बुद्धिबळ ऑलिम्पियाड विजेत्यांसोबत पंतप्रधानांनी साधलेल्या संवादाचा मजकूर
September 26th, 12:15 pm
सर, भारताने दोन्ही सुवर्णपदके जिंकण्याची ही पहिलीच वेळ आहे आणि संघाने ज्या प्रकारे कामगिरी केली ती खूपच चांगली होती, म्हणजे मुलांचे 22 पैकी 21 गुण आणि मुलींचे 22 पैकी 19 गुण, एकूण 44 पैकी 40 इतके गुण आम्ही मिळवले. इतकं मोठं, अद्भूत प्रात्यक्षिक यापूर्वी कधीच घडलं नव्हतं.गरिबाच्या मुलाच्या नेतृत्वाखालील या सरकारने गरिबांच्या कल्याणाला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे: पंतप्रधान मोदी कल्याणमध्ये
May 15th, 04:45 pm
पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्रातील कल्याण येथे जाहीर सभेला संबोधित केले. ते म्हणाले: मी अभिमानाने सांगू शकतो की, देशाचे हित आणि गरिबांचे कल्याण हा आजच्या राजकीय वातावरणाचा केंद्रबिंदू बनला आहे. विरोधकांच्या आघाडीवर टीका करताना ते म्हणाले की, एमव्हीएच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये दहशतवादी याकूब मेमनच्या कबरीची सजावट करण्यात आली, पण राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याचे निमंत्रण मात्र नाकारण्यात आले.मध्य प्रदेशात सागर इथे विकासात्मक प्रकल्पांच्या उद्घाटन प्रसंगी पंतप्रधानांनी केलेल्या भाषणाचा मजकूर
August 12th, 04:42 pm
कार्यक्रमात उपस्थित मध्य प्रदेशचे राज्यपाल श्रीयुत मंगुभाई पटेल, मुख्यमंत्री श्रीयुत शिवराज सिंह चौहान, केंद्रीय मंत्रीमंडळातील माझे सहकारी श्री वीरेंद्र खटीकजी, ज्योतिरादित्य सिंदियाजी, प्रल्हाद पटेलजी, मध्य प्रदेश सरकारमधील मंत्री, सर्व खासदार, वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेली सर्व पूज्यनीय संत मंडळी आणि खूप मोठ्या संख्येने जमलेल्या माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो!पश्चिम बंगाल, कोलकाता येथे G20 भ्रष्टाचार विरोधी मंत्री स्तरीय बैठकीसाठी पंतप्रधानांचा व्हिडिओ संदेश
August 12th, 10:21 am
पहिल्यावहिल्या G20 भ्रष्टाचार विरोधी मंत्रीस्तरीय बैठकीत आपणा सर्वांचे मी स्वागत करतो. तुम्ही जमला आहात ते कोलकाता येथे , नोबेल पारितोषिक प्राप्त गुरुवर्य रवींद्रनाथ टागोर यांच्या शहरात. त्यांच्या लेखनात त्यांनी आपल्याला सत्य आकलन न होऊ देणाऱ्या लोभ या स्वभावविशेषाच्या बाबतीत सावध केले होते. पुरातन भारतीय उपनिषदांमध्ये ‘मा ग्रिध’ म्हणजे लोभाचे नामोनिशाण उरू नये अशी प्रार्थना केली आहे.21st century is about fulfilling every Indian's aspirations: PM Modi in Lok Sabha
August 10th, 04:30 pm
PM Modi replied to the Motion of No Confidence in Lok Sabha. PM Modi said that it would have been better if the opposition had participated with due seriousness since the beginning of the session. He mentioned that important legislations were passed in the past few days and they should have been discussed by the opposition who gave preference to politics over these key legislations.During Congress rule, nothing was done to empower Panchayati Raj institutions: PM Modi
August 07th, 10:37 pm
Today, PM Modi addressed the Kshetriya Panchayati Raj Parishad in Haryana via video conferencing. Addressing the gathering, the PM said, “Today, the country is moving forward with full enthusiasm to fulfill the resolutions of Amrit Kaal and to build a developed India. The PM said, District Panchayats hold tremendous potential to drive significant transformations in various sectors. In this context, your role as representatives of the BJP becomes exceptionally vital.राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात पंतप्रधानांनी केलेले भाषण
August 07th, 04:16 pm
काहीच दिवसांपूर्वी 'भारत मंडपमचे' लोकार्पण झाले आहे. तुमच्यापैकी अनेकजण पूर्वीही इथे यायचे आणि तंबूत आपले जग उभारायचे. आता आज तुम्ही इथला बदललेला देश पाहिला असेल आणि आज आपण या 'भारत मंडपम'मध्ये राष्ट्रीय हातमाग दिवस साजरा करत आहोत. 'भारत मंडपम'च्या या भव्यतेमध्येही भारतातील हातमाग उद्योगाची महत्त्वाची भूमिका आहे. प्राचीन आणि नव्याचा हा संगम आजचा भारत काय आहे ते सांगतो. आजचा भारत केवळ स्थानिक वस्तूंचा आग्रह धरत नाही तर त्या जगभरात पोहोचाव्या यासाठी जागतिक मंचही पुरवत आहे. काही वेळापूर्वी मला आमच्या काही विणकर मित्रांशी संवाद साधण्याची संधी मिळाली. देशभरातील अनेक हॅण्डलूम क्लस्टर्समध्ये आमचे विणकर बंधू-भगिनी आमच्याशी जोडले जाण्यासाठी दूरदूरवरून आले आहेत. या भव्य सोहळ्यासाठी मी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करतो, मी तुमचे अभिनंदन करतो.गांधीनगर इथे महिला सक्षमीकरण विषयक जी-20 मंत्रिस्तरीय बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून दिलेला संदेश
August 02nd, 10:41 am
मी आपल्या सर्वांचे गांधीनगरमध्ये स्वागत करतो. या शहराचे नाव महात्मा गांधी यांच्या नावावर ठेवले गेले आहे आणि आज त्याचा स्थापना दिवस देखील आहे. मला अत्यंत आनंद आहे की आपल्याला अहमदाबादमध्ये गांधी आश्रमाचा दौरा करण्याची संधी मिळाली आहे. आज संपूर्ण जग, हवामान बदल, जागतिक तापमानवाढ अशा समस्यांवर दीर्घकालीन उपाययोजना शोधण्याच्या प्रासंगिकतेविषयी चर्चा करत आहे. गांधी आश्रमात आपण गांधीजी यांच्या जीवनशैलीतील साधेपणा आणि स्थैर्य, आत्मनिर्भरता आणि समानता अशा सर्व बाबतीतल्या त्यांच्या द्रष्टया विचारांचे साक्षीदार बनणार आहेत. मला विश्वास आहे, की आपल्याला हे प्रेरणादायक ठरेल. दांडी कुटीर संग्रहालयात देखील आपल्याला असाच अनुभव मिळेल. ही संधी आपण आजिबात सोडता कामा नये. इथे एका गोष्टीचा उल्लेख करणे औचित्यपूर्ण ठरेल की, गांधीजींचा प्रसिद्ध चरखा, गंगाबेन नावाच्या एका महिलेकडे गावात मिळाला होता. आपल्याला माहितीच आहे, की त्यानंतर गांधीजी नेहमीच खादीचेच वस्त्र वापरत असत. ही खादी आत्मनिर्भरता आणि स्थैर्य यांचे प्रतीक बनली होती.महाराष्ट्रातील पुणे येथे विविध प्रकल्पांच्या पायाभरणी आणि उद्घाटनावेळी पंतप्रधानांनी केलेले भाषण
August 01st, 02:00 pm
खरंच, भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत पुण्याचे मोठे योगदान आहे. पुण्याने बाळ गंगाधर टिळक यांच्यासह अनेक क्रांतिकारक, स्वातंत्र्यसैनिक देशाला दिले आहेत. आजच लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जयंती सुद्धा आहे. आपल्या सर्वांसाठी हा दिवस खूपच खास आहे. अण्णा भाऊ साठे महान समाज सुधारक होते. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी ते भारलेले होते. आजही मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि अभ्यासक त्यांच्या साहित्यावर संशोधन करतात. अण्णाभाऊ साठे यांचे कार्य, त्यांचे आदर्श आजही आपल्या सर्वांसाठी प्रेरणास्रोत आहेत.लोकमान्य टिळक पुरस्कार सोहळा 2023 पुणे येथील पंतप्रधानांचे संबोधन
August 01st, 12:00 pm
आजचा दिवस माझ्यासाठी महत्वाचा आहे. इथे येऊन मी जितका उत्साहित आहे तितकाच भावूकही आहे.आज आपणा सर्वांचे आदर्श आणि भारताचा गौरव असलेले बाळ गंगाधर टिळक यांची आज पुण्यतिथी आहे. त्याच बरोबर अण्णाभाऊ साठे जी यांची जयंतीही आहे.लोकमान्य टिळक जी आपल्या स्वातंत्र्य इतिहासाच्या ललाटाचे टिळा आहेत.त्याच बरोबर अण्णाभाऊ यांनी समाज सुधारणेसाठी जे योगदान दिले आहे ते असामान्य आहे.या दोन्ही महापुरुषांच्या चरणी मी श्रद्धापूर्वक नमन करतो.अंमली पदार्थांच्या सेवनाविरुद्धच्या मोहिमेतील तरुणांचा वाढता सहभाग अतिशय उत्साहवर्धक: पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये
July 30th, 11:30 am
माझ्या प्रिय देशवासियांनो, ‘मन की बात’मध्ये तुम्हां सर्वांचे खूप खूप स्वागत.जुलै महिना म्हणचे मान्सूनचा महिना, पावसाचा महिना. नैसर्गिक आपत्तींमुळे गेले काही दिवस चिंता आणि त्रासाने भरलेले होते.यमुनेसहअनेक नद्यांना आलेल्या पुरामुळे बऱ्याच भागांमधल्या लोकांना त्रास झाला. डोंगराळ भागात भूस्खलन होण्याच्या घटना देखील घडल्या. याच दरम्यान, काही काळापूर्वी देशाच्या पश्चिम भागात, पूर्व गुजरातच्या काही क्षेत्रामध्ये बिपरजॉय चक्रीवादळ देखील आले. पण मित्रांनो, या संकटांच्या काळात पुन्हा एकदा आपण सर्व देशवासीयांनी दाखवून दिले की, सामुहिक प्रयत्नांमध्ये किती शक्ती असते. स्थानिक लोकांनी, आपल्या एनडीआरएफच्या जवानांनी, स्थानिक प्रशासनात कार्यरत लोकांनी रात्रंदिवस झगडून अशा संकटांचा सामना केला आहे. कोणत्याही संकटातून बाहेत पडण्यासाठी आपले सामर्थ्य आणि साधनसंपत्ती यांची भूमिका फार मोठी असते – मात्र त्याबरोबरच आपली संवेदनशीलता आणि एकमेकांचा हात धरुन ठेवण्याची भावना देखील तितकीच महत्त्वाची असते. ‘सर्वजन हिताय’ ची हीच भावना भारताची ओळख देखील आहे आणि भारताची शक्ती देखील आहे.पंतप्रधानांनी नवी दिल्लीत प्रगती मैदानात भारत मंडपम येथे अखिल भारतीय शिक्षण समागम कार्यक्रमात केलेले भाषण
July 29th, 11:30 am
शिक्षण ही अशी गोष्ट आहे ज्यामध्ये देशाला सफल करण्याची, देशाचे भाग्य बदलण्याची, ज्यामध्ये सर्वाधिक ताकद आहे ते म्हणजे शिक्षणच. एकविसाव्या शतकातील भारत, जी उद्दिष्टे घेऊन पुढे जात आहे त्यात आपल्या शिक्षण व्यवस्थेचं महत्त्व खूप आहे. आपण सर्व या व्यवस्थेचे प्रतिनिधी आहात, ध्वजवाहक आहात. म्हणूनच ‘अखिल भारतीय शिक्षण समागम’ चा भाग व्हायला मिळाले हा माझ्यासाठीसुद्धा महत्त्वाचा क्षण आहे.गुजरातमधील गांधीनगर येथील सेमीकॉन इंडिया परिषद 2023 मधील पंतप्रधानांच्या भाषणाचा मजकूर.
July 28th, 10:31 am
या परिषदेत मला अनेक दीर्घ परिचित चेहरे दिसत आहेत. काही लोक असेही आहेत ज्यांना मी आज प्रथमच भेटत आहे. ज्याप्रमाणे वेळोवळी सॉफ्टवेअर अपडेट करणे आवश्यक असते, तसाच हा कार्यक्रम आहे. सेमीकॉन इंडिया च्या माध्यमातून उद्योगांबरोबरच तज्ञ आणि धोरणकर्त्यांबरोबरचे माझे संबंध नेहमी अपडेट होत राहतात. आणि मला वाटते की आपल्या संबंधांचे तादात्मीकरण करण्यासाठी हे अत्यंत आवश्यक आहे. सेमीकॉन इंडिया मध्ये देश विदेशातल्या अनेक कंपन्या आल्या आहेत, आपले स्टार्टप्स देखील आले आहेत. मी आपणा सर्वांचे सेमीकॉन इंडिया मध्ये मनःपूर्वक स्वागत करतो. मी आत्ताच हे प्रदर्शन पाहिले. या क्षेत्रात किती प्रगती झाली आहे, कशाप्रकारे नव्या ऊर्जेसह नवे लोक, नव्या कंपन्या, नवी उत्पादने. मला खूपच थोडा वेळ मिळाला, पण माझा अनुभव खूपच भारावून टाकणार होता. मी सगळ्यांना आग्रह करू इच्छितो, गुजरातच्या युवा पिढीला विशेष आवाहन करतो की, हे प्रदर्शन आणखीन काही दिवस चालणार आहे, तेव्हा अवश्य या, जगामध्ये या नव्या तंत्रज्ञानाने काय ताकद निर्माण केली आहे ते चांगल्या प्रकारे समजून उमजून घ्या.पंतप्रधानांचे जी20 पर्यावरण आणि हवामान शाश्वतता मंत्रीस्तरीय बैठकीतील भाषण
July 28th, 09:01 am
मी सुमारे दोन हजार वर्षांपूर्वी लिहिलेल्या थिरुकुरलचा संदर्भ देऊन सुरुवात करतो. महान संत थिरुवल्लुवर म्हणतात, नेडुंकडलुम तन्नीर मै कुंडृम तडिन्तेडिली तान नल्गा तागि विडिन” याचा अर्थ, जर ढगाने सागराकडून घेतलेले पाणी पावसाच्या रूपाने परत दिले नाही तर महासागरही सुकून जातील.” भारतात, निसर्ग आणि त्याचे मार्ग हे शिकण्याचे नियमित स्त्रोत आहेत. हे अनेक धर्मग्रंथांमध्ये तसेच मौखिक परंपरांमध्ये आढळतात. आपण शिकलो आहोत, पिबन्ति नद्य: स्वयमेव नाम्भ:, स्वयं न खादन्ति फलानि वृक्षा:। नादन्ति सस्यं खलु वारिवाहा:, परोपकाराय सतां विभूतय:।।पंतप्रधानांनी राजकोट, गुजरात येथे विविध विकासात्मक कामांच्या उद्घाटना वेळी केलेल्या भाषणाचा मजकूर
July 27th, 04:00 pm
सर्वजण कसे आहात? मजेत ना? गुजरातचे मुख्यमंत्री श्रीमान भूपेंद्र भाई पटेल, मंत्रिमंडळातले माझे सहकारी श्री ज्योतिरार्दित्य सिंदियाजी, गुजरातचे माजी मुख्यमंत्री भाई विजय रुपाणीजी, सी आर पाटील जी !पंतप्रधानांनी सिकर, राजस्थान येथे विविध प्रकल्पांच्या उद्घाटन/पायाभरणी प्रसंगी केलेले भाषण
July 27th, 12:00 pm
राजस्थानचे राज्यपाल श्रीमान कलराज मिश्र जी, केंद्रीय मंत्री श्री नरेंद्र सिंहजी तोमर, अन्य सर्व मंत्री, संसदेतील माझे सहकारी, आमदार आणि अन्य सर्व मान्यवर, तसेच आज या कार्यक्रमात देशातील लाखो ठिकाणांहून कोट्यवधी शेतकरी आपल्या सोबत जोडले गेले आहेत. मी राजस्थानच्या भूमीतून देशातील त्या कोट्यवधी शेतकऱ्यांनाही नमन करतो. राजस्थानातील माझे प्रिय बंधू-भगीनीही आज या महत्वपूर्ण कार्यक्रमाची शोभा वाढवत आहेत.नवी दिल्लीतील प्रगती मैदानावर आंतरराष्ट्रीय प्रदर्शन आणि संमेलन केंद्र (आयईसीसी) संकुलाच्या उद्घाटन प्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण
July 26th, 11:28 pm
माझ्या समोर एक अद्भुत दृश्य आहे. ते भव्य आहे, विराट आहे आणि विहंगम आहे. आणि आजचा हा जो प्रसंग आहे, त्यामागे जी कल्पना आहे आणि आपल्या डोळ्यांसमोर ते स्वप्न साकार होत असलेले पाहताना मला एका प्रसिद्ध कवितेतील ओळी गुणगुणाव्याशा वाटत आहेत :जी20 ऊर्जा मंत्र्यांच्या बैठकीदरम्यान पंतप्रधानांनी दृक् श्राव्य माध्यमातून दिलेला संदेश
July 22nd, 10:00 am
आपली भिन्न वास्तविकता लक्षात घेता, आपले ऊर्जा संक्रमणाचे मार्ग भिन्न आहेत. मात्र, आमची उद्दिष्टे एकच आहेत यावर माझा ठाम विश्वास आहे. हरित वाढ आणि ऊर्जा संक्रमणासाठी भारत खूप प्रयत्न करत आहे. भारत हे सर्वाधिक लोकसंख्येचे राष्ट्र आणि जगातील सर्वात वेगाने वाढणारी मोठी अर्थव्यवस्था आहे. तरीही, आम्ही आमच्या हवामान बदल विषयक वचनबद्धतेवर जोरकसपणे पुढे जात आहोत. भारताने हवामान बदला संदर्भात नेतृत्वाची भूमिका घेतली आहे. आम्ही आमचे गैर-जीवाश्म विद्युत क्षमता लक्ष्य नऊ वर्षे अगोदरच गाठले आहे. आम्ही आता उच्च लक्ष्य निश्चित केले आहे. 2030 पर्यंत 50 टक्के गैर-जीवाश्म क्षमता गाठण्याची आमची योजना आहे. सौर आणि पवन उर्जा क्षेत्रात भारत जगात नेतृत्व करत आहे. मला आनंद आहे की कार्यगटाच्या प्रतिनिधींनी पावागड सोलर पार्क आणि मोढेरा सोलर व्हिलेजला भेट दिली. त्यांनी स्वच्छ ऊर्जेसाठीची भारताची वचनबद्धता आणि प्रमाण पाहिले आहे.श्रीलंकेच्या राष्ट्रपतींच्या भारत भेटीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माध्यमांना दिलेले निवेदन
July 21st, 12:13 pm
राष्ट्रपती विक्रमसिंघे आणि त्यांच्यासोबत आलेल्या प्रतिनिधीमंडळातील सदस्यांचे मी भारतात हार्दिक स्वागत करतो. राष्ट्रपती विक्रमसिंघे त्यांचा एक वर्षांचा कार्यकाळ आज पूर्ण करत आहेत. यानिमित्ताने मी त्यांना आपणा सर्वांकडून हार्दिक शुभेच्छा देतो. मागील वर्ष, श्रीलंकेतील लोकांसाठी अत्यंत आव्हानात्मक होते.एक जवळचा मित्र या नात्याने, नेहमीप्रमाणेच, आम्ही या संकटकाळात सुद्धा श्रीलंकेतील लोकांच्या खांद्याला खांदा भिडवून उभे राहिलो. आणि श्रीलंकेच्या जनतेने ज्या साहसाने या आव्हानात्मक परिस्थितीचा सामना केला त्यासाठी मी त्यांचे मनापासून अभिनंदन करतो.संसदेच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेले निवेदन
July 20th, 10:30 am
संसदेची जी जबाबदारी आणि संसदेमध्ये प्रत्येक खासदाराची जी जबाबदारी आहे, अशा अनेक कायद्यांना तयार करणे, त्यांची सविस्तर चर्चा करणे अतिशय गरजेचे आहे. आणि जितकी जास्त चर्चा होते, चर्चा जितकी जास्त सखोल होते तितकेच लोकहितासाठी दूरगामी परिणाम देणारे चांगले निर्णय होतात. संसदेत जे माननीय खासदार येताते ते तळागाळाशी जोडलेले असतात, जनतेची दुःखे, वेदना यांची त्यांना जाणीव असते आणि म्हणूनच जेव्हा चर्चा होते तेव्हा त्यांच्याकडून जे विचार येतात, ते मूळाशी जोडलेले विचार असतात आणि त्यामुळेच चर्चा तर समृद्ध होतेच, निर्णय देखील सशक्त होतात, परिणामकारक होतात. आणि म्हणूनच मी सर्व राजकीय पक्षांना, सर्व माननीय खासदारांना या अधिवेशनाचा भरपूर उपयोग करून जनहिताच्या कामांना आपण पुढे नेऊया, असे आवाहन करतो.