पंतप्रधानांनी स्क्वॉशचे दिग्गज खेळाडू राज मनचंदा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला
December 04th, 03:42 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज मनचंदा यांच्या निधनाबद्दल आज शोक व्यक्त केला. भारतीय स्क्वॉश च्या क्षेत्रातील एक असामान्य खेळाडू असलेल्या मनचंदा यांच्या खेळातील प्राविण्य तसेच समर्पण भावनेचा त्यांनी आदराने उल्लेख केला. मनचंदा यांनी सैन्यदलात देशाप्रति बजावलेल्या कर्तव्याचीही त्यांनी प्रशंसा केली.लॉस एंजेलिस ऑलिम्पिक 2028 मध्ये क्रिकेटच्या समावेशाचे पंतप्रधानांनी केले स्वागत
October 16th, 08:18 pm
लॉस एंजलिस ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा 2028 मध्ये बेसबॉल-सॉफ्टबॉल, क्रिकेट, फ्लॅग फुटबॉल, लॅक्रोस आणि स्क्वॅश या खेळांचा समावेश केल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वागत केले आहे. ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश या अद्भुत खेळाची वाढती जागतिक लोकप्रियता दर्शवतो, असे ते म्हणाले.