Joint G20 Declaration on Digital Infrastructure AI and Data for Governance
November 20th, 07:52 am
The G20 joint declaration underscores the pivotal role of inclusive digital transformation in achieving Sustainable Development Goals (SDGs). Leveraging Digital Public Infrastructure (DPI), AI, and equitable data use can drive growth, create jobs, and improve health and education outcomes. Fair governance, transparency, and trust are essential to ensure these technologies respect privacy, promote innovation, and benefit perse societies globally.पंतप्रधान मोदी नायजेरिया, ब्राझील आणि गयानाला भेट देणार
November 12th, 07:44 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी 16 ते 21 नोव्हेंबर या कालावधीत नायजेरिया, ब्राझील आणि गयाना या देशांच्या अधिकृत दौऱ्यावर जाणार आहेत. नायजेरियामध्ये ते धोरणात्मक भागीदारी बळकट करण्यासंबंधीच्या उच्चस्तरीय चर्चेत सहभागी होणार असून भारतीय समुदायाला संबोधित करणार आहेत. ब्राझीलमध्ये ते G20 शिखर परिषदेत सहभागी होतील. गयानामध्ये, पंतप्रधान वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करतील तसेच तेथील संसदेलाही ते संबोधित करणार असून कॅरिबियन प्रदेशासोबतचे संबंध दृढ करण्याची भारताची बांधिलकी अधोरेखित करणाऱ्या कॅरिकॉम-इंडिया समिटमध्ये सहभागी होतील.“दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी फेरनिवड झाल्याबद्दल सिरिल रामफोसा यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले अभिनंदन”
June 17th, 05:11 pm
आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्रपतीपदी फेरनिवड झाल्याबद्दल सिरिल रामफोसा यांचे अभिनंदन केले.PM congratulates Azali Assoumani on being re-elected as Comoros Prez
January 29th, 10:30 pm
The Prime Minister, Shri Narendra Modi, congratulated Azali Assoumani on being re-elected as the President of Comoros today.दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दमदार विजयाबद्दल पंतप्रधानांनी भारतीय क्रिकेट संघाचे केले अभिनंदन
November 05th, 10:22 pm
सध्या सुरू असलेल्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेवर दमदार विजय मिळवल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भारतीय क्रिकेट संघाचे अभिनंदन केले आहे.जी 20 विद्यापीठ कनेक्ट फिनालेमध्ये पंतप्रधानांनी केले भाषण
September 26th, 04:12 pm
दोन आठवड्यांपूर्वी याच भारत मंडपमध्ये जोरदार घडामोडी घडत होत्या. हे भारत मंडपम एकदम ‘हॅपनिंग’ ठिकाण होते आणि मला आनंद आहे की आज माझा भावी भारत त्याच भारत मंडपमध्ये उपस्थित आहे. जी-20 च्या आयोजनाला भारताने ज्या उंचीवर नेले आहे ते पाहून जग आश्चर्यचकित झाले आहे.पण तुम्हाला माहीत आहे की , मी अजिबात थक्क नाही ,मला अजिबात आश्चर्य वाटले नाही.कदाचित तुमच्या मनात असेल की इतके मोठे आयोजन झाले तुम्ही खुश नाही , काय कारण आहे ? माहीत आहे का ? कारण कार्यक्रम यशस्वी करण्याची जबाबदारी तुमच्यासारखे तरुण विद्यार्थी घेतात , तरुणाईचा यात सहभाग असेल तर तो यशस्वी होणार हे निश्चित असते. .जी 20 युनिव्हर्सिटी कनेक्ट फिनालेला पंतप्रधानांनी केले संबोधित
September 26th, 04:11 pm
नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे जी 20 विद्यापीठ कनेक्ट फिनाले कार्यक्रमाला आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित केले. जी 20 युनिव्हर्सिटी कनेक्ट हा उपक्रम देशातल्या तरुणांना भारताच्या जी 20 अध्यक्षपदाबाबत माहिती देण्यासाठी आणि जी 20 च्या विविध कार्यक्रमांमध्ये त्यांचा सहभाग वाढवण्याच्या उद्देशाने हाती घेण्यात आला. पंतप्रधानांनी या प्रसंगी 4 प्रकाशनांचे : The Grand Success of G20 Bharat Presidency: Visionary Leadership, Inclusive Approach (भारताच्या जी 20 अध्यक्षतेचे भव्य यश: दूरदर्शी नेतृत्व, सर्वसमावेशक दृष्टिकोन;), India's G20 Presidency: Vasudhaiva Kutumbakam (भारताचे जी 20 अध्यक्षपद: वसुधैव कुटुंबकम; ) , Compendium of G20 University Connect Programme (जी 20 युनिव्हर्सिटी कनेक्ट कार्यक्रमाचे संकलन); आणि Showcasing Indian Culture at G20 (जी 20 मध्ये भारतीय संस्कृतीचे प्रदर्शन) यांचे अनावरण केले.पंतप्रधान आणि कोमोरोसच्या राष्ट्रपतींची भेट
September 10th, 05:20 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 10 सप्टेंबर 2023 रोजी दिल्लीत जी 20 शिखर परिषदेच्या निमित्ताने कोमोरोसचे राष्ट्रपती अझाली असौमानी यांची भेट घेतली.भारत-ब्राझील-दक्षिण आफ्रिका-अमेरिका या देशांचे संयुक्त निवेदन
September 09th, 09:11 pm
आम्ही, भारत, ब्राझील, दक्षिण आफ्रिका आणि अमेरिका या देशांचे प्रमुख आपल्या सामायिक विश्वासाठी उपाय योजण्याच्या उद्देशाने जी-20 ला आंतरराष्ट्रीय आर्थिक सहकार्यविषयक प्रमुख मंचाचा रुपात घडवण्याप्रती आमच्या सामायिक कटिबद्धतेची पुन्हा एकदा ग्वाही देण्यासाठी नवी दिल्ली येथे आयोजित जी-20 राष्ट्रप्रमुखांच्या शिखर परिषदेच्या निमित्ताने एकत्र आलो आहोत.बंगळूरू येथील इस्त्रो केंद्राला भेट देऊन नवी दिल्लीला परतल्यावर एका सभेमधील पंतप्रधानांचे संबोधन
August 26th, 01:18 pm
आज सकाळी मी बंगळुरुला होतो, पहाटेच पोचलो होतो, असे ठरवले होते की भारतात गेल्यावर, ज्या शास्त्रज्ञांनी देशासाठी एवढी मोठी कामगिरी केली, त्यांचं दर्शन घेईन, आणि म्हणून मी पहाटेच तिथे गेलो. पण जनतेने सकाळी सूर्योदयापूर्वीच हातात तिरंगा धरून ज्या प्रकारे चांद्रयानाचे यश साजरे केले ते खूप प्रेरणादायी होते, आणि आता कडक उन्हात सूर्य तापलेला आहे, या महिन्यातले उन तर कातडी जाळते. अशा कडक उन्हात आपण सर्वजण इथे आलात आणि चांद्रयानाचे यश साजरे केले, मलाही त्या आनंदात सहभागी करून घेतले, हे माझे भाग्य आहे. आणि मी यासाठी आपल्या सर्वांचे अभिनंदन करतो.पंतप्रधानांचे दिल्लीत आगमन होताच भव्य नागरी स्वागत
August 26th, 12:33 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे दिल्लीत भव्य स्वागत करण्यात आले. चांद्रयान - 3 चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वीरीत्या उतरल्याबद्दल इस्रो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेमधल्या शास्त्रज्ञांशी संवाद साधल्यानंतर, पंतप्रधानांचे आज बेंगलुरूहून दिल्लीत आगमन झाले. दक्षिण आफ्रिका आणि ग्रीसच्या चार दिवसांच्या दौऱ्यानंतर पंतप्रधान थेट बेंगलुरू येथे गेले होते. जे पी नड्डा यांनी पंतप्रधानांचे स्वागत केले आणि त्यांचा यशस्वी परदेश दौरा व भारतीय शास्त्रज्ञांच्या महत्त्वपूर्ण यशाबद्दल त्यांचा सत्कार केला.दक्षिण आफ्रिका आणि ग्रीसच्या यशस्वी दौऱ्यानंतर पंतप्रधान मोदी यांचे बेंगळुरुत भव्य स्वागत
August 26th, 10:08 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी दक्षिण आफ्रिका आणि ग्रीसच्या चार दिवसांच्या दौऱ्यानंतर आज बेंगळुरूत दाखल झाले. पंतप्रधानांनी दक्षिण आफ्रिकेतील ब्रिक्स परिषदेत भाग घेतला आणि नंतर ग्रीसचा दौरा केला. पंतप्रधानांनी स्थानिक विचारवंतांशी विविध द्विपक्षीय आणि स्वतंत्र बैठका घेतल्या. त्यांनी दोन्ही देशांतील भारतीय समुदायांची भेट घेतली. दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून चांद्रयान-3 मून लँडरचे लँडिंग अनुभवल्यानंतर पंतप्रधान इस्रोच्या चमूशी संवाद साधण्यासाठी बेंगळुरूत दाखल झाले.India & Greece have a special connection and a relationship spanning centuries: PM Modi
August 25th, 09:30 pm
PM Modi addressed the Indian community at Athens Conservatoire, in Athens. In his address, PM Modi emphasized the unprecedented transformation that India is currently undergoing and the strides being made in various sectors. He lauded the success of the Chandrayaan mission. Prime Minister highlighted the contribution of the Indian community in Greece in advancing the multi-faceted India-Greece relations and urged them to be a part of India’s growth story.Prime Minister’s interaction with the Indian Community in Athens
August 25th, 09:00 pm
PM Modi addressed the Indian community at Athens Conservatoire, in Athens. In his address, PM Modi emphasized the unprecedented transformation that India is currently undergoing and the strides being made in various sectors. He lauded the success of the Chandrayaan mission. Prime Minister highlighted the contribution of the Indian community in Greece in advancing the multi-faceted India-Greece relations and urged them to be a part of India’s growth story.पंतप्रधान नरेंद्र मोदी दक्षिण आफ्रिका आणि ग्रीसच्या दौऱ्यावरून परतल्यावर लगेच 26 ऑगस्ट रोजी बंगळूरू येथे इस्रो टेलिमेट्री ट्रॅकिंग आणि कमांड नेटवर्कला देणार भेट
August 25th, 08:10 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी 26 ऑगस्ट रोजी सकाळी 7:15 वाजता बंगळूरू येथे इस्रो टेलिमेट्री ट्रॅकिंग आणि कमांड नेटवर्क (ISTRAC) येथे भेट देतील. दक्षिण आफ्रिका आणि ग्रीसच्या दौऱ्यावरून परतल्यावर लगेचच ते बंगळुरू येथे रवाना होतील.मोझांबिक प्रजासत्ताकच्या राष्ट्रपतींची पंतप्रधानांनी घेतली भेट
August 24th, 11:56 pm
द्विपक्षीय संबंध पुढे कसे नेता येतील यावर उभय नेत्यांनी फलदायी चर्चा केली. चर्चेतील प्रमुख मुद्द्यांमध्ये संसदीय संपर्क, संरक्षण, दहशतवाद, ऊर्जा, खाणकाम, आरोग्य, व्यापार आणि गुंतवणूक, क्षमता बांधणी, सागरी सहकार्य तसेच दोन्ही देशातील जनतेचा परस्पर संबंध यांचा समावेश होता.दक्षिण आफ्रिकेच्या अकादमी ऑफ सायन्सच्या प्रख्यात अनुवंशशास्त्रज्ञ आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हिमला सूदयाल यांच्याशी पंतप्रधानांची भेट
August 24th, 11:33 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 24 ऑगस्ट 2023 रोजी जोहान्सबर्ग येथे दक्षिण आफ्रिकेच्या अकादमी ऑफ सायन्सच्या प्रख्यात अनुवंशशास्त्रज्ञ आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हिमला सूदयाल यांची भेट घेतली.प्रसिद्ध रॉकेट वैज्ञानिक आणि गॅलेक्टिक एनर्जी व्हेंचर्सचे संस्थापक सियाबुला जुजा यांची पंतप्रधानांनी घेतली भेट
August 24th, 11:32 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 24 ऑगस्ट 2023 रोजी जोहान्सबर्ग येथे प्रसिद्ध रॉकेट वैज्ञानिक आणि गॅलेक्टिक एनर्जी व्हेंचर्सचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक सियाबुला जुजा यांची भेट घेतली.इथियोपिया प्रजासत्ताकाच्या पंतप्रधानांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट
August 24th, 11:27 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इथियोपिया प्रजासत्ताकाचे पंतप्रधान डॉ. अबी अहमद अली यांची, 24 ऑगस्ट 2023 रोजी जोहान्सबर्ग येथे, 15 व्या ब्रिक्स शिखर परिषदेच्या आयोजना दरम्यान भेट घेतली.सेनेगल प्रजासत्ताकच्या राष्ट्रपतींची पंतप्रधानांनी घेतली भेट
August 24th, 11:26 pm
व्यापार आणि गुंतवणूक, संरक्षण आणि सुरक्षा, ऊर्जा, खाणकाम, कृषी, औषधनिर्माण, रेल्वे, क्षमता निर्माण, सांस्कृतिक आणि उभय देशातील लोकांचे परस्परातील संबंध यासह विविध क्षेत्रात द्विपक्षीय भागीदारी आणखी मजबूत करण्याच्या मार्गांवर दोन्ही नेत्यांनी फलदायी चर्चा केली.