modi underlined that in the last one and a half years, around 10 lakh permanent government jobs have been offered, setting a remarkable record. These jobs are being provided with complete transparency, and the new recruits are serving the nation with dedication and integrity.PM Modi distributes more than 71,000 appointment letters to newly appointed recruits
December 23rd, 10:30 am
PM Modi addressed the Rozgar Mela and distributed more than 71,000 appointment letters to newly appointed youth in Government departments and organisations. PM Modi underlined that in the last one and a half years, around 10 lakh permanent government jobs have been offered, setting a remarkable record. These jobs are being provided with complete transparency, and the new recruits are serving the nation with dedication and integrity.राजस्थानमध्ये जयपूर इथे ‘एक वर्ष –परिणाम उत्कर्ष’ कार्यक्रम आणि अन्य विकासकामांच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधानांचे भाषण
December 17th, 12:05 pm
राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे, राजस्थानचे लोकप्रिय मुख्यमंत्री मोहन यादव, केंद्रिय मंत्रीमंडळातले माझे सहकारी सी. आर. पाटील, भगीरथ चौधरी, राजस्थानच्या उपमुख्यमंत्री दिया कुमारी, प्रेम चंद भेरवा आणि अन्य मंत्री, खासदार, राजस्थानचे आमदार, मान्यवर व्यक्ती तसंच राजस्थानमधल्या माझ्या प्रिय बंधु भगिनींनो,पंतप्रधान नरेंद्र मोदी राजस्थानमधील जयपूर येथे 'एक वर्ष-परिणाम उत्कर्ष' या राज्य सरकारच्या वर्षपूर्ती कार्यक्रमात झाले सहभागी
December 17th, 12:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ' एक वर्ष-परिणाम उत्कर्ष':राजस्थान राज्य सरकारची वर्षपूर्ती या कार्यक्रमात सहभागी झाले. यावेळी जनतेला संबोधित करताना त्यांनी राज्य सरकारच्या यशस्वी वर्षपूर्तीबद्दल राज्य सरकार आणि राजस्थानच्या जनतेचे अभिनंदन केले. या कार्यक्रमात जमलेल्या लाखो लोकांचे आशीर्वाद घेण्याचे भाग्य आपल्याला लाभले, असे त्यांनी सांगितले. राजस्थानच्या विकासकामांना नवी दिशा आणि गती देण्यासाठी राजस्थानचे मुख्यमंत्री आणि त्यांच्या चमूने केलेल्या प्रयत्नांचे मोदींनी कौतुक केले . पहिल्या वर्षाने पुढील अनेक वर्षांच्या विकासासाठी एक भक्कम पाया म्हणून काम केले आहे , असे ते म्हणाले. आजच्या कार्यक्रमाने राज्य सरकारच्या वर्षपूर्तीचेच दर्शन घडत नाही तर राजस्थानच्या तेजस्वी प्रकाशाचे आणि विकासाच्या उत्सवाचे ते प्रतीक आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले. अलीकडेच रायझिंग राजस्थान शिखर परिषद 2024 च्या वेळी दिलेल्या भेटीचे स्मरण करत यावेळी जगभरातील अनेक गुंतवणूकदार उपस्थित होते आणि आज 45,000 कोटी रुपयांहून जास्त खर्चाच्या प्रकल्पांचे उद्घाटन झाल्याची माहिती पंतप्रधानांनी दिली. या प्रकल्पांमुळे राजस्थानमधील पाण्याशी संबंधित समस्यांवर योग्य तोडगा निघेल आणि राजस्थान भारतातील परस्परांशी जोडलेल्या सर्वात चांगल्या राज्यांपैकी एक बनेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या विकासकामांमुळे अधिकाधिक गुंतवणूकदार आकर्षित होतील, रोजगाराच्या अनेक संधी निर्माण होतील, पर्यटन क्षेत्राला बळकटी मिळेल तसेच राजस्थानमधील शेतकरी, महिला आणि तरुणांना फायदा होईल, असे देखील पंतप्रधानांनी सांगितले.उत्तर प्रदेशात प्रयागराज येथे विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी समारंभात पंतप्रधानांनी केलेले भाषण
December 13th, 02:10 pm
उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल जी, मुख्यमंत्री श्री योगी आदित्यनाथ जी, उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य जी, ब्रजेश पाठक जी, उत्तर प्रदेशचे मंत्री, सहकारी खासदार आणि आमदार, प्रयागराजचे महापौर आणि जिल्हा पंचायत अध्यक्ष, इतर मान्यवर आणि माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे सुमारे 5500 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि लोकार्पण
December 13th, 02:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे सुमारे 5500 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि लोकार्पण केले. उपस्थितांना संबोधित करताना, पंतप्रधान संगमाची पवित्र भूमी असलेल्या प्रयागराजसमोर भक्तीभावाने नतमस्तक झाले आणि महाकुंभसाठी उपस्थित असलेल्या संत आणि साधूंना अभिवादन केले. मोदी यांनी कर्मचारी, श्रमिक आणि सफाई कर्मचाऱ्यांप्रति कृतज्ञता व्यक्त केली जे महाकुंभ यशस्वी होण्यासाठी मेहनत आणि समर्पित वृत्तीने कार्यरत आहेत. महाकुंभची भव्य व्याप्ती आणि आकार लक्षात घेत पंतप्रधान म्हणाले की, हा जगातील सर्वात मोठ्या मेळाव्यांपैकी एक आहे जिथे 45 दिवस चालणाऱ्या महायज्ञासाठी दररोज लाखो भाविकांचे स्वागत केले जाते आणि त्यासाठी संपूर्ण नवीन शहर उभारले जाते. प्रयागराजच्या भूमीवर नवा इतिहास लिहिला जात आहे, असे उद्गार पंतप्रधानांनी काढले. पुढील वर्षी होणाऱ्या महाकुंभाचे आयोजन देशाच्या आध्यात्मिक आणि सांस्कृतिक अस्मितेला नव्या उंचीवर नेईल असे पंतप्रधानांनी अधोरेखित केले आणि एकतेच्या या ‘महायज्ञ’ची जगभरात चर्चा होईल असे सांगितले. महाकुंभच्या यशस्वी आयोजनासाठी त्यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या.अहमदाबाद येथील रामकृष्ण मठात आयोजित कार्यक्रमाला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित करताना पंतप्रधानांच्या भाषणाचा मजकूर
December 09th, 01:30 pm
परमपूज्य श्रीमत् स्वामी गौतमानंद जी महाराज, रामकृष्ण मठ आणि मिशनचे देश-विदेशातून आलेले आदरणीय संत, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल, या कार्यक्रमाशी संबंधित इतर सर्व मान्यवर,आणि सभ्य स्त्री-पुरूषहो, नमस्कार!पंतप्रधानांनी गुजरातमध्ये रामकृष्ण मठाद्वारे आयोजित कार्यक्रमाला केले संबोधित
December 09th, 01:00 pm
गुजरातमध्ये रामकृष्ण मठात आयोजित कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीद्वारे संबोधित केले. यावेळी बोलताना त्यांनी पूजनीय श्रीमद स्वामी गौतमानंद जी महाराज यांच्यासह, रामकृष्ण मठ आणि मिशन संस्थेच्या देशविदेशातील आदरणीय संतांप्रती तसेच गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि अन्य मान्यवरांप्रती अभीष्टचिंतन व्यक्त केले. तसेच माता शारदादेवी, गुरुदेव रामकृष्ण परमहंस आणि स्वामी विवेकानंद यांना पंतप्रधान मोदी यांनी आदरांजली वाहिली. आजचा कार्यक्रम श्रीमद स्वामी प्रेमानंद महाराज यांच्या जयंतीदिनी आयोजित केला असल्याचा उल्लेखही करत त्यांनी त्यांनाही आदरांजली अर्पण केली.कार्यकर सुवर्ण महोत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
December 07th, 05:52 pm
या कार्यकर (कार्यकर्ता) सुवर्ण महोत्सवानिमित्त मी भगवान स्वामी नारायण यांच्या चरणी प्रणाम करतो. आज प्रमुख स्वामी महाराजांच्या 103 व्या जयंतीचा महोत्सवदेखील आहे. गुरुहरी प्रगट ब्रह्म स्वरूप प्रमुख स्वामी महाराजांना मी नमन करतो. भगवान स्वामी नारायण यांची शिकवण, प्रमुख स्वामी महाराजांचे संकल्प... आज परमपूज्य गुरू हरी महंत स्वामी महाराज यांच्या कठोर परिश्रम आणि समर्पणामुळे सिद्धीस जात आहे. हा एवढा भव्य कार्यक्रम, एक लाख कार्यकर्ता, युवा आणि मुलांद्वारे बीज, झाडे आणि फळे यांचे सार अभिव्यक्त करणारा हा सांस्कृतिक कार्यक्रम...... भलेही मी तुमच्यामध्ये प्रत्यक्ष उपस्थित राहू शकलो नाही, परंतु या कार्यक्रमाची ऊर्जा मला माझ्या हृदयात जाणवत आहे. या भव्य दिव्य सोहळ्यासाठी मी परमपूज्य गुरू हरी महंत स्वामी महाराज आणि सर्व संतांचे अभिनंदन करतो, त्यांना नमन करतो.अहमदाबादमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कार्यकर सुवर्ण महोत्सवाला केले मार्गदर्शन
December 07th, 05:40 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून अहमदाबाद येथील कार्यकर (कार्यकर्ता) सुवर्ण महोत्सवाला मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना त्यांनी परमपूज्य गुरू हरी महंत स्वामी महाराज, आदरणीय संत, आणि सत्संगी परिवाराचे सदस्य आणि अन्य सन्माननीय व्यक्तींचे स्वागत केले, व त्यांच्याप्रती आदरभाव व्यक्त केला. कार्यकर सुवर्ण महोत्सवाचे औचित्य साधून त्यांनी भगवान स्वामी नारायण यांच्या चरणकमलांना वंदन केले आणि प्रमुख स्वामी महाराज यांची आज एकशे तीनवी जयंती असल्याचेही स्मरण त्यांनी केले. परमपूज्य गुरू हरी महंत स्वामी महाराज यांच्या परिश्रम आणि समर्पणामुळे भगवान स्वामी नारायण यांची शिकवण आणि प्रमुख स्वामी महाराज यांची वचने आज फळाला येत आहेत. जवळपास एक लाख कार्यकर्त्यांना समाविष्ट करून घेत, तरुणांचे व बालकांचे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करून भरवलेल्या इतक्या मोठ्या कार्यक्रमाचे स्वरूप पाहून मोदी यांनी समाधान व्यक्त केले. ते स्वतः या कार्यक्रमस्थळी उपस्थित नसले तरी ते त्यातील ऊर्जेचा अनुभव घेत आहेत, असेही त्यांनी सांगितले. या उच्च कोटीच्या दैवी समारंभाबद्दल त्यांनी परमपूज्य गुरू हरी महंत स्वामी महाराज यांचे आणि सर्व संतांचे अभिनंदन केले.भारतीय समुदायाने वेगवेगळ्या देशांमध्ये आपला ठसा उमटवला आहे: पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये
November 24th, 11:30 am
मन की बात च्या 116 व्या भागात, पंतप्रधान मोदींनी NCC छात्रांचा विकास आणि आपत्ती निवारणाच्या कार्यातील त्यांची भूमिका यावर प्रकाश टाकत NCC दिनाचे महत्व विशद केले. विकसित भारताचे ध्येय साध्य करण्यासाठी तरुणांचे सक्षमीकरण होण्याची गरज त्यांनी स्पष्ट करण्यासोबतच विकसित भारत यंग लीडर्स डायलॉगची चर्चा केली. ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर करण्यास मदत करणाऱ्या तरुणांच्या प्रेरणादायी कथा आणि एक पेड माँ के नाम मोहिमेचे यशही त्यांनी शेअर केले.हिंदुस्तान टाईम्स लीडरशिप परिषद 2024 मध्ये पंतप्रधानांनी केलेले भाषण
November 16th, 10:15 am
100 वर्षांपूर्वी पूज्य बापूंनी हिंदुस्तान टाईम्सचे उद्घाटन केले होते ... ते गुजराती भाषक होते आणि 100 वर्षांनतर दुसऱ्या गुजराती व्यक्तीला आपण बोलावले आहे. या ऐतिहासिक प्रवासासाठी हिंदुस्तान टाईम्स आणि 100 वर्षांच्या या प्रवासात जे-जे लोक सहभागी आहेत, ज्यांनी-ज्यांनी संघर्ष केला, संकटे झेलत टिकून राहिले .. ते सर्व अभिनंदनाला पात्र आहेत. 100 वर्षांचा प्रवास फार प्रदीर्घ असतो.यासाठी आपण सर्व अभिनंदनाला पात्र आहात, भविष्यासाठीही माझ्याकडून आपणा सर्वाना खूप-खूप शुभेच्छा. आता मी आलो तेव्हा या कुटुंबातल्या लोकांना भेटता तर आलेच त्याचबरोबर 100 वर्षांचा हा प्रवास दर्शवणारे एक उत्तम प्रदर्शनही पाहण्याची संधी मला मिळाली. आपल्याकडे थोडा वेळ असेल तर या प्रदर्शनाला आवर्जून भेट द्या असे मी आपल्याला सुचवेन. हे केवळ एक प्रदर्शन नव्हे तर हा एक अनुभव आहे. 100 वर्षांचा इतिहासच आपण पाहतो आहोत असे वाटले. देशाला स्वातंत्र्य मिळाले तेव्हाचे आणि संविधान लागू झाले त्या दिवसाचे वृत्तपत्र मी पाहिले. एकाहून एक थोर, दिग्गजांचे लेख हिंदुस्तान टाईम्समध्ये असत.मार्टिन ल्युथर किंग,नेताजी सुभाष बाबू,डॉक्टर श्यामा प्रसाद मुखर्जी, अटल बिहारी वाजपेयी, डॉक्टर एम एस स्वामिनाथन. या सर्वांच्या लेखांनी आपल्या वर्तमानपत्राची कीर्ती वृद्धिंगत केली.खरोखरच एक प्रदीर्घ प्रवास करून आपण इथे पोहोचलो आहोत. स्वातंत्र्यासाठीच्या लढ्यापासून ते स्वातंत्र्यानंतरच्या आशा- आकांक्षांच्या हिंदोळ्यावरून आपण आगेकूच केली आहे. हा प्रवास अभूतपूर्व आणि अद्भुतही आहे. ऑक्टोबर 1947 मध्ये काश्मीर भारतात विलीन झाल्यानंतर प्रत्येक देशवासीयाचा त्यावेळचा उत्साह मला आपल्या वृत्तपत्राच्या बातमीतून जाणवला.त्याचवेळी ठाम निर्णयाअभावी 7 दशकांपर्यंत काश्मीर हिंसाचारात कसे होरपळत राहिले हेसुद्धा जाणवले. आज आपल्या वर्तमानपत्रात जम्मू-काश्मीर मध्ये झालेल्या विक्रमी मतदानाच्या बातम्या छापल्या जातात हा विरोधाभास आहे. एका आणखी दिवसाचे वर्तमानपत्र,प्रत्येकाचे तिथे लक्ष जाईल. त्यामध्ये एकीकडे आसामला अशांत क्षेत्र म्हणून जाहीर केल्याची बातमी होती तर दुसरीकडे अटल जी यांच्याकडून भाजपचा पाया घातल्याची बातमी होती.आज आसाममध्ये स्थायी शांतता स्थापन करण्यामध्ये भाजपा मोठी भूमिका बजावत आहे हा किती सुखद योगायोग आहे.कालच बोडो भागातल्या लोकांसमवेत एका शानदार कार्यक्रमाला मी उपस्थित होतो आणि दिल्लीमधल्या माध्यमांनी या मोठ्या घटनेकडे दुर्लक्ष केले याचे मला आश्चर्य वाटते.5 दशकांनंतर बॉम्ब, बंदूक आणि पिस्तुल यांचा त्याग करत, हिंसेचा मार्ग नाकारून दिल्लीच्या हृदयस्थानी बोडोचे युवक सांस्कृतिक उत्सव साजरा करत आहेत ही इतिहासातली मोठी घटना आहे याचा त्यांना अंदाज नाही. मी काळ तिथे होतो. मनापासून मला ते जाणवत होते. बोडो शांतता करारामुळे या लोकांच्या जीवनात परिवर्तन घडले आहे. प्रदर्शनादरम्यान मुंबईवरच्या 26/11 च्या हल्ल्यावरच्या वृत्तांकडे माझे लक्ष गेले.शेजारी देशाच्या दहशतवादी कारवायांमुळे आपली जनता स्वतःच्याच घरात आणि शहरात असुरक्षित होती असा तो काळ होता. मात्र आता परिस्थिती बदलली आहे, आता ते दहशतवादीच त्यांच्या घरात सुरक्षित नाहीत.पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्ली इथे आयोजित हिंदुस्तान टाइम्स लीडरशिप समिट 2024 ला केले संबोधित
November 16th, 10:00 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली इथे हिंदुस्थान टाइम्स नेतृत्व शिखर परिषद 2024 ला (Hindustan Times Leadership Summit 2024) संबोधित केले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 100 वर्षांपूर्वी महात्मा गांधी यांच्या हस्ते हिंदुस्थान टाईम्सच्या प्रवासाची सुरूवात झाली असल्याची घटना आपल्या संबोधनात नमूद केली आणि हिंदुस्थान टाईम्सच्या 100 वर्षांच्या ऐतिहासिक प्रवासाबद्दल आणि प्रारंभापासून या संस्थेशी संबंधित असलेल्या सर्व व्यक्तींचे अभिनंदनही केले. यावेळी पंतप्रधानांनी या सर्वांना त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या. यावेळी पंतप्रधानांनी आयोजनस्थळी उभारलेल्या हिंदुस्थान टाईम्सच्या प्रदर्शनालाही भेट दिली. या प्रदर्शनाला भेट देणे हा समृद्ध करणारा अनुभव असल्याची भावना व्यक्त करत, सर्व प्रतिनिधींनी या प्रदर्शनाला भेट देण्याचे आवाहनही त्यांनी केले. भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि राज्यघटना लागू झाली तेव्हाची जुनी वर्तमानपत्रं आपण पाहिली असल्याचा अनुभवही त्यांनी उपस्थितांसोबत सामाईक केला. मार्टिन ल्युथर किंग, नेताजी सुभाषचंद्र बोस, डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी, अटलबिहारी वाजपेयी, डॉ. एम. एस. स्वामीनाथन अशा अनेक दिग्गजांनी हिंदुस्थान टाईम्ससाठी लेख लिहिले असल्याचाही त्यांनी उल्लेख केला. हिंदुस्थान टाईम्सचा प्रवास प्रचंड प्रदीर्घ आहे, हा प्रवास स्वातंत्र्यलढ्याचा साक्षीदार आहे, आणि त्याचवेळी स्वातंत्र्योत्तर काळात आशेच्या दिशेने वाटचाल करणारा हा प्रदीर्घ प्रवास अभूतपूर्व आणि आश्चर्यकारक आहे असे पंतप्रधान यावेळी म्हणाले. 1947 सालच्या ऑक्टोबर महिन्यात आपणही इतर नागरिकांप्रमाणेच काश्मीर भारतात विलीन झाल्याची बातमी वाचली होती, आणि ही बातमी वाचून आपला इतरांप्रमाणे प्रचंड उत्साह वाटला होता हा अनुभवही पंतप्रधानांनी उपस्थितांसोबत सामाईक केला. मात्र अनिर्णयकी वृत्तीमुळे काश्मीर सात दशके हिंसाचाराच्या विळख्यात सापडले असल्याची जाणिवही आपल्याला त्या क्षणाने करून दिली होती असेही त्यांनी सांगितले. पण आजच्या स्थितीत जम्मू - काश्मीरमधील निवडणुकीत विक्रमी प्रमाणात मतदान झाल्याच्या बातम्या वर्तमानपत्रात प्रसिद्ध होत आहेत, आणि ही आनंदाची बाब आहे असे ते म्हणाले. एकदा एका वर्तमानपत्रात एका बाजूला आसामला अशांत क्षेत्र घोषित केल्याची बातमी छापलेली होती, तर दुसऱ्या बाजुला अटलजींनी भारतीय जनता पक्षाची पायाभरणी केल्याची बातमी छापलेली बातमी आपण पाहिल्याचा अनुभवही पंतप्रधानांनी यावेळी उपस्थितांसोबत सामायिक केला. याच अनुभवाचा संदर्भ देत आज भाजपा आसाममध्ये कायमस्वरूपी शांतता प्रस्थापित करण्यात महत्वाची भूमिका बजावत आहे आणि हा मनाला शांती देणारा योगायोग आहे असे ते म्हणाले.Tribal society is the one that led the fight for centuries to protect India's culture and independence: PM Modi
November 15th, 11:20 am
PM Modi addressed Janjatiya Gaurav Diwas, emphasizing India's efforts to empower tribal communities, preserve their rich heritage, and acknowledge their vital role in nation-building.PM Modi participates in Janjatiya Gaurav Divas programme in Jamui, Bihar
November 15th, 11:00 am
PM Modi addressed Janjatiya Gaurav Diwas, emphasizing India's efforts to empower tribal communities, preserve their rich heritage, and acknowledge their vital role in nation-building.आज जगभरातील लोकांना भारताबद्दल अधिक जाणून घेण्याची इच्छा आहे: पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये
October 27th, 11:30 am
माझ्या प्रिय देशवासियांनो, नमस्कार! ‘मन की बात’ मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. माझ्या आयुष्यातील सर्वात अविस्मरणीय क्षण कोणते असे कोणी विचारले तर अनेक प्रसंग डोळ्यासमोर येतात, पण एक क्षण असा आहे जो अत्यंत विशेष आहे, तो क्षण आहे, जेव्हा मी गेल्या वर्षी १५ नोव्हेंबरला भगवान बिरसा मुंडा ह्यांच्या जयंतीदिनी झारखंडमधील त्यांच्या जन्मस्थानी उलिहाटू गावाला भेट दिली होती. या प्रवासाचा माझ्यावर खूप प्रभाव पडला. मी देशाचा पहिला पंतप्रधान आहे, ज्याला या पवित्र भूमीची धूळ (माती) मस्तकावर लावण्याचे भाग्य लाभले. त्या क्षणी मला स्वातंत्र्यलढ्याची ताकद तर जाणवलीच पण या मातीतील शक्तीशी जोडले जाण्याची संधीही मिळाली. मला जाणवले की संकल्प पूर्ण करण्याचे धाडस देशातील कोट्यवधी लोकांचे भविष्य कसे बदलू शकते.पंतप्रधानांनी स्वच्छ भारत अभियानाचा गेल्या 10 वर्षांतील परिवर्तनात्मक प्रभाव केला अधोरेखित
October 03rd, 08:52 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज स्वच्छ भारत या अभियानाने गेल्या 10 वर्षांत केलेले परिवर्तनीय प्रभाव अधोरेखित केले.सामूहिक प्रयत्न सामाजिक परिवर्तनासाठी चमत्कार घडवून आणू शकतात : पंतप्रधान
October 03rd, 08:50 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सामूहिक प्रयत्नांची प्रशंसा केली आणि सामाजिक परिवर्तन घडवून आणण्यासाठी ते चमत्कार करू शकतात असे प्रतिपादन केले आहे.मन की बात कार्यक्रमात ‘स्वच्छता’ हा सर्वाधिक चर्चा झालेल्या विषयांमधील एक ठरल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन
October 02nd, 05:56 pm
मन की बात कार्यक्रमात ‘स्वच्छता’ हा सर्वाधिक चर्चा झालेल्या विषयांमधील एक ठरल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधोरेखित केले आहे.स्वच्छ भारत अभियान ही 140 कोटी भारतीयांची अभूतपूर्व चळवळ : पंतप्रधान
October 02nd, 05:48 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियानाच्या दशकपूर्तीबद्दल कौतुक केले आहे. हे अभियान म्हणजे 140 कोटी भारतीयांच्या शक्तीने चाललेली एक अभूतपूर्व चळवळ आहे, असे म्हटले आहे.