पंतप्रधानांच्या हस्ते एकात्मिक तपास नाक्याचे उदघाटन आणि कर्तारपूर साहिब कॉरिडॉर येथून यात्रेकरुंचा पहिला चमू रवाना
November 09th, 05:22 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज गुरुदासपूर, पंजाब येथे एकात्मिक तपास नाक्याचे उदघाटन करण्यात आले तसेच भाविकांचा पहिला चमू रवाना करण्यात आला.पंजाबमधील गुरुदासपूर येथे डेरा बाबा नानक इथल्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
November 09th, 11:13 am
आज या पवित्र भूमीवर येऊन मी धन्य झालो आहे. माझं सौभाग्य आहे, की आज मी देशाला कर्तारपूर कॉरिडॉर समर्पित करतो आहे.तुम्हाला कारसेवेच्या वेळी जशी अनुभूती येते तशीच अनुभूती मलाआज इथे येत आहे. आज मी तुम्हाला सर्वांना, संपूर्ण देशाला, जगभरात राहणाऱ्या शिख बंधू-भगिनींना मी आज खूप खूप शुभेच्छा देतो.गुरुनानक देव जी यांची शिकवण आणि मूल्ये आत्मसात करावी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
November 09th, 11:12 am
गुरु नानक देव जी यांची मूल्ये आणि शिकवण आजही आपल्याला मार्गदर्शक असून सर्वांनी ती आत्मसात करावी, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. पंतप्रधान आज कर्तारपूर कॉरिडॉर एकात्मिक चेक पोस्ट च्या उदघाटन समारंभात डेरा नानक देव जी येथे बोलत होते. यावेळी गुरु नानक देव जी यांच्या 550 व्या जनशताब्दीनिमित्त एका विशेष नाण्याचेही त्यांच्या हस्ते प्रकाशन झाले.पंतप्रधानांनी घेतले गुरुद्वारा बेर साहिबचे दर्शन
November 09th, 10:00 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सुलतानपूर लोधी येथील गुरुद्वारा बेर साहिबचे दर्शन घेतले. यावेळी पंतप्रधानांसमवेत केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योगमंत्री श्रीमती हरसिमरत कौर बादल, पंजाबचे राज्यपाल व्ही.पी.सिंग बडनोर, पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांची उपस्थिती होती.पंतप्रधान उद्या 9 नोव्हेंबर 2019 रोजी कर्तारपूर कॉरिडॉर येथे एकात्मिक तपास नाक्याचे उद्घाटन करणार
November 08th, 02:48 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या 9 नोव्हेंबर 2019 रोजी पंजाबमधल्या गुरुदासपूर येथील डेरा बाबा नानक येथे कर्तारपूर कॉरिडॉरच्या एकात्मिक तपास नाक्याचे उद्घाटन करणार आहेत.गुरु नानक देव यांच्या 550 व्या जयंती समारंभाच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
November 22nd, 05:19 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली, आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत शीख धर्मगुरू गुरु नानक यांच्या 550व्या जयंती उत्सवाच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. पुढच्या वर्षी येणाऱ्या या जयंतीनिमित्त देशभरात आणि जगातही उत्सव तसेच विविध समारंभ साजरे केले जाणार आहेत. राज्य सरकारे आणि परदेशातील भारतीय दूतावास या जयंती उत्सवात सहभागी होतील. गुरुनानक देव यांनी जगाला प्रेम, शांती, समानता आणि बंधुत्वाची शिकवण दिली असून ती चिरंतन आहे.