आशियाई क्रीडास्पर्धा 2022 मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूंसोबतच्या संवादातील पंतप्रधानांच्या संबोधनाचा मजकूर
November 01st, 07:00 pm
तुम्हा सर्वांना भेटण्याच्या संधीचा मी शोध घेत असतो आणि वाट बघत असतो, कधी एकदा तुम्हाला भेटेन, तुमचे अनुभव कधी ऐकू शकेन आणि मी पाहिले आहे की प्रत्येक वेळी तुम्ही नव्या उमेदीने, नव्या उत्साहाने समोर येता आणि ही देखील एक मोठी प्रेरणा ठरते. त्यामुळे सर्वप्रथम मी तुम्हा सर्वांमध्ये फक्त एकाच कामासाठी आलो आहे आणि ते म्हणजे तुम्हा सर्वांचे अभिनंदन. तुम्ही भारताबाहेर होता, चीनमध्ये खेळत होता, पण कदाचित तुम्हाला माहीती नसेल, मी ही तुमच्यासोबत होतो. तुमच्या प्रत्येक हालचालीचा, तुमच्या प्रयत्नांचा, तु मच्या आत्मविश्वासाचा प्रत्येक क्षण मी इथे बसून जगत होतो. तुम्ही सर्वांनी ज्या प्रकारे देशाची प्रतिष्ठा उंचावली आहे ते खरोखरच अभूतपूर्व आहे. आणि त्यासाठी आम्ही तुमचे, तुमच्या प्रशिक्षकांचे आणि तुमच्या कुटुंबातील सदस्यांचे अभिनंदन करावे तितके थोडे आहे. आणि या ऐतिहासिक यशाबद्दल देशवासियांच्या वतीने मी तुम्हा सर्वांचे खूप खूप अभिनंदन करतो, अनेकानेक शुभेच्छा देतो.आशियाई पॅरा गेम्स 2022 मध्ये सहभागी झालेल्या भारतीय खेळाडूंच्या तुकडीला पंतप्रधानांनी केले संबोधित
November 01st, 04:55 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली येथील मेजर ध्यानचंद राष्ट्रीय क्रीडा संकुलामध्ये आशियाई पॅरा गेम्स, अर्थात दिव्यांगांसाठी आयोजित आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी झालेल्या भारतीय खेळाडूंच्या चमूशी संवाद साधला आणि त्यांना संबोधित केले. आशियाई पॅरा गेम्स 2022 मध्ये दिमाखदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचे अभिनंदन करण्यासाठी आणि त्यांना भविष्यातील स्पर्धांसाठी प्रेरणा देण्यासाठी पंतप्रधानांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता.आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीच्या मुंबईत झालेल्या 141व्या सत्राच्या उद्घाटन कार्यक्रमात पंतप्रधानांनी केलेले भाषण
October 14th, 10:34 pm
140 कोटी भारतीयांच्या वतीने मी तुम्हा सर्वांचे या विशेष आयोजनात स्वागत करतो, अभिनंदन करतो. आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक असोसिएशनच्या या 141 व्या सत्राचे भारतात आयोजन होणे अतिशय विशेष आहे. 40 वर्षांनंतर भारतामध्ये आयओसीचे हे सत्र आयोजित होणे आमच्यासाठी अतिशय सन्मानाची बाब आहे.पंतप्रधानांनी 141 व्या आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीच्या सत्राचे मुंबईत केले उद्घाटन
October 14th, 06:35 pm
भारतीय संस्कृती आणि जीवनशैलीचा खेळ हा एक महत्त्वाचा भाग असल्यावर पंतप्रधानांनी भर दिला. ज्यावेळी तुम्ही भारतातील गावांमध्ये जाता त्यावेळी तुम्हाला खेळाशिवाय कोणताही सण हा अपूर्ण असल्याचे दिसेल असे पंतप्रधानांनी सांगितले. भारतीय केवळ क्रीडाप्रेमीच नाहीत पण आम्ही खेळ जगत असतो असे मोदी म्हणाले. यावेळी त्यांनी भारताच्या हजारो वर्षांच्या इतिहासामध्ये प्रतिबिंबित होत असलेली क्रीडा संस्कृती अधोरेखित केली मग ती सिंधू संस्कृती असेल वेदिक कालखंड असेल किंवा त्यानंतरचा कालखंड असेल भारताचा क्रीडा वारसा हा अतिशय समृद्ध राहिला आहे असे पंतप्रधानांनी अधोरेखित केले.अमेठी खासदार क्रीडा स्पर्धा 2023 च्या समारोप समारंभात पंतप्रधानांच्या व्हिडिओ संदेशाचा मूळ मजकूर
October 13th, 01:00 pm
अमेठी येथील माझ्या प्रिय कुटुंबियांनो, तुम्हा सर्वांना माझा नमस्कार. अमेठी खासदार क्रीडा स्पर्धेच्या समारोप सत्रात तुमच्यासोबत असणे आणि या सत्रात सहभागी होणे, हे माझ्यासाठी खूपच विशेष आहे. देशात खेळांच्या दृष्टीने हा महिना अतिशय शुभ आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत आपल्या खेळाडूंनी पदकांचे शतक ओलांडले आहे. या स्पर्धा सुरू असतानाच अमेठीतील खेळाडूंनीही क्रीडा क्षेत्रात आपले कौशल्य दाखवले आहे. खासदार क्रीडा स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व खेळाडूंचे मी अभिनंदन करतो. या स्पर्धेतून मिळालेली नवी ऊर्जा आणि आत्मविश्वास तुम्हालाही नक्कीच जाणवत असेल, या संपूर्ण प्रदेशातील लोकांना ते जाणवत असेल आणि केवळ ऐकूनच मलाही ते जाणवू लागते. हा उत्साह आणि आत्मविश्वास आपल्याला कायम राखायचा आहे, तो वाढवायचा आहे, त्याची जोपासना करायची आहे, खत-पाणी द्यायचे आहे. गेल्या 25 दिवसात तुम्हाला मिळालेला अनुभव हा तुमच्या क्रीडा कारकीर्दीसाठी एक उत्तम पायाभरणी ठरणारा आहे. या मोहिमेत शिक्षक, निरीक्षक, शाळा आणि महाविद्यालयाच्या प्रतिनिधींच्या भूमिकेत सहभागी होऊन या युवा खेळाडूंना पाठिंबा देणाऱ्या आणि प्रोत्साहन देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे मी अभिनंदन करतो. एक लाखापेक्षा जास्त खेळाडूंचे एकत्र येणे, ते सुद्धा इतक्या छोट्या भागात, ही निश्चितच मोठी गोष्ट आहे. अमेठीच्या खासदार भगिनी स्मृती इराणी जी यांचे मी विशेष अभिनंदन करतो, ज्यांनी हा कार्यक्रम यशस्वी केला.अमेठी खासदार क्रीडा स्पर्धा 2023 च्या सांगता समारंभाला पंतप्रधानांनी केले संबोधित
October 13th, 12:40 pm
अमेठी खासदार क्रीडा स्पर्धा 2023 मध्ये सहभागी खेळाडूंशी जोडले जाणे, हे विशेष आनंदाचे असल्याच्या भावना पंतप्रधानांनी कार्यक्रमाला संबोधित करताना व्यक्त केल्या. भारतीय खेळाडूंनी आशियाई स्पर्धेत पदकांचे शतक झळकावले आहेच, हा महिना देशातील खेळांसाठी शुभ ठरला आहे, असे ते म्हणाले. अमेठीच्या अनेक खेळाडूंनी अमेठी खासदार क्रीडा स्पर्धेमध्ये भाग घेऊन यात आपली क्रीडा प्रतिभा जगासमोर आणली असल्याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधले. या स्पर्धेतून खेळाडूंना मिळालेली नवी ऊर्जा आणि आत्मविश्वास जाणवत असून आता सर्वोत्तम फलनिष्पत्तीसाठी या उत्साहाची जोपासना, संवर्धन करण्याची गरज असल्याचे, ते म्हणाले. गेल्या 25 दिवसात तुम्ही घेतलेला अनुभव तुमच्या क्रीडा कारकिर्दीसाठी अत्यंत बहुमोल ठरेल, असे पंतप्रधान म्हणाले. शिक्षक, प्रशिक्षक, शाळा किंवा महाविद्यालयाचा प्रतिनिधी अशा विविध भूमिकेत या महाभियानात सहभागी होऊन युवा खेळाडूंना पाठिंबा आणि प्रोत्साहन देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे अभिनंदन पंतप्रधानांनी केले. एक लाखाहून अधिक खेळाडूंचा मेळावा ही एक मोठी बाब असल्याचे अधोरेखित करत त्यांनी या स्पर्धेचे यशस्वी आयोजन करणाऱ्यांचे आणि विशेषत: अमेठीच्या खासदार स्मृती इराणी यांचे अभिनंदन केले.वाराणसी इथे आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमच्या पायाभरणी समारंभात पंतप्रधानांनी केलेले भाषण
September 23rd, 02:11 pm
आज पुन्हा वाराणसीला येण्याची संधी मिळाली. वाराणसीमध्ये येऊन झालेला आनंद शब्दात मांडणे अशक्य आहे. पुन्हा एकदा म्हणा...ॐ नमः पार्वती पतये, हर-हर महादेव! आज मी अशा दिवशी काशीमध्ये आलो आहे जेव्हा चंद्राच्या ‘शिवशक्ती’ या स्थानावर भारत पोहोचलेल्याला एक महिना पूर्ण होत आहे. ‘शिवशक्ती’ म्हणजे गेल्या महिन्याच्या 23 तारखेला आपले चांद्रयान जिथे उतरले ते स्थान आहे. शिवशक्तीचे एक स्थान चंद्रावर आहे. तर शिवशक्तीचे दुसरे स्थान माझ्या या काशीत आहे. आज शिवशक्तीच्या या स्थानावरून, शिवशक्तीच्या त्या स्थानावरील भारताच्या विजयासाठी मी पुन्हा एकदा तुमचे अभिनंदन करतो.पंतप्रधानांनी उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमची केली पायाभरणी
September 23rd, 02:10 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वाराणसी येथे आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमची पायाभरणी केली. वाराणसीतील गंजरी, रजतलाब येथे सुमारे 450 कोटी रुपये खर्चून हे आधुनिक आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम विकसित केले जाईल आणि त्याचे क्षेत्रफळ 30 एकरपेक्षा जास्त असेल.तिसऱ्या खेलो इंडिया विद्यापीठ स्तरीय स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
May 25th, 10:16 pm
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री श्रीमान योगी आदित्यनाथ जी, केंद्रीय क्रीडा मंत्री श्री अनुराग ठाकुर जी, मंत्रिमंडळातील माझे सहकारी निशीथ प्रामाणिकजी, उत्तरप्रदेशचे उपमुख्यमंत्री ब्रिजेश पाठकजी, इतर उपस्थित मान्यवर आणि ‘खेलो इंडिया विद्यापीठ स्तरीय स्पर्धांमधे सहभागी झालेले सर्व खेळाडू, आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन !. आज उत्तरप्रदेश, देशभरातील युवा प्रतिभेचा संगम ठरला आहे. खेलो इंडिया विद्यापीठ स्पर्धेत सहभागी होण्यासाठी जे चार हजार खेळाडू इथे आले आहेत, त्यांच्यापैकी बहुतांश, वेगवेगळ्या राज्यांमधील आहेत. वेगवेगळ्या प्रदेशातील आहेत. मी उत्तरप्रदेशाचा खासदार आहे, उत्तरप्रदेशचा लोकप्रतिनिधी आहे. म्हणूनच, उत्तरप्रदेशचा खासदार म्हणून, ‘खेलो इंडिया विद्यापीठ स्पर्धे’ साठी आलेल्या आणि येणार असलेल्या सर्व खेळाडूंचे मी विशेष स्वागत करतो.पंतप्रधानांनी तिसरी खेलो इंडिया विद्यापीठ क्रीडा स्पर्धा सुरु झाल्याची केली घोषणा
May 25th, 07:06 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून खेलो इंडिया विद्यापीठ क्रीडा स्पर्धा 2023 सुरु झाल्याची घोषणा केली. या स्पर्धेत 21 क्रीडा प्रकारांमध्ये 200 हून अधिक विद्यापीठांमधील 4750 हून अधिक खेळाडूंचा सहभाग असेल.मणीपूरमध्ये इंफाळ येथे राज्ये/केंद्रशासित प्रदेशांचे युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्र्यांच्या चिंतन शिबिरामध्ये पंतप्रधानांनी केलेले भाषण
April 24th, 10:10 am
देशाच्या क्रीडामंत्र्यांची ही परिषद, हे चिंतन शिबिर मणीपूरच्या भूमीवर होत आहे याचा मला अतिशय आनंद होत आहे. ईशान्येमधून उदयाला आलेल्या कित्येक खेळाडूंनी तिरंग्याचा मान वाढवला आहे, देशासाठी पदके जिंकली आहेत. देशाची क्रीडा परंपरा पुढे नेण्यामध्ये ईशान्य भागाचे आणि मणीपूरचे महत्त्वाचे योगदान राहिले आहे. येथील सगोल कांगजई, थांग-ता, युबी लाक्पी, मुक्ना आणि हियांग तान्नबा सारखे स्वदेशी खेळ, जे स्वतःच खूपच आकर्षक आहेत. म्हणजे जेव्हा आपण मणीपूरचा ऊ-लावबी पाहतो त्यावेळी आपल्याला त्यामध्ये कबड्डीची झलक दिसते. येथील हियांग तान्नबा केरळच्या बोट रेसची आठवण करून देतो आणि पोलो या खेळाशी देखील मणीपूरचा ऐतिहासिक संबंध राहिला आहे. म्हणजेच, ज्या प्रकारे ईशान्य भाग देशाच्या सांस्कृतिक विविधतेमध्ये नवे रंग भरत असतो, त्याच प्रकारे देशाच्या क्रीडा विविधतेला देखील नवे आयाम देत आहे. देशभरातून आलेले क्रीडामंत्री मणीपूरकडून बरेच काही शिकून जातील अशी मला अपेक्षा आहे आणि मणीपूरच्या लोकांचे प्रेम, त्यांचा पाहुणचार, तुमच्या प्रवासाला आणखी आनंददायी बनवेल, अशी मला खात्री आहे. मी या चिंतन शिबिरात सहभागी होत असलेल्या सर्व क्रीडामंत्र्यांचे, इतर मान्यवरांचे स्वागत करतो, अभिनंदन करतो.मणिपूरमधल्या इम्फाळ येथे राज्ये/केंद्रशासित प्रदेशांच्या युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्र्यांच्या चिंतन शिबिराला पंतप्रधानांनी केले संबोधित
April 24th, 10:05 am
मणिपूरमधल्या इम्फाळ येथे आयोजित राज्य/केंद्रशासित प्रदेशांच्या युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्र्यांच्या ‘चिंतन शिबिराला ’ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडिओ संदेशाद्वारे मार्गदर्शन केले.उत्तर प्रदेशमध्ये बस्ती इथे दुसऱ्या ‘सांसद खेल महाकुंभ’च्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधानांनी दूरदृश्यप्रणाली द्वारे केलेले भाषण
January 18th, 04:39 pm
उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, माझे सहकारी, आपले युवा मित्र, खासदार हरीश द्विवेदी, विविध खेळांचे खेळाडू, राज्य सरकारचे मंत्रीगण, आमदार, इतर सर्व लोकप्रतिनिधी, सर्व ज्येष्ठ, सन्माननीय व्यक्ती, आणि मी बघत आहे, सगळीकडे मोठ्या संख्येने जमलेला युवा समुदाय. माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बस्ती जिल्ह्यात दूरदृश्य प्रणालीद्वारे सांसद खेल महाकुंभ 2022-23 च्या दुसऱ्या टप्प्याचे केले उद्घाटन
January 18th, 01:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीद्वारे सांसद खेल महाकुंभ 2022-23 च्या दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन केले. उत्तरप्रदेशातील बस्तीचे खासदार हरीश द्विवेदी 2021 पासून दरवर्षी बस्ती जिल्ह्यात, सांसद खेल महाकुंभचे आयोजन करतात. या खेल महाकुंभाअंतर्गत, कुस्ती, कबड्डी, खो खो, बास्केटबॉल, फुटबॉल, हॉकी, व्हॉलीबॉल, हँडबॉल, बुद्धिबळ, कॅरम, बॅडमिंटन, टेबल टेनिस अशा इनडोअर आणि आउटडोअर खेळ स्पर्धांचे आयोजन केले जाते. त्याशिवाय निबंध लेखन, चित्रकला, रंगकाम, रांगोळी अशा स्पर्धाही घेतल्या जातात.