पंतप्रधानांनी सिकर, राजस्थान येथे विविध प्रकल्पांच्या उद्घाटन/पायाभरणी प्रसंगी केलेले भाषण
July 27th, 12:00 pm
राजस्थानचे राज्यपाल श्रीमान कलराज मिश्र जी, केंद्रीय मंत्री श्री नरेंद्र सिंहजी तोमर, अन्य सर्व मंत्री, संसदेतील माझे सहकारी, आमदार आणि अन्य सर्व मान्यवर, तसेच आज या कार्यक्रमात देशातील लाखो ठिकाणांहून कोट्यवधी शेतकरी आपल्या सोबत जोडले गेले आहेत. मी राजस्थानच्या भूमीतून देशातील त्या कोट्यवधी शेतकऱ्यांनाही नमन करतो. राजस्थानातील माझे प्रिय बंधू-भगीनीही आज या महत्वपूर्ण कार्यक्रमाची शोभा वाढवत आहेत.राजस्थानमध्ये सिकर येथे पंतप्रधानांकडून विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण
July 27th, 11:15 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राजस्थानमध्ये सिकर येथे विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण केले. आज लोकार्पण झालेल्या प्रकल्पांमध्ये 1.25 लाखांपेक्षा जास्त पीएम किसान समृद्धी केंद्रे(पीएमकेएसके), सल्फरचा थर दिलेल्या युरिया गोल्ड या युरियाच्या नव्या खत उत्पादनाचे उद्घाटन, 1600 कृषी उत्पादन संघटनांच्या ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स (ओएनडीसी) वर ऑनबोर्डिंग, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी(पीएम-किसान) अंतर्गत 8.5 कोटी लाभार्थ्यांना 17,000 कोटी रुपयांच्या 14व्या हप्त्याचे वितरण, चितोडगड, धोलपूर, सिरोही, सिकर आणि श्री गंगानगर येथे 5 नव्या वैद्यकीय महाविद्यालयांचे उद्घाटन, बरन, बुंदी, करौली, झुनझुनु, सवाई माधोपूर. जैसलमेर आणि टांक या 7 ठिकाणी वैद्यकीय महाविद्यालयांची पायाभरणी, उदयपूर, बंसवारा, परतापगढ आणि डुंगरपूर या जिल्ह्यांमध्ये 6 एकलव्य आदर्श निवासी शाळांचे उद्घाटन आणि तिवरी, जोधपूर येथे केंद्रीय विद्यालयाचे उद्धाटन यांचा समावेश होता.