“सुगम्य भारत अभियान एक गेम चेंजर; कर्नाटक काँग्रेस प्रतिष्ठा आणि अधिकार देण्याच्या बांधिलकीपासून दूर जात आहे,” अर्थसंकल्पात दिव्यांगांसाठीच्या तरतुदीत केलेल्या कपातीवर भाजपच्या मंत्र्यांची टिप्पणी

December 03rd, 03:47 pm

सुगम्य भारत अभियानाच्या वर्धापनदिनी बोलताना भारताचे केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री डॉ वीरेंद्र कुमार,यांनी सर्वांना सामावून घेणारा आणि सर्वांना सर्व सुविधा उपलब्ध असतील असा समाज निर्माण करण्याप्रती असलेली केंद्र सरकारची अढळ वचनबद्धता स्पष्ट केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली साध्य केलेली प्रगती डॉ. कुमार यांनी विशद केली तसेच भारताच्या खऱ्या समावेशकतेच्या प्रवासातील आणखी एक महत्त्वाचा टप्पा असलेल्या या उपक्रमाच्या परिवर्तनात्मक प्रभावावर डॉ. कुमार यांनी प्रकाश टाकला.