PM Modi's candid interaction with Rashtriya Bal Puraskar winners
December 26th, 09:55 pm
PM Modi interacted with the 17 awardees of Rashtriya Bal Puraskar in New Delhi. During the candid interaction, the PM heard the life stories of the children and encouraged them to strive harder in their lives. He congratulated all the youngsters and wished them the very best for their future endeavours.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय बाल पुरस्कार विजेत्यांशी साधला संवाद
December 26th, 09:54 pm
पंतप्रधानांनी या मुलाच्या जगण्याविषयी जाणून घेतले आणि आयुष्यात पुढे जाण्यासाठी कठोर परिश्रम करण्यास त्यांना प्रोत्साहन दिले. पुस्तके लिहिलेल्या एका लहान मुलीला त्यांनी पुस्तकांना कसा प्रतिसाद आहे असे विचारले असता तिने सांगितले की इतर लहान मुलेही आपापली पुस्तके लिहू लागली आहेत. तेव्हा मोदी यांनी इतर लहान मुलांना प्रेरणा दिल्याबद्दल तिचे कौतुक केले.वीर बाल दिनानिमित्त पंतप्रधानांचे भाषण
December 26th, 12:05 pm
आज आपण सगळे इथं आपला तिसरा वीर बाल दिवस साजरा करण्यासाठी जमलो आहोत. वीर साहिबजादांच्या बलिदानाच्या अमर स्मृतीप्रित्यर्थ तीन वर्षांपूर्वी आमच्या सरकारनं वीर बाल दिवस साजरा करायला सुरुवात केली. आज हा दिवस अख्ख्या देशासाठी, देशातल्या करोडो लोकांसाठी राष्ट्रीय प्रेरणेचा उत्सव ठरला आहे. या दिवसानं भारतातल्या कित्येक मुलांमध्ये आणि युवकांमध्ये अदम्य साहसाची भावना जागृत केली आहे. शौर्य, नवोन्मेष, विज्ञान आणि तंत्रज्ञान, खेळ आणि कला यासारख्या क्षेत्रात उत्तम कामगिरी केलेल्या देशातल्या १७ मुलांचा आज सन्मान करण्यात आला. भारतातल्या लहान मुलांमध्ये, युवा पिढीत खूप काही करुन दाखवण्याची क्षमता आहे, हे या सर्वांनी दाखवून दिलं आहे. आजच्या या दिवशी मी आपल्या गुरुजनांना, वीर साहिबजादांना वंदन करुन पुरस्कार मिळालेल्या सर्व मुलांना शुभेच्छा देतो, त्यांच्या कुटुंबियांनाही शुभेच्छा देतो. या सर्वांचं मी संपूर्ण देशाच्या वतीनं अभिनंदन करतो.नवी दिल्ली येथे आयोजित वीर बाल दिवस कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले सहभागी
December 26th, 12:00 pm
नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे आज आयोजित वीर बाल दिवस कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी झाले. तिसऱ्या वीर बाल दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात उपस्थितांना त्यांनी संबोधित केले. साहिबजादांच्या अतुलनीय शौर्य आणि बलिदानाच्या स्मृतीनिमित्त आपल्या सरकारने वीर बाल दिवस सुरू केल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. आता हा दिवस कोट्यवधी भारतीयांसाठी राष्ट्रीय प्रेरणेचा सण बनला असल्याचे त्यांनी सांगितले. या दिवसाने अनेक मुलांना आणि युवांना दुर्दम्य साहसाची प्रेरणा दिली आहे. मोदी यांनी आज शौर्य, नवनिर्मिती, विज्ञान आणि तंत्रज्ञान, क्रीडा आणि कला या क्षेत्रात वीर बाल पुरस्काराने सन्मानित झालेल्या 17 मुलांचे कौतुक केले. आजचे पुरस्कार विजेते विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करण्याच्या भारतीय मुले आणि युवांच्या क्षमतेचे प्रतीक आहेत. पंतप्रधानांनी यावेळी गुरूंना आणि वीर साहिबजादांना आदरांजली अर्पण केली आणि पुरस्कार विजेत्यांचे व त्यांच्या कुटुंबियांचे अभिनंदन केले.व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून रोजगार मेळाव्याअंतर्गत 71,000 पेक्षा जास्त नियुक्ती पत्रांच्या वितरण प्रसंगी पंतप्रधानांच्या भाषणाचा मजकूर
December 23rd, 11:00 am
मी काल रात्री उशिरा कुवेतहून परत आलो आहे… तिथे मी भारतीय युवा आणि व्यावसायिकांची भेट घेतली आणि खूप गप्पा मारल्या. आता इथे आल्यानंतर माझा पहिला कार्यक्रम देशातील युवा वर्गासोबत आयोजित केला आहे. हा अतिशय सुखद योगायोग आहे. आज देशातील हजारो युवांसाठी,आपणा सर्वांच्या आयुष्याची नवी सुरुवात होते आहे. तुमचे कित्येक वर्षांपूर्वीचे स्वप्न पूर्ण झाले आहे, वर्षानुवर्षे केलेल्या मेहनतीला यश आले आहे. 2024 हे सरणारे वर्ष तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबातील सदस्यांना नवीन आनंद देऊन जाते आहे. मी तुम्हा सर्व युवांचे आणि तुमच्या कुटुंबियांचे अभिनंदन करतो.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्र सरकारी विभाग आणि संघटनांमध्ये नियुक्त झालेल्या नवनियुक्तांना रोजगार मेळ्या अंतर्गत केले 71,000 पेक्षा जास्त नियुक्तीपत्रांचे वितरण
December 23rd, 10:30 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून रोजगार मेळाव्याला संबोधित केले आणि सरकारी विभाग आणि संस्थांमध्ये नवनियुक्त 71,000 हून अधिक युवांना नियुक्ती पत्रांचे वितरण केले. हा रोजगार मेळा पंतप्रधानांच्या रोजगार निर्मितीला प्राधान्य देण्याच्या वचनबद्धतेला अधोरेखित करत असून युवकांना राष्ट्रउभारणी आणि आत्मसक्षमीकरणात योगदान देण्यासाठी अर्थपूर्ण संधी उपलब्ध करून त्यांना सक्षम करेल.संविधानाच्या स्वीकाराला 75 वर्ष झाल्यानिमित्त लोकसभेत झालेल्या विशेष चर्चेमधले पंतप्रधानांचे संबोधन
December 14th, 05:50 pm
आपणा सर्वांसाठी आणि सर्व देशवासीयांसाठी इतकेच नव्हे तर जगभरातल्या लोकशाहीप्रेमी नागरिकांसाठीही हा अभिमानाचा क्षण आहे. लोकशाहीचा हा उत्सव मोठ्या अभिमानाने साजरा करण्याची ही वेळ आहे. संविधानाचा 75 वर्षांचा अविस्मरणीय प्रवास आणि जगातल्या सर्वात महान आणि विशाल लोकशाहीचा प्रवास, यामागे असलेली आपल्या संविधान निर्मात्यांची दूर दृष्टी, आपल्या संविधान निर्मात्यांचे योगदान घेऊन आपण आज आगेकूच करत आहोत. 75 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त उत्सव साजरा करण्याचा हा क्षण आहे.संसदही या उत्सवात सहभागी होऊन आपल्या भावना व्यक्त करत आहे याचा मला आनंद आहे. मी सर्व माननीय सदस्यांचे आभार मानतो. ज्यांनी या उत्सवात सहभाग घेतला त्या सर्वांचे मी अभिनंदन करतो.संविधान स्विकृतीच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त विशेष चर्चासत्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेला केले संबोधित
December 14th, 05:47 pm
संविधान स्विकृतीच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लोकसभेत विशेष चर्चासत्राला संबोधित केले. आपण लोकशाहीचा हा उत्सव साजरा करत आहोत, ही भारतातील सर्व नागरिकांसाठी आणि लोकशाहीचा आदर करणाऱ्या जगभरातील सर्व लोकांसाठी अभिमानाची आणि सन्मानाची बाब आहे असे उद्गार मोदी यांनी सभागृहाला संबोधित करताना काढले. आपल्या राज्यघटनेच्या 75 वर्षांच्या या उल्लेखनीय आणि महत्त्वपूर्ण प्रवासात आपल्या राज्यघटनेच्या रचनाकारांची दूरदृष्टी, द्रष्टेपणाचे आणि प्रयत्नांचे आभार मानून ते म्हणाले की, 75 वर्षे यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर लोकशाहीचा उत्सव साजरा करण्याची वेळ आली आहे. हा सोहळा साजरा करण्यात संसद सदस्यही सहभागी होत आहेत आणि आपले विचार व्यक्त करत आहेत याबद्दल मोदी यांनी आनंद व्यक्त केला तसेच त्यांचे आभार मानले आणि अभिनंदन केले.पंतप्रधान नरेंद्र मोदी 11 डिसेंबर रोजी स्मार्ट इंडिया हॅकेथॉन 2024 च्या सहभागींशी साधणार संवाद
December 09th, 07:38 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी 11 डिसेंबर 2023 रोजी दुपारी 4:30 वाजता स्मार्ट इंडिया हॅकेथॉन 2024 च्या ग्रँड फिनालेमध्ये तरुण नवोन्मेषांबरोबर दूरदृश्य प्रणालीमार्फत संवाद साधणार आहेत. या ग्रँड फिनालेमध्ये 1300 हून अधिक विद्यार्थी संघ सहभागी होतील. पंतप्रधान या कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करणार आहेत.पंतप्रधानांनी भूतानचे राजे आणि राणी यांचे केले स्वागत
December 05th, 03:42 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली येथे भूतानचे महामहिम राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक आणि भूतानच्या महाराणी जेसन पेमा वांगचुक यांचे स्वागत केले. पंतप्रधानांनी भूतानच्या राजांना शुभेच्छा दिल्या आणि मार्च 2024 मधील भेटीदरम्यान भूतानचे सरकार आणि तिथल्या जनतेने केलेल्या प्रेमळ आदरातिथ्याची आठवण करून दिली.The bond between India & Guyana is of soil, of sweat, of hard work: PM Modi
November 21st, 08:00 pm
Prime Minister Shri Narendra Modi addressed the National Assembly of the Parliament of Guyana today. He is the first Indian Prime Minister to do so. A special session of the Parliament was convened by Hon’ble Speaker Mr. Manzoor Nadir for the address.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गयानाच्या संसदेला केले संबोधित
November 21st, 07:50 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गयानाच्या राष्ट्रीय संसदेला संबोधित केले. गयानाच्या राष्ट्रीय संसदेला संबोधित करणारे ते पहिले भारतीय पंतप्रधान आहेत. गयाना संसदेचे अध्यक्ष मन्झूर नादिर यांनी पंतप्रधान मोदी यांच्या भाषणासाठी विशेष अधिवेशन बोलावले होते.दुसऱ्या भारत - कॅरिकॉम परिषदेतील पंतप्रधानांच्या उद्घाटनपर भाषणाचा मराठी अनुवाद
November 21st, 02:15 am
राष्ट्राध्यक्ष इरफान अली आणि पंतप्रधान डिकन मिशेल यांच्यासह दुसऱ्या भारत – कॅरिकॉम परिषदेचे आयोजन करताना मला अतिशय आनंद होत आहे. मी, कॅरिकॉम परिवारातल्या सर्व सदस्यांचे मनःपूर्वक स्वागत करतो आणि परिषेदच्या उत्कृष्ट आयोजनासाठी राष्ट्राध्यक्ष इरफान अली यांचे विशेष आभार मानतो.PM Modi attends Second India CARICOM Summit
November 21st, 02:00 am
PM Modi and Grenada PM Dickon Mitchell co-chaired the 2nd India-CARICOM Summit in Georgetown. PM Modi expressed solidarity with CARICOM nations for Hurricane Beryl's impact and reaffirmed India's commitment as a reliable partner, focusing on development cooperation aligned with CARICOM's priorities.दुसरी भारत-ऑस्ट्रेलिया वार्षिक शिखर परिषद
November 20th, 08:38 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बनीज यांनी 19 नोव्हेंबर रोजी रिओ दि जानेरो येथे झालेल्या जी20 शिखर परिषदेला अनुषंगून दुसऱ्या भारत-ऑस्ट्रेलिया वार्षिक शिखर परिषदेत भेट घेतली. पहिली वार्षिक शिखर परिषद 10 मार्च 2023 रोजी नवी दिल्ली येथे पंतप्रधान अल्बनीज यांच्या भारताच्या राजकीय दौऱ्यादरम्यान झाली होती.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली चिलीच्या राष्ट्राध्यक्षांची भेट
November 20th, 08:36 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 19 नोव्हेंबर रोजी चिली प्रजासत्ताकचे राष्ट्राध्यक्ष गॅब्रिएल बोरिक फॉन्ट यांची ब्राझीलमधील रिओ दि जानेरो येथे जी -20 शिखर परिषदेच्या निमित्ताने भेट घेतली. ही त्यांची पहिली भेट होती.पंतप्रधानांनी अर्जेंटिनाच्या अध्यक्षांची घेतली भेट
November 20th, 08:09 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्राझीलमधील रिओ दि जानेरो येथे जी 20 शिखर परिषदेच्या निमित्ताने 19 नोव्हेंबर रोजी अर्जेंटिनाचे अध्यक्ष जेवियर मिलेई,यांची भेट घेतली.रिओ दि जानेरो येथील G20 परिषदेच्या पार्श्वभूमीवर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची भेट घेतली
November 20th, 08:05 pm
रिओ दि जानेरो येथे सुरु असलेल्या G20 परिषदेच्या पार्श्वभूमीवर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 19 नोव्हेंबर रोजी ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष लुईझ इनासिओ लुला दा सिल्वा यांची भेट घेतली.Joint Statement: 2nd India-Australia Annual Summit
November 19th, 11:22 pm
PM Modi and Anthony Albanese held the second India-Australia Annual Summit during the G20 Summit in Rio de Janeiro. They reviewed progress in areas like trade, climate, defence, education, and cultural ties, reaffirming their commitment to deepen cooperation. Both leaders highlighted the benefits of closer bilateral engagement and emphasized advancing the Comprehensive Economic Cooperation Agreement (CECA) to strengthen trade and investment ties.इटली-भारत संयुक्त सामरिक कृती योजना 2025-2029
November 19th, 09:25 am
भारत-इटली सामरिक भागीदारीचे अतुलनीय महत्त्व लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी ब्राझीलमध्ये रिओ-दि-जानेरो येथे जी-20 शिखर परिषदेतील 18 नोव्हेंबर 2024 च्या बैठकीदरम्यान, तिला अधिक गती देण्याचा निर्णय घेतला. यासाठी पुढीलप्रमाणे लक्ष्यकेंद्री आणि कालबद्ध उपक्रम आणि सामरिक कृतीची संयुक्त योजना आखण्यात आली आहे. या दिशेने, इटली आणि भारत या देशांनी पुढील गोष्टींना मान्यता दिली आहे: