सहकार क्षेत्रातील महत्वाच्या विविध उपक्रमांचा शिलान्यास तसेच उद्घाटन कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

February 24th, 10:36 am

भारताच्या अमृत यात्रेमध्ये आज ‘भारत मंडपम्‘ विकसित आणखी एका मोठ्या कामगिरीचा साक्षीदार बनत आहे. ‘सहकार से समृद्धी’ म्हणजेच सहकारातून समृद्धीचा संकल्प देशाने केला आहे, तो साकार करण्याच्या दिशेने आज आपण आणखी पुढे जात आहोत. शेती आणि शेती व्यवसाय यांचा पाया भक्कम करण्यामध्ये सहकारी क्षेत्राच्या शक्तीची खूप मोठी भूमिका आहे. याचा विचार करून आम्ही स्वतंत्र सहकार मंत्रालयाची निर्मिती केली. आणि आता याच विचारातून आजचा हा कार्यक्रम होत आहे. आज आम्ही आपल्या शेतकरी बांधवांसाठी जगातील सर्वात मोठी धान्य साठवणूक योजना सुरू केली आहे. या अंतर्गत देशातील काना-कोप-यामध्ये हजारों कृषीमाल गोदामांची उभारणी करण्यात येणार आहे. आज 18 हजार ‘पॅक्स’ च्या संगणकीकरणाचे एक मोठे काम पूर्ण झाले आहे. या सर्व कामांमुळे देशामध्ये कृषी क्षेत्राच्या पायाभूत सुविधांचा आणखी विस्तार होणार आहे. कृषी क्षेत्राला आधुनिक तंत्रज्ञानाने जोडले जाणार आहे. तुम्हां सर्वांचे या महत्वपूर्ण आणि दूरगामी परिणाम करणा-या या कार्यक्रमांसाठी मी खूप खूप अभिनंदन करतो. तसेच अनेक -अनेक शुभेच्छा देतो.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सहकार क्षेत्रातील अनेक महत्त्वाच्या उपक्रमांचे उद्घाटन आणि पायाभरणी

February 24th, 10:35 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली येथील भारत मंडपम येथे सहकार क्षेत्रातील अनेक महत्त्वाच्या उपक्रमांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. 11 राज्यांमधल्या 11 प्राथमिक कृषी पतसंस्थांमध्ये (पीएसीएस) उभारल्या जाणाऱ्या 'सहकारी क्षेत्रातील जगातील सर्वात मोठ्या धान्य साठवणूक योजने'च्या प्रायोगिक तत्वावरील प्रकल्पाचे उद्घाटनही पंतप्रधानांच्या हस्ते झाले. या उपक्रमांतर्गत गोदामे आणि इतर कृषी पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी देशभरात अतिरिक्त 500 प्राथमिक कृषी पतसंस्थाची पायाभरणीही पंतप्रधानांनी केली. प्राथमिक कृषी पतसंस्थांच्या गोदामांना अन्न पुरवठा साखळीमध्ये विनासायास समाविष्ट करणे, अन्न सुरक्षा मजबूत करणे तसेच नाबार्डद्वारे समर्थित आणि राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाच्या (एनसीडीसी) नेतृत्वाखालील सहकार्याने देशातील आर्थिक विकासाला चालना देणे हे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे. कृषी पायाभूत सुविधा निधी (एआयएफ), कृषी विपणन पायाभूत सुविधा (एएमआय) अशा सध्या अस्तित्वात असलेल्या विविध योजनांच्या एकत्रीकरणाद्वारे हा उपक्रम राबविण्यात येत आहे. सहकार क्षेत्राला नवसंजीवनी देण्याच्या तसेच छोट्या आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांचे सक्षमीकरण करण्याच्या उद्देशाने सहकार से समृद्धी या सरकारच्या संकल्पनेला अनुसरून, देशभरातील 18,000 प्राथमिक कृषी पतसंस्थांचे संगणकीकरण करण्याच्या प्रकल्पाचे देखील पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन झाले.

1,514 नागरी सहकारी बँकांचे सक्षमीकरण करण्याच्या भारतीय रिझर्व बँकेच्या सूचनांचे पंतप्रधानांनी केले स्वागत

June 10th, 04:03 pm

1,514 नागरी सहकारी बँकांचे सक्षमीकरण करण्याच्या भारतीय रिझर्व बँकेच्या सूचनांचे स्वागत करताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट केले की :

देशातील सहकार चळवळ बळकट करून तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठीच्या योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता

February 15th, 03:49 pm

देशातील सहकार चळवळीला बळकटी देऊन ती तळागाळापर्यंत पोहोचण्यासाठीच्या योजनेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली आणि गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्या समर्थ मार्गदर्शनाखाली सहकार मंत्रालयाने मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्रालयाच्या विविध योजनांच्या एकत्रीकरणाच्या माध्यमातून ‘संपूर्ण-सरकार’ दृष्टिकोनाचा लाभ घेत, प्राथमिक कृषी पतसंस्था (PACS) नसलेल्या प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये व्यवहार्य प्राथमिक कृषी पतसंस्था, दुग्ध सहकारी संस्था नसलेल्या प्रत्येक ग्रामपंचायत/गावात व्यवहार्य दुग्ध सहकारी संस्था आणि प्रत्येक समुद्रकिनाऱ्यांलगतच्या पंचायत/गावात व्यवहार्य मत्स्यपालन सहकारी संस्था स्थापन करण्यासाठी तसेच मोठे जलस्रोत असलेल्या ग्रामपंचायत/गावात आणि विद्यमान प्राथमिक कृषी पतसंस्था/दुग्धव्यवसाय/मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थांना बळकट करण्यासाठी योजना तयार केली आहे. सुरुवातीला, पुढील पाच वर्षांत 2 लाख प्राथमिक कृषी पतसंस्था / दुग्धव्यवसाय/ मत्स्यपालन सहकारी संस्था स्थापन केल्या जातील. या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी नाबार्ड, राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळ (एनडीडीबी) आणि राष्ट्रीय मत्स्य विकास मंडळ (एनएफडीबी) च्या माध्यमातून कृती आराखडा तयार केला जाईल.