आई श्री सोनल मातेच्या जन्मशताब्दी कार्यक्रमात पंतप्रधानांचा व्हिडिओ संदेश

January 13th, 12:00 pm

वर्तमान गादीपति- पूज्य कंचन माता व्यवस्थापक- पूज्य गिरीश आपा पौषच्या पवित्र महिन्यात आज आपण सगळे आई श्री सोनल मातेच्या जन्मशताब्दी सोहळ्याला उपस्थित आहोत. आई श्री सोनल मातेच्या आशीर्वादामुळेच मला या पवित्र सोहळ्याच्या आयोजनात सहभागी होण्याचे सौभाग्य लाभले आहे. मी संपूर्ण चारण समाजाचे, सर्व व्यवस्थापकांचे आणि सोनल मातेच्या सर्व भक्तांचे अभिनंदन करतो. मधडा धाम हे चारण समाजासाठी श्रद्धेचे केंद्र आहे , शक्तीचे केंद्र आहे , संस्कार आणि परंपरांचे केंद्र आहे. श्री सोनल मातेच्या चरणी मी विनम्र अभिवादन करतो.

पंतप्रधानांनी आई श्री सोनल माता यांच्या जन्मशताब्दी कार्यक्रमाला व्हिडिओ संदेशाद्वारे केले संबोधित

January 13th, 11:30 am

तीन दिवसीय जन्मशताब्दी सोहळ्यामध्ये आलेल्या सोनल माता यांच्या आठवणी आपल्यासमवेत आहेत असे त्यांनी नमूद केले आणि सांगितले की कोणत्याही युगामध्ये भारतात अवतारी व्यक्तिमत्त्वांची कधीही कमतरता नव्हती या वस्तुस्थितीचे भगवती स्वरुपा सोनल माँ या साक्षात उदाहरण होत्या. गुजरात आणि सौराष्ट्र ही विशेषत्वाने संत आणि महान विभूतींची भूमी आहे असे नमूद करत पंतप्रधान मोदी म्हणाले की या भागात अनेक संत आणि महान व्यक्तींनी संपूर्ण मानवतेसाठी आपल्या ज्ञानाचा प्रकाश पसरवला. पवित्र गिरनार पर्वत हा भगवान दत्तात्रय आणि अनेक संतांचे स्थान असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. पंतप्रधान म्हणाले, सौराष्ट्रच्या या शाश्वत संत परंपरेत श्री सोनल माता आधुनिक युगासाठी प्रकाशस्तंभासारख्या होत्या. त्यांची आध्यात्मिक ऊर्जा, मानवतावादी शिकवण आणि तपश्चर्येने त्यांच्या व्यक्तिमत्त्वात एक अद्भुत दैवी आकर्षण निर्माण केले जे आजही जुनागढ आणि मढडा येथील सोनल धाममध्ये अनुभवता येते.”

आंध्र प्रदेशातील पुट्टपर्थी येथील साई हिरा ग्लोबल कन्व्हेन्शन सेंटरच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण

July 04th, 11:00 am

पुट्टपर्थीला जाण्याचे भाग्य मला अनेकदा लाभले आहे. या वेळीही मी तुम्हा सर्वांमध्ये यावे, तुम्हाला भेटावे, तेथे उपस्थित राहावे आणि या कार्यक्रमाचा भाग व्हावे, अशी माझी खूप इच्छा होती. पण माझ्या व्यस्त वेळापत्रकामुळे मी उपस्थित राहू शकलो नाही.आता मला निमंत्रण देताना बंधू रत्नाकरजी म्हणाले की तुम्ही एकदा या आणि आशीर्वाद द्या. रत्नाकरजींचे म्हणणे दुरुस्त केले पाहिजे असे मला वाटते. मी तिथे नक्की येईन पण आशीर्वाद देण्यासाठी नाही, आशीर्वाद घेण्यासाठी येणार आहे.तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मी तुम्हा सर्वांमध्ये आहे. मी श्री सत्य साई सेंट्रल ट्रस्टशी संबंधित सर्व सदस्यांचे आणि आजचा हा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल सर्व सत्यसाई बाबा यांच्या भक्तांचे अभिनंदन करतो. या कार्यक्रमात श्री सत्यसाईंची प्रेरणा, त्यांचे आशीर्वाद आपल्यासोबत आहेत. मला आनंद होत आहे की या शुभ प्रसंगी श्री सत्य साईबाबांचे कार्य विस्तारत आहे.देशाला श्री हीरा ग्लोबल कन्व्हेन्शन सेंटरच्या रूपाने एक मोठा थिंक टंक प्राप्त होत आहे. मी या कन्व्हेन्शन सेंटरची छायाचित्रे पाहिली आहेत आणि तुमच्या या लघुपटात त्याची झलक देखील पाहायला मिळाली. या केंद्रात अध्यात्माची अनुभूती आहे आणि आधुनिकतेचे वैभवही आहे. त्यात सांस्कृतिक वैविध्य तसेच वैचारिक भव्यता देखील आहे.हे केंद्र आध्यात्मिक परिषद आणि शैक्षणिक कार्यक्रमांचे केंद्र बनेल. जगभरातील विविध क्षेत्रातील विद्वान आणि तज्ज्ञ येथे एकत्र येतील . मला आशा आहे की हे केंद्र तरुणांना खूप सहाय्य्यकारी ठरेल.

आंध्र प्रदेशातील पुट्टपर्थी येथील साई हिरा ग्लोबल कन्व्हेन्शन सेंटरचे पंतप्रधानांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे उद्‌घाटन

July 04th, 10:36 am

या कार्यक्रमाला संबोधित करताना, पंतप्रधानांनी या कार्यक्रमासाठी सर्वांचे अभिनंदन केले तसेच कामाच्या व्यस्ततेमुळे या कार्यक्रमाला प्रत्यक्षरित्या ते उपस्थित राहू शकले नाहीत, असे त्यांनी सांगितले. “श्री सत्य साईंचे आशीर्वाद आणि प्रेरणा आज आपल्यासोबत आहेत”, आज आपल्या कार्याचा विस्तार होत आहे असे सांगत मोदी यांनी, देशाला साई हिरा ग्लोबल कन्व्हेन्शन सेंटर या नावाने एक नवीन उत्कृष्ट कन्व्हेन्शन सेंटर मिळत आहे याबद्दल आनंद व्यक्त केला.नवीन केंद्र अध्यात्मिक अनुभव देईल आणि आधुनिकतेचे वैभव निर्माण करेल, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला. या केंद्रामध्ये सांस्कृतिक विविधता आणि वैचारिक भव्यता यांचा समावेश आहे आणि या केंद्रात विद्वान आणि तज्ञ एकत्र येऊन हे केंद्र अध्यात्म आणि शैक्षणिक कार्यक्रमांवर चर्चा करण्यासाठी केंद्रबिंदू बनेल, असे ते म्हणाले.

हरियाणातील फरिदाबाद इथे अमृता रुग्णालयाच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण

August 24th, 11:01 am

अमृता रुग्णालयाच्या रूपाने आपल्या सर्वांना आशीर्वाद देणाऱ्या माता अमृतानंदमयी जी यांना मी वंदन करतो. स्वामी अमृतास्वरूपानंद पुरी जी, हरियाणाचे राज्यपाल बंडारू दत्तात्रेय, मुख्यमंत्री मनोहर लाल जी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी, कृष्णपाल जी, हरियाणाचे उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला, इतर मान्यवर, बंधू आणि भगिनीनो,

पंतप्रधानांनी फरीदाबाद येथे केले अत्याधुनिक अमृत रूग्णालयाचे उद्घाटन

August 24th, 11:00 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज फरीदाबाद येथे अत्याधुनिक अमृत रूग्णालयाचे उद्घाटन केले. यावेळी हरियाणाचे राज्यपाल बंडारू दत्तात्रेय, राज्याचे मुख्यमंत्री मनोहर लाल, उप-मुख्यमंत्री दुष्यंत चौताला, केंद्रीय मंत्री कृष्णपाल गुर्जर, माता अमृतानंदमयी उपस्थित होते.

पंतप्रधानांच्या व्होकल फॉर लोकल आवाहनाला आध्यात्मिक नेत्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

November 17th, 02:14 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारतासाठी ‘व्होकल फॉर लोकल’ अभियान लोकप्रिय बनवण्याबाबत काल आध्यात्मिक नेत्यांना केलेल्या आवाहनाला देशभरातील प्रमुख आध्यात्मिक नेत्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. पंतप्रधानांच्या आवाहनाला ‘संत समाजाने’ अतिशय उत्साहाने प्रतिसाद दिला. आत्मनिर्भर भारतसाठी स्थानिक उत्पादनांच्या खरेदीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि ती लोकप्रिय करण्यासाठी सार्वजनिक बांधिलकीसह आध्यात्मिक नेत्यांनी पुढाकार घेतला आहे आणि त्यासाठी त्यांनी पाठिंबा देण्याचा संकल्प केला आहे.