विकसित भारत, विकसित मध्य प्रदेश कार्यक्रमात पंतप्रधानांनी केलेले भाषण

February 29th, 04:07 pm

'विकसित राज्य से विकसित भारत अभियान' या अभियानात आज आपण मध्य प्रदेशच्या आपल्या बंधू-भगिनींसोबत जोडले जात आहोत. मात्र, यावर बोलण्यापूर्वी मी डिंडोरी रस्ता अपघाताबाबत दुःख व्यक्त करतो. या अपघातात ज्या लोकांनी आपल्या निकटवर्तीयांना गमावले आहे, माझ्या संवेदना त्यांच्यासोबत आहेत. जे लोक जखमी आहेत, त्यांच्या उपचारांची सर्व व्यवस्था सरकार करत आहे. दुःखाच्या या प्रसंगी, मी मध्य प्रदेशच्या जनतेसोबत आहे.

पंतप्रधानांनी विकसित भारत विकसित मध्य प्रदेश कार्यक्रमात केले मार्गदर्शन

February 29th, 04:06 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज विकसित भारत विकसित मध्य प्रदेश या कार्यक्रमात दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाच्या वेळी पंतप्रधानांनी सुमारे 17,000 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांची कोनशिला बसवली आणि लोकार्पण केले. सिंचन, ऊर्जा, रस्ते, रेल्वे, पाणीपुरवठा, कोळसा आणि उद्योग अशा विविध क्षेत्रांशी संबंधित असलेले हे प्रकल्प आहेत. पंतप्रधानांनी यावेळी मध्य प्रदेशात सायबर तहसील प्रकल्पाचा देखील शुभारंभ केला.

मध्य प्रदेशातल्या झाबुआ येथे सुमारे 7300 कोटी रुपयांच्या बहुविध विकास प्रकल्पांची पंतप्रधानांनी केली पायाभरणी आणि राष्ट्रार्पण

February 11th, 07:35 pm

मध्य प्रदेशातल्या झाबुआ येथे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुमारे 7300 कोटी रुपयांच्या बहुविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि राष्ट्रार्पण केले. या विकास प्रकल्पांमुळे या क्षेत्रातील आदिवासी लोकसंख्येला मोठा लाभ होणार आहे. या क्षेत्रातील पाणीपुरवठ्यात सुधारणा होऊन पेयजलाची तरतूद होईल. तसेच मध्य प्रदेशातील रस्ते, रेल्वे, वीज आणि शिक्षण क्षेत्राला यामुळे चालना मिळणार आहे. यावेळी पंतप्रधानांनी विशेष मागास जमातीतील सुमारे 2 लाख महिला लाभार्थ्यांना आहार अनुदानाचा मासिक हप्ता वितरित केला. तसेच स्वामित्व योजनेच्या लाभार्थ्यांना 1.75 लाख अधिकार अभिलेखाचे वितरण केले आणि प्रधानमंत्री आदर्श ग्राम योजनेअंतर्गत 559 गावांना 55.9 कोटी रुपये हस्तांतरित केले.

पंतप्रधान 11 फेब्रुवारीला मध्य प्रदेश दौऱ्यावर

February 09th, 05:25 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी 11 फेब्रुवारी 2024 रोजी मध्य प्रदेशला भेट देणार आहेत. दुपारी 12:40 वाजता, ते मध्य प्रदेशात झाबुआ येथे सुमारे 7300 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचे लोकार्पण आणि पायाभरणी करतील.

पंतप्रधान 24 आणि 25 एप्रिलला मध्य प्रदेश, केरळ, दादरा नगर हवेली आणि दमण आणि दीवला देणार भेट

April 21st, 03:02 pm

पंतप्रधान 24 एप्रिल रोजी सकाळी सुमारे 11:30 वाजता मध्‍य प्रदेशातील रीवा येथे राष्ट्रीय पंचायती राज दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. रिवा येथे त्यांच्या हस्ते सुमारे 17,000 कोटी रूपये खर्चाच्या विविध प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण होईल.

पंतप्रधानांचे आसाम उच्च न्यायालयाच्या प्लॅटीनम ज्युबली कार्यक्रमातील भाषण

April 14th, 03:00 pm

आज गुवाहाटी उच्च न्यायालयाच्या अमृत महोत्सवी सोहळ्यात सहभागी होण्याचा आणि तुम्हा सर्वांमध्ये उपस्थित राहून या अविस्मरणीय क्षणाचा भाग होण्याचा मला खूप आनंद होत आहे. गुवाहाटी उच्च न्यायालयाचा 75 वर्षांचा हा प्रवास अशा वेळी पूर्ण झाला आहे, जेव्हा देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण झाली आहेत. आत्तापर्यंतच्या आपल्या अनुभवाचं संचित जपून ठेवण्याची ही वेळ आहे आणि नवीन उद्दिष्टे, तसच आवश्यक बदलांसाठी जबाबदारी स्वीकारण्याचा हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. विशेषत: गुवाहाटी उच्च न्यायालयाला स्वतःचा एक वेगळा वारसा आहे, स्वतःची एक ओळख आहे. हे एक असे उच्च न्यायालय आहे, ज्याचं अधिकार क्षेत्र सर्वात मोठं आहे. आसामसोबतच अरुणाचल प्रदेश, मिझोराम आणि नागालँड, म्हणजेच आणखी तीन राज्यांना सेवा देण्याची जबाबदारी तुम्ही सांभाळत आहात. 2013 पर्यंत तर ईशान्येतील 7 राज्ये गुवाहाटी उच्च न्यायालयाच्या अखत्यारीत येत होती. त्यामुळे गुवाहाटी उच्च न्यायालयाच्या 75 वर्षांच्या या प्रवासात संपूर्ण ईशान्येचा भूतकाळ जोडला गेला आहे, लोकशाही वारसा जोडला गेला आहे. या निमित्ताने मी आसाम आणि ईशान्येतील सर्व लोकांना आणि विशेषत: येथील अनुभवसंपन्न विधीतज्ञ बांधवांना खूप खूप शुभेच्छा देतो.

आसाममध्ये गुवाहाटीमधील श्रीमंत शंकरदेव कलाक्षेत्र येथे गुवाहाटी उच्च न्यायालयाच्या अमृत महोत्सव सोहळ्यात पंतप्रधानांनी केले मार्गदर्शन

April 14th, 02:45 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आसाममध्ये गुवाहाटीमधील श्रीमंत शंकरदेव कलाक्षेत्र येथे गुवाहाटी उच्च न्यायालयाच्या अमृत महोत्सव सोहळ्यात मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात पंतप्रधानांनी आसाम पोलिसांनी तयार केलेल्या ‘आसाम कॉप’ या मोबाईल ऍप्लिकेशनचा देखील प्रारंभ केला. या ऍपमुळे गुन्हे आणि गुन्हेगारी जाळ्याचा मागोवा घेणारी प्रणाली(CCTNS) आणि वाहन राष्ट्रीय नोंदणीपुस्तिका यामधील माहिती आणि आकडेवारीच्या आधारे गुन्हेगार आणि वाहनांचा शोध घेता येईल.

द्वितीय आणि तृतीय श्रेणीतील शहरे आर्थिक उलाढालींची केंद्रे बनत आहेत: पंतप्रधान मोदी

September 20th, 08:46 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमधील अहमदाबाद येथे आयोजित भाजपच्या महापौर आणि उपमहापौरांच्या परिषदेला दूरस्थ पद्धतीने संबोधित केले. पंतप्रधान मोदींनी त्यांच्या भाषणाच्या सुरुवातीलाच सरदार वल्लभभाई पटेल यांचा नगरपालिकेच्या माध्यमातून अहमदाबाद शहरासाठी केलेल्या कार्यापासून उप पंतप्रधानपदापर्यंत झालेला प्रवास विशद केला.

पंतप्रधान मोदींचे गुजरातमधील भाजपच्या महापौर आणि उपमहापौरांच्या परिषदेत भाषण

September 20th, 10:30 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमधील अहमदाबाद येथे आयोजित भाजपच्या महापौर आणि उपमहापौरांच्या परिषदेला दूरस्थ पद्धतीने संबोधित केले. पंतप्रधान मोदींनी त्यांच्या भाषणाच्या सुरुवातीलाच सरदार वल्लभभाई पटेल यांचा नगरपालिकेच्या माध्यमातून अहमदाबाद शहरासाठी केलेल्या कार्यापासून उप पंतप्रधानपदापर्यंत झालेला प्रवास विशद केला.

पंचायत राज दिवसानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातल्या ग्राम सभांशी साधला संवाद

April 24th, 11:31 am

जम्मू-काश्मीर चे नायब राज्यपाल मनोज सिन्हा जी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी गिरीराज सिंह जी, याच भूमीचे सुपुत्र माझे सहकारी डॉक्टर जितेंद्र सिंह, श्री कपिल मोरेश्वर पाटील जी, संसदेतले माझे सहकारी जुगल किशोर जी, जम्मू काश्मीर सह संपूर्ण देशातून या कार्यक्रमात सहभागी झालेले लोकप्रतिनिधी, बंधू आणि भगिनींनो!

पंतप्रधान नरेंद्र मोदी जम्मू-कश्मीर इथे राष्ट्रीय पंचायत राज दिनाच्या कार्यक्रमात सहभागी

April 24th, 11:30 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जम्मू कश्मीरच्या दौऱ्यावर असून ते राष्ट्रीय पंचायत राज दिनाच्या कार्यक्रमात सहभागी झाले. तसेच सांबा जिल्ह्यातील पल्ली ग्रामपंचायतीतून त्यांनी देशभरातील ग्रामसभांना संबोधित केले. यावेळी, पंतप्रधानांच्या हस्ते 20,000 कोटी रुपयांच्या विविध विकास कार्यक्रमांचे उद्घाटन आणि पायाभरणी झाली. तसेच, ‘अमृत सरोवर’ उपक्रमाचाही त्यांनी शुभारंभ केला. जम्मू कश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा, केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह, डॉ जितेंद्र सिंह आणि कपिल पाटील यावेळी उपस्थित होते.

लोककल्याणासाठी तंत्रज्ञानाच्या सामर्थ्याचा उपयोग करणे हा भारतातील खेड्यांमध्ये आमच्या सुशासनाच्या प्रयत्नांच्या केंद्रस्थानी आहे: पंतप्रधान नरेंद्र मोदी

April 24th, 11:28 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे की, लोकांच्या कल्याणासाठी तंत्रज्ञानाच्या सामर्थ्याचा वापर करणे हे भारतातील खेड्यांमध्ये आमच्या सुशासनाच्या प्रयत्नांच्या केंद्रस्थानी आहे. यासाठी पंतप्रधान मोदी यांनी ‘स्वामित्व’ योजनेचे उदाहरण दिले असून त्याचे उत्तम परिणाम दिसून येत असल्याचे म्हटले आहे.

पंतप्रधान 24 एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरमधील राष्ट्रीय पंचायती राज सोहोळ्यात सहभागी होणार

April 23rd, 11:23 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या 24 एप्रिल 2022 रोजी सकाळी साडेअकरा वाजता जम्मू-काश्मीर येथे होणाऱ्या राष्ट्रीय पंचायती राज सोहोळ्यात सहभागी होण्यासाठी जम्मू-काश्मीरला भेट देणार आहेत. तसेच ते देशभरातील ग्रामसभांना देखील संबोधित करणार आहेत. ते सांबा जिल्ह्यातील पल्ली पंचायतीच्या कार्यालयाला भेट देणार आहेत. या भेटीदरम्यान पंतप्रधान सुमारे 20,000 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकासविषयक उपक्रमांचे उद्घाटन करून कोनशीला बसवतील. पंतप्रधान या वेळी अमृत सरोवर उपक्रमाची सुरुवात देखील करणार आहेत. त्यानंतर, संध्याकाळी 5 वाजण्याच्या सुमारास ते मुंबई येथे होणाऱ्या मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार सोहोळ्याला उपस्थित राहतील. या सोहोळ्यात मोदी यांना पहिला लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.

गरूड एअरोस्पेसच्यावतीने 100 कृषी ड्रोनच्या उड्डाण प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

February 19th, 11:54 am

देशासाठी आजचा काळ हा स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा आहे. हा काळ युवा भारताचा आहे आणि भारताच्या युवकांचा काळ आहे. गेल्या काही वर्षांमध्ये देशामध्ये ज्या काही सुधारणा घडून आल्या आहेत, त्यामुळे युवावर्ग आणि खाजगी क्षेत्राला एक नवीन ताकद, ऊर्जा मिळाली आहे. ड्रोनविषयीही भारताने शंका उपस्थित करून कोणत्याही प्रकारे वेळ वाया घालवला नाही. आम्ही युवकांच्या हुशारीवर, बुद्धिमत्तेवर विश्वास दाखवला. आणि नवीन विचाराचा स्वीकार करून पुढे चाललो आहोत.

देशभरात 100 ठिकाणी किसान ड्रोन कार्यरत झाल्याचे पाहून आनंद झाला: पंतप्रधान

February 19th, 11:14 am

देशभरात 100 ठिकाणी किसान ड्रोनची उड्डाणे पाहून मला आनंद झाला, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

उत्तर प्रदेशातील मेरठ येथे मेजर ध्यानचंद क्रीडा विद्यापीठाच्या पायाभरणी प्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण

January 02nd, 01:01 pm

उत्तर प्रदेशच्या राज्यपाल श्रीमती आनंदीबेन पटेल जी, येथील लोकप्रिय आणि उत्साही मुख्यमंत्री श्री योगी आदित्यनाथ जी, उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य जी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी श्री संजीव बाल्यान जी, व्ही के सिंहजी, मंत्री श्री दिनेश खटीकजी , श्री उपेंद्र तिवारीजी, श्री कपिल देव अग्रवालजी , संसदेतील माझे सहकारी श्री सत्यपाल सिंहजी , राजेंद्र अग्रवालजी , विजयपाल सिंह तोमरजी , श्रीमती कांता कर्दमजी , आमदार भाई सोमेंद्र तोमरजी , संगीत सोमजी , जितेंद्र सतवालजी, सत्य प्रकाश अग्रवालजी, मेरठ जिल्हा परिषद अध्यक्ष गौरव चौधरीजी, मुझफ्फरनगर जिल्हा परिषद अध्यक्ष वीरपालजी, इतर सर्व लोकप्रतिनिधी आणि मेरठ-मुझफ्फरनगर, दूरदूरवरून आलेल्या माझ्या प्रिय बंधू-भगिनींनो, तुम्हा सर्वांना 2022 च्या खूप खूप शुभेच्छा.

उत्तर प्रदेशात मेरठ येथे मेजर ध्यानचंद क्रीडा विद्यापीठाची पंतप्रधानांच्या हस्ते पायाभरणी

January 02nd, 01:00 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशात मेरठ येथे मेजर ध्यानचंद क्रीडा विद्यापीठाची पायाभरणी केली.अंदाजे 700 कोटी रुपये खर्चून या क्रीडा विद्यापीठाची स्थापना करण्यात येईल आणि सिंथेटिक हॉकी मैदान, फुटबॉल मैदान, बास्केटबॉल/व्हॉलीबॉल/हँडबॉल/कबड्डी मैदान, लॉन टेनिस कोर्ट, जिम्नॅशियम हॉल, सिंथेटिक रनिंग स्टेडियम, जलतरण तलाव, बहुउद्देशीय सभागृह आणि सायकल शर्यतीसाठी असणारे रिंगण यासह आधुनिक आणि अत्याधुनिक क्रीडा पायाभूत सुविधांनी हे विद्यापीठ सुसज्ज असेल. विद्यापीठात नेमबाजी, स्क्वॉश, जिम्नॅस्टिक्स, भारोत्तोलन, तिरंदाजी, कॅनोईंग आणि कयाकिंग इत्यादी सुविधाही उपलब्ध असतील.या विद्यापीठात 540 महिला आणि 540 पुरुष खेळाडूंसह 1080 खेळाडूंना प्रशिक्षण देण्याची क्षमता असेल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्य प्रदेशात स्वामित्व योजनेच्या लाभार्थ्यांशी संवाद साधताना केलेले भाषण

October 06th, 12:31 pm

स्वामित्व योजनेमुळे जो आत्मविश्वास, जो विश्वास गावांमध्ये निर्माण झाला आहे तो लाभार्थ्यांशी संवाद साधताना त्यांच्या चेहऱ्यावर अगदी स्पष्ट झळकत आहे आणि मी आज या ठिकाणी देखील पाहत आहे, तुमच्याक़डील बांबूच्या खुर्च्या तुम्ही मला दाखवल्या, पण माझी नजर दूरवर पसरलेल्या या जनता-जनार्दनाचा जो उत्साह आहे, आकांक्षा आहेत त्यावर खिळलेली आहे. जनतेचे इतके प्रेम, इतके आशीर्वाद मिळत आहेत, त्यांचे किती भले झाले असेल, याचा मला पुरेपूर अंदाज येऊ शकतो. ही योजना किती मोठी ताकद बनून उदयाला येत आहे, हा अनुभव आता ज्या बांधवांसोबत मला बोलण्याची संधी मिळाली, त्यांनी दिलेल्या सविस्तर माहितीमध्ये मिळाला आहे. स्वामित्व योजनेनंतर लोकांना बँकातून कर्ज मिळणे आणखी जास्त सुलभ झाले आहे.

पंतप्रधानांनी मध्यप्रदेशातील स्वामित्व योजनेच्या लाभार्थ्यांशी साधला संवाद

October 06th, 12:30 pm

पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी आज मध्य प्रदेशातील स्वामित्व योजनेच्या लाभार्थ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. यावेळी पंतप्रधानांनी या योजनेअंतर्गत 1,71,000 लाभार्थ्यांना ई मालमत्ता पत्रांचे वाटप केले. केंद्रीय मंत्री, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री, खासदार आणि आमदार, लाभार्थी, गाव, जिल्हा आणि राज्य अधिकारी यावेळी उपस्थित होते.

75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी केलेल्या भाषणातील ठळक मुद्दे

August 15th, 03:02 pm

आज, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या पवित्र उत्सवदिनी, देश आपल्या सर्व स्वातंत्र्य सैनिक आणि शूर वीरांना नमन करत आहे, जे राष्ट्राच्या संरक्षणासाठी अहोरात्र बलिदान देत आहेत. देश आज या प्रत्येक विभूतीचे स्मरण करत आहे. आदरणीय बापु, ज्यांनी स्वातंत्र्य ही एक लोक चळवळ बनवली , नेताजी सुभाषचंद्र बोस, ज्यांनी स्वातंत्र्यासाठी सर्वस्व अर्पण केले, भगतसिंग, चंद्रशेखर आझाद, बिस्मिल आणि अशफाकुल्ला खान सारखे महान क्रांतिकारक; झाशीची राणी लक्ष्मीबाई, कित्तूरची राणी चेन्नम्मा किंवा राणी गायदिनलियू किंवा मातंगीनी हजराचे शौर्य; देशाचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू जी, सरदार वल्लभभाई पटेल, ज्यांनी देशाला एकसंध राष्ट्र बनवले आणि बाबासाहेब आंबेडकर, ज्यांनी भारताची भावी दिशा ठरवली आणि मार्ग सुकर केला. देश या सर्व महान व्यक्तींचा सदैव ऋणी आहे.