आई श्री सोनल मातेच्या जन्मशताब्दी कार्यक्रमात पंतप्रधानांचा व्हिडिओ संदेश
January 13th, 12:00 pm
वर्तमान गादीपति- पूज्य कंचन माता व्यवस्थापक- पूज्य गिरीश आपा पौषच्या पवित्र महिन्यात आज आपण सगळे आई श्री सोनल मातेच्या जन्मशताब्दी सोहळ्याला उपस्थित आहोत. आई श्री सोनल मातेच्या आशीर्वादामुळेच मला या पवित्र सोहळ्याच्या आयोजनात सहभागी होण्याचे सौभाग्य लाभले आहे. मी संपूर्ण चारण समाजाचे, सर्व व्यवस्थापकांचे आणि सोनल मातेच्या सर्व भक्तांचे अभिनंदन करतो. मधडा धाम हे चारण समाजासाठी श्रद्धेचे केंद्र आहे , शक्तीचे केंद्र आहे , संस्कार आणि परंपरांचे केंद्र आहे. श्री सोनल मातेच्या चरणी मी विनम्र अभिवादन करतो.पंतप्रधानांनी आई श्री सोनल माता यांच्या जन्मशताब्दी कार्यक्रमाला व्हिडिओ संदेशाद्वारे केले संबोधित
January 13th, 11:30 am
तीन दिवसीय जन्मशताब्दी सोहळ्यामध्ये आलेल्या सोनल माता यांच्या आठवणी आपल्यासमवेत आहेत असे त्यांनी नमूद केले आणि सांगितले की कोणत्याही युगामध्ये भारतात अवतारी व्यक्तिमत्त्वांची कधीही कमतरता नव्हती या वस्तुस्थितीचे भगवती स्वरुपा सोनल माँ या साक्षात उदाहरण होत्या. गुजरात आणि सौराष्ट्र ही विशेषत्वाने संत आणि महान विभूतींची भूमी आहे असे नमूद करत पंतप्रधान मोदी म्हणाले की या भागात अनेक संत आणि महान व्यक्तींनी संपूर्ण मानवतेसाठी आपल्या ज्ञानाचा प्रकाश पसरवला. पवित्र गिरनार पर्वत हा भगवान दत्तात्रय आणि अनेक संतांचे स्थान असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. पंतप्रधान म्हणाले, सौराष्ट्रच्या या शाश्वत संत परंपरेत श्री सोनल माता आधुनिक युगासाठी प्रकाशस्तंभासारख्या होत्या. त्यांची आध्यात्मिक ऊर्जा, मानवतावादी शिकवण आणि तपश्चर्येने त्यांच्या व्यक्तिमत्त्वात एक अद्भुत दैवी आकर्षण निर्माण केले जे आजही जुनागढ आणि मढडा येथील सोनल धाममध्ये अनुभवता येते.”