बर्मिंगहॅम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये सहभागी झालेल्या भारतीय खेळाडूंशी पंतप्रधानांनी साधलेला संवाद

August 13th, 11:31 am

सर्वांशी बोलणं माझ्यासाठी अत्यंत प्रेरणादायक असतं, मात्र सर्वांशी बोलणं शक्य नसतं. तरी वेगवेगळ्या वेळी आपल्यापैकी अनेक जणांशी कोणत्या ना कोणत्या स्वरुपात संपर्कात राहण्याची मला संधी मिळाली आहे, बोलण्याची संधी मिळाली आहे, पण माझ्यासाठी ही आनंदाची गोष्ट आहे, की वेळात वेळ काढून तुम्ही माझ्या निवासस्थानी आलात आणि परिवाराच्या सदस्याच्या रुपात आले आहात. तर, तुमच्या यशाचा जसा प्रत्येक हिंदुस्तानी नागरिकाला अभिमान आहे, तसाच मला देखील तुमच्याशी जोडले जाण्याचा अभिमान आहे. तुम्हां सर्वांचं माझ्याकडे खूप-खूप स्वागत आहे.

राष्ट्रकुल स्पर्धा 2022 च्या भारतीय पथकाचा पंतप्रधानांनी केला सत्कार

August 13th, 11:30 am

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा(CWG) 2022 मध्ये सहभागी झालेल्या भारतीय पथकाचा आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या सत्कार सोहळ्यामध्ये क्रीडापटू आणि त्यांचे प्रशिक्षक सहभागी झाले होते. केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा आणि माहिती आणि प्रसारणमंत्री अनुरागसिंह ठाकूर आणि युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री निशिथ प्रामाणिक या सोहळ्याला उपस्थित होते.

राष्ट्रकुल स्पर्धा 2022 मध्ये कांस्य पदक जिंकल्याबद्दल पंतप्रधानांनी श्रीकांत किदांबीचे केले अभिनंदन

August 08th, 08:25 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रीकांत किदांबीचे राष्ट्रकुल स्पर्धा 2022 मध्ये कांस्य पदक जिंकल्याबद्दल अभिनंदन केले आहे. श्रीकांत किदांबीच्या राष्ट्रकुल स्पर्धेतील चौथ्या पदकाबद्दलही पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला.

जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन 2021 स्पर्धेतल्या रौप्यपदक विजेत्या किदंम्बी श्रीकांतचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन

December 20th, 02:17 pm

जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन 2021 स्पर्धेत रौप्यपदक पटकवल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी किदंम्बी श्रीकांतचे अभिनंदन केले आहे.

बॅडमिंटनपटू किदांबि श्रीकांतचे पंतप्रधानांतर्फे अभिनंदन

June 25th, 07:57 pm

भारतीय बॅडमिंटनपटू किंदाबि श्रीकांतच्या ऑस्ट्रेलियन खुल्या सुपर मालिका स्पर्धेतील विजयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याचे अभिनंदन केले.“ ऑस्ट्रेलियन खुल्या सुपर सिरिज स्पर्धेतील किदांबि श्रीकांत याच्या विजयाचा आम्हाला अभिमान आहे. मी त्याचे आणखी एका विजयाबद्दल अभिनंदन करतो” असे पंतप्रधान म्हणाले .

1975 मध्ये लावण्यात आलेली आणिबाणी लोकशाहीतील सर्वात काळोखी रात्र होती: मन की बात कार्यक्रमांत पंतप्रधान मोदी

June 25th, 12:21 pm

जून 1975 मध्ये लादण्यात आलेली आणिबाणी हा भारतीय लोकशाहीच्या इतिहासातला सर्वात वाईट काळ होता असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात कार्यक्रमात सांगितलं. त्यावेळी लोकांचे अधिकार कसे काढून घेण्यात आले आणि हजारो लोकांना कसे तुरुंगात डांबण्यात आले हे त्यांनी विस्तारपूर्वक सांगितले. ते स्वच्छता, नुकताच झालेला आंतरराष्ट्रीय योग दिन, अंतराळ विज्ञान आणि खेळाच्या क्षेत्रात स्थायित्व याबद्दल देखील ते बोलले