नवी दिल्लीतील लाल किल्ला येथे पराक्रम दिवसानिमित्त पंतप्रधानांनी केलेले भाषण

January 23rd, 06:31 pm

केंद्रीय मंत्रिमंडळातले माझे सहकारी किशन रेड्डी जी, अर्जुन राम मेघवाल जी, मीनाक्षी लेखी जी, अजय भट्ट जी, ब्रिगेडियर आर एस चिकारा जी, आझाद हिंद सेनेचे माजी सैनिक लेफ्टिनेंट आर माधवन जी, आणि माझ्या प्रिय देशवासियांनो!

दिल्लीतील लाल किल्ला येथे पराक्रम दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमाला पंतप्रधानांनी केले संबोधित

January 23rd, 06:30 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिल्लीतील लाल किल्ल्यावर पराक्रम दिनानिमित्त आयोजित सोहळ्यात सहभाग घेतला. तसेच प्रजासत्ताक दिनाचे चित्ररथ आणि सांस्कृतिक प्रदर्शनांसह देशाची समृद्ध विविधता प्रदर्शित करणाऱ्या 'भारत पर्व'चा देखील आरंभ पंतप्रधानांनी केला. नेताजींची छायाचित्रे, चित्रे, पुस्तके आणि शिल्पांचा समावेश असलेल्या राष्ट्रीय अभिलेखागाराच्या तंत्रज्ञानाच्या नेतृत्वाखालील परस्परसंवादी प्रदर्शनाची पाहणी केली. आणि राष्ट्रीय नाट्यशाळेने सादर केलेल्या नेताजींच्या जीवनावरील प्रोजेक्शन मॅपिंगसह समक्रमित नाटकाचे ते साक्षीदारही झाले. त्यांनी आझाद हिंद सेनेतील एकमेव माजी सैनिक लेफ्टनंट आर माधवन यांचा सत्कारही त्यांनी केला. स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावलेल्या थोर व्यक्तींच्या योगदानाचा यथोचित सन्मान करण्याच्या पंतप्रधानांच्या संकल्पनेनुसार, 2021 पासून नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीदिनी पराक्रम दिवस साजरा केला जातो.