पंतप्रधानांच्या व्होकल फॉर लोकल आवाहनाला आध्यात्मिक नेत्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

November 17th, 02:14 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारतासाठी ‘व्होकल फॉर लोकल’ अभियान लोकप्रिय बनवण्याबाबत काल आध्यात्मिक नेत्यांना केलेल्या आवाहनाला देशभरातील प्रमुख आध्यात्मिक नेत्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. पंतप्रधानांच्या आवाहनाला ‘संत समाजाने’ अतिशय उत्साहाने प्रतिसाद दिला. आत्मनिर्भर भारतसाठी स्थानिक उत्पादनांच्या खरेदीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि ती लोकप्रिय करण्यासाठी सार्वजनिक बांधिलकीसह आध्यात्मिक नेत्यांनी पुढाकार घेतला आहे आणि त्यासाठी त्यांनी पाठिंबा देण्याचा संकल्प केला आहे.

आत्मनिर्भर भारतासाठी ‘व्होकल फॉर लोकल’ लोकप्रिय करण्यासाठी मदत करण्याचे पंतप्रधानांचे धार्मिक नेत्यांना आवाहन

November 16th, 12:50 pm

‘भक्ती चळवळ’ ज्या पद्धतीने स्वातंत्र्यलढ्याचा पाया होती, त्यापद्धतीनेच, आज आत्मनिर्भर भारताचा आधार आपल्या देशातील संत, महात्मा, महंत आणि आचार्य यांनी पुरवावा असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. जैनाचार्य श्री विजय वल्लभ सुरीश्वर जी महाराज यांच्या 151 व्या जयंती निमित्त ‘स्टॅच्यु ऑफ पीस’ चे दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून आज अनावरण केल्या नंतर पंतप्रधान बोलत होते. याप्रसंगीच्या त्यांच्या भाषणाचे वैशिष्ट्ये म्हणजे, स्वातंत्र्यचळवळ आणि सध्याचे आत्मनिर्भर भारत सारख्या सामाजिक-राजकीय आणि आर्थिक घटनांचा पाया धार्मिक आणि अध्यात्मिक होता यावर त्यांनी दिलेला भर.

PM Modi requests spiritual leaders to promote Aatmanirbhar Bharat by going vocal for local

November 16th, 12:46 pm

PM Modi unveiled ‘Statue of Peace’ to mark the 151st birth anniversary celebrations of Jainacharya Shree Vijay Vallabh Surishwer Ji Maharaj. Reiterating his stress on ‘vocal for local’ Shri Modi requested that as happened during the freedom struggle, all the spiritual leaders should amplify the message of Aatmanirbhar Bharat.

जैनाचार्य श्री विजय वल्लभ सुरीश्वर जी महाराज यांच्या 151 व्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांच्या हस्ते ‘स्टॅच्यु ऑफ पीस’ चे अनावरण

November 16th, 12:45 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून जैनाचार्य श्री विजय वल्लभ सुरीश्वरजी महाराज यांच्या 151व्या जयंती उत्सवानिमित्त ‘स्टॅच्यू ऑफ पीस’चे अनावरण करण्यात आले. जैन आचार्यांच्या सन्मानार्थ अनावरण करण्यात आलेल्या पुतळ्याला ‘स्टॅच्यु ऑफ पीस’ असे नाव देण्यात आले आहे. 151 इंच उंचीचा पुतळा अष्टधातूपासून तयार करण्यात आला आहे, यात तांब्याचे प्रमाण जास्त आहे आणि विजय वल्लभ साधना केंद्र, जेतापूर, पाली, राजस्थान येथे उभारण्यात आला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 16 नोव्हेंबर 2020 रोजी जैनाचार्य श्री विजय वल्लभ सुरीश्वरजी महाराज यांच्या 151व्या जयंतीउत्सवा निमित्त ‘स्टॅच्यू ऑफ पीस’चे अनावरण

November 14th, 06:06 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जैनाचार्य श्री विजय वल्लभ सुरीश्वरजी महाराज यांच्या 151व्या जयंती उत्सवानिमित्त ‘स्टॅच्यू ऑफ पीस’चे अनावरण 16 नोव्हेंबर 2020 रोजी दुपारी 12.30 वाजता व्हीडियो कॉन्फरन्सिंगद्वारे होईल.