राजस्थानमध्ये जयपूर इथे ‘एक वर्ष –परिणाम उत्कर्ष’ कार्यक्रम आणि अन्य विकासकामांच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधानांचे भाषण
December 17th, 12:05 pm
राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे, राजस्थानचे लोकप्रिय मुख्यमंत्री मोहन यादव, केंद्रिय मंत्रीमंडळातले माझे सहकारी सी. आर. पाटील, भगीरथ चौधरी, राजस्थानच्या उपमुख्यमंत्री दिया कुमारी, प्रेम चंद भेरवा आणि अन्य मंत्री, खासदार, राजस्थानचे आमदार, मान्यवर व्यक्ती तसंच राजस्थानमधल्या माझ्या प्रिय बंधु भगिनींनो,पंतप्रधान नरेंद्र मोदी राजस्थानमधील जयपूर येथे 'एक वर्ष-परिणाम उत्कर्ष' या राज्य सरकारच्या वर्षपूर्ती कार्यक्रमात झाले सहभागी
December 17th, 12:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ' एक वर्ष-परिणाम उत्कर्ष':राजस्थान राज्य सरकारची वर्षपूर्ती या कार्यक्रमात सहभागी झाले. यावेळी जनतेला संबोधित करताना त्यांनी राज्य सरकारच्या यशस्वी वर्षपूर्तीबद्दल राज्य सरकार आणि राजस्थानच्या जनतेचे अभिनंदन केले. या कार्यक्रमात जमलेल्या लाखो लोकांचे आशीर्वाद घेण्याचे भाग्य आपल्याला लाभले, असे त्यांनी सांगितले. राजस्थानच्या विकासकामांना नवी दिशा आणि गती देण्यासाठी राजस्थानचे मुख्यमंत्री आणि त्यांच्या चमूने केलेल्या प्रयत्नांचे मोदींनी कौतुक केले . पहिल्या वर्षाने पुढील अनेक वर्षांच्या विकासासाठी एक भक्कम पाया म्हणून काम केले आहे , असे ते म्हणाले. आजच्या कार्यक्रमाने राज्य सरकारच्या वर्षपूर्तीचेच दर्शन घडत नाही तर राजस्थानच्या तेजस्वी प्रकाशाचे आणि विकासाच्या उत्सवाचे ते प्रतीक आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले. अलीकडेच रायझिंग राजस्थान शिखर परिषद 2024 च्या वेळी दिलेल्या भेटीचे स्मरण करत यावेळी जगभरातील अनेक गुंतवणूकदार उपस्थित होते आणि आज 45,000 कोटी रुपयांहून जास्त खर्चाच्या प्रकल्पांचे उद्घाटन झाल्याची माहिती पंतप्रधानांनी दिली. या प्रकल्पांमुळे राजस्थानमधील पाण्याशी संबंधित समस्यांवर योग्य तोडगा निघेल आणि राजस्थान भारतातील परस्परांशी जोडलेल्या सर्वात चांगल्या राज्यांपैकी एक बनेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या विकासकामांमुळे अधिकाधिक गुंतवणूकदार आकर्षित होतील, रोजगाराच्या अनेक संधी निर्माण होतील, पर्यटन क्षेत्राला बळकटी मिळेल तसेच राजस्थानमधील शेतकरी, महिला आणि तरुणांना फायदा होईल, असे देखील पंतप्रधानांनी सांगितले.तीन नवीन फौजदारी कायद्यांच्या यशस्वी अंमलबजावणीच्या समर्पणाच्या वेळी पंतप्रधानांनी केलेल्या भाषणाचा मजकूर
December 03rd, 12:15 pm
चंदीगडमध्ये आलो की मला माझ्याच लोकांमध्ये आल्यासारखे वाटते. चंदीगडची ओळख शक्तीस्वरूपा माँ चंडिका देवीच्या नावाशी जोडलेली आहे. माँ चंडी म्हणजे शक्तीचे असे स्वरूप, जे सत्य आणि न्यायाची पाठराखण करते. हीच भावना भारतीय न्याय संहिता आणि नागरी सुरक्षा संहितेच्या संपूर्ण मसुद्याचा पाया आहे. आज देश विकसित भारताच्या संकल्पासह आगेकूच करतो आहे संविधानाला 75 वर्षे पूर्ण होत आहेत... अशा वेळी संविधानाच्या भावनेने प्रेरित भारतीय न्यायिक संहितेची अंमलबजावणी होते आहे, ही एक मोठी सुरुवात आहे. आपल्या राज्यघटनेने देशातील नागरिकांसाठी कल्पना केलेल्या आदर्शांची पूर्तता करण्याच्या दिशेने हा एक ठाम प्रयत्न आहे. या कायद्यांची अंमलबजावणी कशी होईल, याचे प्रात्यक्षिक अर्थात लाईव्ह डेमो मी आता पाहत होतो. आणि मी इथल्या प्रत्येकाला विनंती करतो की त्यांनी वेळ काढून हा लाईव्ह डेमो पाहावा. कायद्याच्या विद्यार्थ्यांनी पहावे, बार मधील सहकाऱ्यांनी पहावे, न्यायपालिकेच्या मित्रांना शक्य असले, तर त्यांनीही पहावे. या निमित्ताने मी सर्व देशवासियांना भारतीय न्याय संहिता, नागरी संहिता लागू झाल्याबद्दल शुभेच्छा देतो आणि चंदीगड प्रशासनाशी संबंधित सर्वांचे मी अभिनंदन करतो.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते तीन नवीन फौजदारी कायद्यांच्या यशस्वी अंमलबजावणीचे लोकार्पण
December 03rd, 11:47 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज चंदीगड येथे भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष अधिनियम या तीन परिवर्तनकारी नवीन फौजदारी कायद्यांची यशस्वी अंमलबजावणी देशाला समर्पित केली. उपस्थितांना संबोधित करताना मोदी यांनी चंडीगढची ओळख सत्य आणि न्याय प्रस्थापित करणारी शक्ती माँ चंडी देवीशी निगडित असल्याचे नमूद केले . हेच तत्त्वज्ञान भारतीय न्याय संहिता आणि भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या संपूर्ण स्वरूपाचा आधार असल्याचे ते म्हणाले. भारतीय राज्यघटनेच्या भावनेने प्रेरित भारतीय न्याय संहिता अंमलात आणणे हा एक गौरवशाली क्षण होता कारण देश विकसित भारताच्या संकल्पासह पुढे मार्गक्रमण करण्याच्या तसेच भारतीय राज्यघटनेची 75 वर्षे साजरी करण्याच्या महत्त्वाच्या टप्प्यावर होता असे पंतप्रधान म्हणाले. ते पुढे म्हणाले की, आपल्या राज्यघटनेने देशातील नागरिकांसाठी ज्या आदर्शांची कल्पना केली , ती पूर्ण करण्याच्या दिशेने हा एक ठोस प्रयत्न आहे. मोदी म्हणाले की या कायद्यांची अंमलबजावणी कशी करायची याची झलक त्यांना थेट प्रात्यक्षिकातून पहायला मिळाली. पंतप्रधानांनी लोकांना कायद्यांचा हा लाईव्ह डेमो पाहण्याचे आवाहन केले. तीन नवीन फौजदारी कायद्यांच्या यशस्वी अंमलबजावणी निमित्त त्यांनी सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा दिल्या. चंदीगड प्रशासनातील सर्व संबंधितांचेही त्यांनी अभिनंदन केले.सर्वोच्च न्यायालयात झालेल्या संविधान दिवस कार्यक्रमात पंतप्रधानांचे संबोधन
November 26th, 08:15 pm
भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती संजीव खन्ना जी, न्यायमूर्ती बी. आर. गवई जी, न्यायमूर्ती सुर्यकांत जी, केंद्रीय मंत्रिमंडळातले माझे सहकारी अर्जुन राम मेघवाल जी, अटर्नी जनरल वेंकटरमणी जी, बार कौन्सिलचे अध्यक्ष मनन कुमार मिश्र जी, सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनचे अध्यक्ष कपिल सिब्बल जी, सर्वोच्च न्यायालयाचा न्यायमूर्ती गण, माजी न्यायाधीश वर्ग, उपस्थित इतर मान्यवर, स्त्री आणि पुरुष वर्ग,पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वोच्च न्यायालयात झालेल्या संविधान दिनाच्या कार्यक्रमात झाले सहभागी
November 26th, 08:10 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील सर्वोच्च न्यायालयात झालेल्या संविधान दिनाच्या कार्यक्रमात भाग घेतला. सरन्यायाधीश संजीव खन्ना, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती बी.आर. गवई आणि न्यायमूर्ती सूर्यकांत, कायदा आणि न्याय मंत्री अर्जुन राम मेघवाल, भारताचे ऍटर्नी जनरल आणि इतर मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते.पंतप्रधान 26 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या संविधान दिन कार्यक्रमात होणार सहभागी
November 25th, 08:11 pm
भारतीय राज्यघटनेच्या स्वीकाराला 75 वर्षे पूर्ण होत आहेत, या महत्त्वपूर्ण प्रसंगानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत.सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासकीय संकुलातील सभागृहात संध्याकाळी 5 वाजता संविधान दिनाचा सोहळा होणार आहे.यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतीय न्यायपालिकेचा वार्षिक अहवाल (2023-24) जारी करणार असून उपस्थितांना संबोधित करणार आहेत.Maharashtra has witnessed the triumph of development, good governance, and genuine social justice: PM Modi
November 23rd, 10:58 pm
Prime Minister Narendra Modi addressed BJP workers at the party headquarters following the BJP-Mahayuti alliance's resounding electoral triumph in Maharashtra. He hailed the victory as a decisive endorsement of good governance, social justice, and development, expressing heartfelt gratitude to the people of Maharashtra for trusting BJP's leadership for the third consecutive time.PM Modi addresses passionate BJP Karyakartas at the Party Headquarters
November 23rd, 06:30 pm
Prime Minister Narendra Modi addressed BJP workers at the party headquarters following the BJP-Mahayuti alliance's resounding electoral triumph in Maharashtra. He hailed the victory as a decisive endorsement of good governance, social justice, and development, expressing heartfelt gratitude to the people of Maharashtra for trusting BJP's leadership for the third consecutive time.PM Modi conveys best wishes to Justice Sanjiv Khanna on taking oath as Chief Justice of Supreme Court of India
November 11th, 01:34 pm
The Prime Minister, Shri Narendra Modi has conveyed his best wishes to Justice Sanjiv Khanna on taking oath as Chief Justice of Supreme Court of India.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जिल्हा न्यायपालिकेच्या राष्ट्रीय परिषदेत केलेले भाषण
August 31st, 10:30 am
तुम्ही लोक खूप गंभीर आहात, त्यामुळे मला असे वाटते की हा सोहळाही खूप गंभीर आहे. काही दिवसांपूर्वी मी राजस्थान उच्च न्यायालयाच्या प्लॅटिनम ज्युबिली समारंभाला गेलो होतो. आणि, आज सर्वोच्च न्यायालयाच्या 75 वर्षांच्या वाटचालीच्या निमित्ताने जिल्हा न्यायपालिकेची राष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाची 75 वर्षे, हा केवळ एका संस्थेचा प्रवास नाही. हा आहे भारताच्या संविधानाचा आणि संविधानिक मूल्यांचा प्रवास! हा प्रवास आहे- एक लोकशाही म्हणून भारताचा अधिक परिपक्व होण्याचा प्रवास! आणि या प्रवासात आपल्या संविधान निर्मात्यांचे आणि न्यायव्यवस्थेतील अनेक जाणकारांचे योगदान मोलाचे आहे. यात पिढ्यानपिढ्या कोट्यवधी देशबांधवांचे योगदान आहे, ज्यांनी प्रत्येक परिस्थितीत न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवला आहे. भारतातील जनतेने सर्वोच्च न्यायालयावर, आपल्या न्यायव्यवस्थेवर कधीच अविश्वास दाखवला नाही. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाची ही 75 वर्षे लोकशाहीची माता म्हणून भारताचा बहुमान आणखी वाढवत आहेत. हे आपल्या सांस्कृतिक घोषणेला बळ देते – ज्यामध्ये म्हटले आहे सत्यमेव जयते, नानृतम्. यावेळी देश आपल्या स्वातंत्र्याची 75 वर्षे पूर्ण करून संविधानाचा 75 वा वर्धापन दिन साजरा करणार आहे. त्यामुळे या प्रसंगी अभिमानही आहे, सन्मान आहे आणि प्रेरणा आहे. या निमित्त मी तुम्हा सर्व विधिज्ञांचे आणि सर्व देशवासियांचे अभिनंदन करतो. यानिमित्ताने राष्ट्रीय जिल्हा न्यायिक परिषदेच्या महत्त्वाच्या कार्यक्रमासाठी मी तुम्हा सर्वांना शुभेच्छा देतो.पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्ली येथे जिल्हा न्यायपालिकांच्या राष्ट्रीय परिषदेचे केले उदघाटन
August 31st, 10:00 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे जिल्हा न्यायपालिकेच्या राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन केले. यावेळी पंतप्रधानांनी भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या स्थापनेच्या अमृत महोत्सवी 75 वर्षांच्या कार्यकाळाच्या निमित्ताने एका टपाल तिकिटाचे आणि नाण्याचे प्रकाशन देखील केले. भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने आयोजित केलेल्या या दोन दिवसीय परिषदेत जिल्हा न्यायव्यवस्थेशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा आणि विचारमंथन करण्यासाठी पाच कामकाजांची सत्रे आयोजित केली आहेत; ज्यात पायाभूत सुविधा आणि मानव संसाधने, सर्वांसाठी सर्वसमावेशक न्यायालये, न्यायिक सुरक्षा आणि न्यायिक कल्याण, खटल्यांचे व्यवस्थापन आणि न्यायिक प्रशिक्षण,या विषयांचा समावेश आहे.पंतप्रधान 31 ऑगस्ट रोजी, जिल्हा न्यायपालिकांच्या राष्ट्रीय परिषदेचे उदघाटन करणार
August 30th, 04:15 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी 31 ऑगस्ट 2024 रोजी नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे सकाळी10 वाजता जिल्हा न्यायपालिकांच्या राष्ट्रीय परिषदेचे उदघाटन करणार आहेत.या प्रसंगी, पंतप्रधान भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या स्थापनेला 75 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने एका टपाल तिकिटाचे आणि नाण्याचे अनावरणही करणार आहेत.जोधपुर इथे राजस्थान उच्च न्यायालयाच्या अमृत महोत्सवी सोहोळ्यातले पंतप्रधानांचे संबोधन
August 25th, 05:00 pm
कार्यक्रमाला उपस्थित राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ कृष्णराव बागड़े जी, राजस्थानचे लोकप्रिय मुख्यमंत्री भजनलाल शर्मा, न्यायमूर्ती संजीव खन्ना जी, देशाचे कायदा मंत्री अर्जुनराम मेघवाल जी, राजस्थान उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश मणींद्र मोहन श्रीवास्तव जी, इतर सर्व माननीय न्यायाधीश, न्याय जगतातले सर्व मान्यवर, उपस्थित महिला आणि पुरुष वर्ग,जोधपूरमधील राजस्थान येथे राजस्थान उच्च न्यायालयाच्या अमृत महोत्सवी सोहळ्याच्या समारोप कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले संबोधित
August 25th, 04:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जोधपूरमधील राजस्थान येथे राजस्थान उच्च न्यायालयाच्या अमृत महोत्सवी सोहळ्याच्या समारोप कार्यक्रमाला संबोधित केले. त्यांनी राजस्थान उच्च न्यायालयाच्या संग्रहालयाचे देखील उद्घाटन केले.78 व्या स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून राष्ट्राला संबोधित केले
August 15th, 03:04 pm
त्यांच्या संबोधनातील काही ठळक मुद्दे:78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
August 15th, 01:09 pm
आज अत्यंत शुभ क्षण आहे, ज्या वेळी आपण देशासाठी बलिदान देणाऱ्या, देशाच्या स्वातंत्र्यासाठी स्वतःचे जीवन समर्पित करणाऱ्या, आयुष्यभर त्यासाठी संघर्ष करणाऱ्या, फाशीच्या तख्तावर ‘भारतमाता की जय’ अशा घोषणा देणाऱ्या, असंख्य स्वातंत्र्य प्रेमींना वंदन करण्याचा हा उत्सव आहे, त्यांचे पुण्यस्मरण करण्याचा हा प्रसंग आहे. स्वातंत्र्य सैनिकांनी आज आपल्याला ह्या प्रसंगी स्वातंत्र्यासह श्वास घेण्याचे भाग्य दिले आहे. हा देश त्यांचा ऋणी आहे. अशा प्रत्येक महान व्यक्तीप्रती आपण श्रद्धेची भावना व्यक्त करूया.भारतात साजरा झालेला 78 वा स्वातंत्र्यदिन सोहळा
August 15th, 07:30 am
पंतप्रधान मोदींनी 78 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त केलेल्या आपल्या भाषणात भारताच्या भविष्याबद्दलच्या व्हिजनची रुपरेषा मांडली. 2036 च्या ऑलिम्पिकचे आयोजन करण्यापासून ते धर्मनिरपेक्ष नागरी संहिता अंमलात आणण्यापर्यंतच्या मुद्द्यांसह भारताची सामूहिक प्रगती आणि प्रत्येक नागरिकाचे सक्षमीकरण यावर पंतप्रधान मोदींनी प्रकर्षाने भर दिला. भ्रष्टाचाराविरुद्धचा लढा नव्या जोमाने सुरू ठेवण्यात येईल असेही त्यांनी सांगितले. नवोन्मेष, शिक्षण आणि जागतिक नेतृत्व या गोष्टी केंद्रस्थानी ठेवल्यास 2047 पर्यंत भारताला विकसित भारत बनण्यापासून काहीही रोखू शकत नाही याचा त्यांनी पुनरुच्चार केला.लोकसभेतील राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभारदर्शक प्रस्तावाला पंतप्रधानांनी दिलेल्या उत्तराचा मजकूर
July 02nd, 09:58 pm
माननीय राष्ट्रपतीजींनी आपल्या अभिभाषणात विकसित भारताच्या संकल्पाचा विस्तार केला आहे. माननीय राष्ट्रपती महोदयांनी महत्वाचे मुद्दे मांडले आहेत. राष्ट्रपतीजींनी आपल्या सर्वांना आणि देशाला मार्गदर्शन केले आहे, त्याबद्दल मी राष्ट्रपतीजींचे मनःपूर्वक आभार मानतो.राष्ट्रपतींच्या लोकसभेतील अभिभाषणाविषयीच्या आभारप्रदर्शन प्रस्तावावर पंतप्रधानांचे उत्तर
July 02nd, 04:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभारप्रदर्शन प्रस्तावाला उत्तर दिले. सभागृहाला संबोधित करताना पंतप्रधानांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणाबद्दल त्यांचे आभार मानले आणि या भाषणाचा केंद्रबिंदू असलेल्या विकसित भारत संकल्पनेला अधोरेखित केले. राष्ट्रपतींनी आपल्या भाषणात महत्त्वाचे मुद्दे मांडले असल्याचे त्यांनी अधोरेखित केले आणि त्यांच्या मार्गदर्शनाबद्दल आभार मानले.