सुझुकी कंपनीला भारतामध्ये 40 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल गुजरातमधल्या गांधीनगर येथे झालेल्या कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
August 28th, 08:06 pm
गुजरातचे लोकप्रिय मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल, हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल, उपमुख्यमंत्री भाई श्रीकृष्ण चौटाला, संसदेतले माझे सहकारी सी.आर पाटील, सुझुकी मोटार कॉर्पोरेशनचे वरिष्ठ अधिकारी मंडळी, भारतातील जपानचे राजदूत, मारूती-सुझुकीचे वरिष्ठ अधिकारी, आणि इतर मान्यवर तसेच बंधू आणि भगिनींनो,भारतात सुझुकीला 40 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त गांधीनगर मधील महात्मा मंदिर येथे आयोजित कार्यक्रमाला पंतप्रधानांनी केले संबोधित
August 28th, 05:08 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गांधीनगर मधील महात्मा मंदिर येथे भारतात सुझुकीला 40 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित कार्यक्रमाला संबोधित केले. जपानचे भारतातील राजदूत सातोशी सुझुकी, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, खासदार सी आर पाटील, राज्याचे मंत्री जगदीश पांचाळ, सुझुकी मोटर कॉर्पोरेशनचे माजी अध्यक्ष ओ सुझुकी, सुझुकी मोटर कॉर्पोरेशनचे अध्यक्ष टी सुझुकी आणि मारुती-सुझुकीचे अध्यक्ष आर सी भार्गव यावेळी उपस्थित होते. हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित केले तर जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांचा व्हिडिओ संदेश देखील यावेळी दाखवण्यात आला.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुझुकी मोटर कॉर्पोरेशनचे वरिष्ठ सल्लागार ओसामू सुझुकी यांची घेतली भेट
May 23rd, 12:37 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 23 मे 2022 रोजी टोकियो येथे सुझुकी मोटार कॉर्पोरेशनचे वरिष्ठ सल्लागार ओसामू सुझुकी यांची भेट घेतली. या भेटीच्या वेळी पंतप्रधानांनी, सुझुकी यांचे भारताशी असलेले संबंध आणि भारतातले योगदान यांचे स्मरण करत भारतातल्या वाहन उद्योगामध्ये सुझुकी मोटर्सने बजावलेल्या परिवर्तनात्मक भूमिकेची प्रशंसा केली. वाहन उद्योग आणि वाहनांचे सुट्टे भाग क्षेत्रातल्या,उत्पादनाशी संलग्न प्रोत्साहन (पीएलआय) योजने अंतर्गत स्वीकृत अर्जदारांपैकी सुझुकी मोटर गुजरात प्रायव्हेट लिमिटेड आणि मारूती सुझुकी इंडिया लिमिटेड असल्याबद्दल त्यांनी प्रशंसा केली.